देशातल्या बड्या बँकेचा खातेदारांना जबर धक्का; बदललेल्या या नियमामुळे टेन्शन वाढलं!

खासगी आणि सरकारी बँकादेखील आपला आर्थिक फायदा लक्षात घेऊन वेळोवेळी आपल्या नियमांत बदल करताना दिसतात. दरम्यान, आता एका मोठ्या आणि महत्त्वाच्या बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता अनेकांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

देशातल्या बड्या बँकेचा खातेदारांना जबर धक्का; बदललेल्या या नियमामुळे टेन्शन वाढलं!
प्रातिनिधिक छायाचित्र
| Updated on: Aug 09, 2025 | 4:25 PM

ICICI Bank Minimum Balance Rule : देशातल्या बँकिंग क्षेत्रातलं जाळं फारच विस्तारलेलं आहे. पैशांचे कोणतेही काम असेल तर आपल्याला बँकेत जाण्याशिवाय पर्याय नसतो. मोठे व्यवहार तर बँकेच्या मदतीनेच करावे लागतात. दुसरीकडे खासगी आणि सरकारी बँकादेखील आपला आर्थिक फायदा लक्षात घेऊन वेळोवेळी आपल्या नियमांत बदल करताना दिसतात. दरम्यान, आता एका मोठ्या आणि महत्त्वाच्या बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता अनेकांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

1 ऑगस्टपासूनच झाला नियम लागू

मिळालेल्या माहितीनुसार आयसीआयसीआय या बँकेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय ग्राहकांच्या सेव्हिंग बँक खात्यासंदर्भात आहे. आयसीआयसीआय बँकेने सेव्हिंग बँक खात्यांसाठी मिनिमम अॅव्हरेज अमाऊंटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. ही वाढ थेट पाच पटीने करण्यात आली आहे. बदललेल्या नियमाअंर्गत आयसीआयसीआय बँकेच्या खातेदारांना आता आपल्या बँक खात्यात कमीत कमी 50 हजार रुपये ठेवावे लागणार आहेत. हा नियम 1 ऑगस्टपासूनच लागू झाल्याचे ग्रहित धरण्यात येणार आहे. म्हणजेच आता ICICI बँकेच्या ग्राहकांना खात्यात कमीत कमी 50 हजार रुपये ठेवावे लागणार आहेत. तसे केले नाही तर खातेदारांना दंड भारावा लागू शकतो.

नवा नियम काय? कमीत कमी किती रुपये ठेवावे लागणार?

नव्या नियमानुसार आता ICICI बँकेच्या मेट्रो आणि शहरी भागातील खातेदारांना आपल्या बँक खात्यात कमीत कमी 50 हजार रुपये ठेवावे लागतील. तसेच निमशहरी भागातील खातेदारांना ही मर्यादा 25 हजारांची आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी ही मर्यादा 10 हजारांची आहे. अगोदर मेट्रो आणि शहरी भागातील सेव्हिंग अकाऊंट असणाऱ्या खातेदारांना आपल्या बँक खात्यात कमीत कमी 10 हजार रुपये ठेवावे लागायचे. या निर्णयानंतर आता आात देशांतर्गत बँकांमध्ये ICICI बँकेची सर्वाधिक मिनिमम अकाऊंट बॅलेन्सची मर्यादा सर्वाधिक झाली आहे.

अन्य बँकांमध्ये ही मर्यादा किती होती?

आता ICICI बँकेची मिनिमम बॅलेन्स ठेवण्याची मर्यादा सर्वाधिक आहे. याआधी एसबीआयने 2020 साली मिनिमम बॅलेन्सची मर्यादाच काढून टाकली होती. तर दुसऱ्या बँकांनी ऑपरेशन कॉस्ट म्हणून सेव्हिंग अकाऊंटवर कमीत कमी 2000 रुपये ते 10 हजार रुपयांपर्यंतची मिनिमम बॅलेन्स मर्यादा ठेवलेली आहे.

दरम्यान, बँका त्यांचा रोजचा खर्च आणि इतर गुंतवणुकीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मनिमम बॅलेन्स अकाऊंटची अट ठेवतात. या नियमाअंतर्गत एखाद्या खातेदराने आपल्या बँक खात्यात मिनिमम बॅलेन्स न ठेवल्यास त्याला आर्थिक दंड भरावा लागतो.