इलेक्ट्रिक वाहनांचं चार्जिंग स्टेशन कसं सुरु करायचं? त्यासाठी खर्च किती? काय आहे Charging Station सुरु करण्याचे नियम? वाचा सविस्तर

| Updated on: Sep 22, 2021 | 1:47 PM

ऑटो कंपन्यासुद्धा इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष्य केंद्रित करत आहेत. त्यामुळेच भारतात चार्जिंग स्टेशन तयार करुन कमाई करण्याची नवी संधी निर्माण झाली आहे.

इलेक्ट्रिक वाहनांचं चार्जिंग स्टेशन कसं सुरु करायचं? त्यासाठी खर्च किती? काय आहे Charging Station सुरु करण्याचे नियम? वाचा सविस्तर
भारतात चार्जिंग स्टेशन तयार करुन कमाई करण्याची नवी संधी निर्माण झाली आहे.
Follow us on

मुंबई: भारतात इंधनाचे दर सध्या गगनाला भिडले आहेत, पेट्रोल शंभरीपार तर डिझेल शंभरीच्या जवळ आहे, त्यामुळेच आता लोकांच्या खिशाला गाड्या परवडत नाही, हेच पाहता सध्या इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढली आहे. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडूनही वेगवेगळ्या सवलती दिल्या जात आहेत, इलेक्ट्रिक वाहनांवरची रजिस्ट्रेशन फी माफ करण्यात आली आहे. ऑटो कंपन्यासुद्धा इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष्य केंद्रित करत आहेत. त्यामुळेच भारतात चार्जिंग स्टेशन तयार करुन कमाई करण्याची नवी संधी निर्माण झाली आहे. ( How to start a charging station for electric vehicles? What are the opportunities in this business? )

EVRE नावाची कंपनी यामध्ये पुढाकार घेत आहे, आणि भारतात इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन बनवण्याची तयारी करत आहे. देशभरात पुढच्या 2 वर्षात 10,000 चार्जिंग स्टेशन उघडण्याचा कंपनीचा मानस आहे. यासाठी तिने पार्क प्लस (Park+) या पार्किंग सेवा पुरवणाऱ्या कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्टही केलं आहे. ज्याद्वारे देशभरात रस्त्यांच्या जवळ चार्जिंग स्टेशन्स उभे करता येतील.

EVRE ने म्हटलं आहे की, कंपनी ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा उभ्या करणार आहे. त्यासाठी लागणारे डिझाईन, निर्मिती, स्थापना आणि त्याचं संचालन याची सगळी जबाबदारी कंपनी घेणार आहे, तर पार्क प्लस ही कंपनी जागा उपलब्ध करुन देणार आहे.

चार्जिंग स्टेशन सुरु कऱण्यासाठी ट्रेनिंग गरजेची

देशभरात चार्जिंग स्टेशन उभं करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, यासाठी एक योजनाही तयार करण्यात आली आहे, ज्यात सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाकडून (MSME) ट्रेनिंग दिली जात आहे. ट्रेनिंगमध्ये तुम्हाला चार्जिंग स्टेशनबद्दल सगळी माहिती दिली जाईल. हेच नाही तर तांत्रिक कामंही शिकवली जातील.

प्रशिक्षणात तुम्हाला चार्जिंग तंत्रज्ञान, सोलर पॉवर इलेक्ट्रिक व्हिईकल टेक्नोलॉजी, पायाभूत सुविधा, त्याचा व्यापार, सोलर पीव्ही चार्जिंग कनेक्टिव्हीटी लोड्स, इलेक्ट्रिक टेरिफ याबद्दल सगळी माहिती दिली जाईल. या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला या व्यवसायाबद्दलची सगळी माहिती मिळते. यानंतर तुम्ही चार्जिंग स्टेशन सुरु करुन कमाई करु शकता.

चार्जिंग स्टेशनबद्दलचे अनेक नियम

निती आयोगाने राज्य सरकारांना इलेक्ट्रिक वाहनांबद्दलचे नियम जारी केले आहेत. यासाठी एक हँडबूक देण्यात आलं आहे. चार्जिंग स्टेशन सुरु करण्याबाबत यात अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. ज्या निती आयोग, विद्युत मंत्रालय, विज्ञान मंत्रालयातून जारी करण्यात आल्या आहेत.

भारताचं लक्ष्य आहे की या दशकाच्या शेवटपर्यंत म्हणजेच 2030 च्या आधी भारतातील 70 टक्के व्यावसायिक गाड्या आणि 30 टक्के खासगी गाड्या इलेक्ट्रिक झाल्या पाहिजे. तर 40 टक्के बस आणि 80 टक्के टू व्हीलर थ्री व्हिलर इलेक्ट्रिक असावे

चार्जिंग स्टेशन कसं सुरु करायचं?

चार्जिंग स्टेशन उघडण्यासाठी अनेक ईव्ही कंपन्या तुम्हाला फ्रेंचायजी देतील. तुम्ही या कंपन्यांकडून फ्रेंचायजी घेऊन चार्जिंग स्टेशन सुरु करु शकता. एका अंदाजानुसार, एक चार्जिंग स्टेशन सुरु करण्यासाठी 4 लाखांचा खर्च येऊ शकतो.