मोठी बातमी | नोकरी सोडताना नोटीस पीरियड पूर्ण न करणाऱ्यांना मोठा झटका!

| Updated on: Jan 14, 2021 | 10:56 AM

नोटीस पिरियड पूर्ण केला नाही तर तुम्हाला 18 टक्के GST भरावा लागणार आहे.

मोठी बातमी | नोकरी सोडताना नोटीस पीरियड पूर्ण न करणाऱ्यांना मोठा झटका!
Follow us on

मुंबई: नोकरदारांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही सध्या काम करत असलेली कंपनी सोडण्याचा विचार करत आहात आणि तु्म्ही नोटीस पिरियड पूर्ण केला नाही तर तुम्हाला मोठा टॅक्स भरावा लागू शकतो. एखादा नौकरदार एक कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत जात असेल तर त्याला कमीत कमी 1 महिन्याचा नोटीस पिरियड पूर्ण करावा लागतो. एखादा कर्मचारी मोठ्या पदावर असेल तर त्याला 3 किंवा 6 महिन्यांचा नोटीस पिरियड पूर्ण करावा लागतो. मात्र, आता नोटीस पिरियड पूर्ण केला नाही तर तुम्हाला 18 टक्के GST भरावा लागणार आहे.(If the notice period is not completed, 18% GST will have to be paid on the salary)

कुठल्या प्रकरणात निर्णय?

नव्या नियमांनुसार, नोटीस पिरियड पूर्ण केला नाही तर कर्मचाऱ्याला आपल्या फुल अॅन्ड फायनलच्या रकमेतून 18 टक्के जीएसटी भरावा लागू शकतो. या संबंधी गुजराज अथॉरिटी ऑफ एडव्हान्स रुलिंगने हा निर्णय दिला आहे. हे प्रकरण अहमादाबादेतील एका प्रकरणाशी संबंधित आहे. तिथल्या एका एक्सपोर्ट कंपनीत कामाला असलेल्या एका कर्मचाऱ्याने अॅडव्हान्स रुलिंगचे दार ठोठावले आहे. आपण सध्या काम करत असलेली सोडू इच्छितो आणि तीन महिन्यांचा नोटीस पिरियड पूर्ण करु इच्छित नाही, असं या कर्मचाऱ्याचं म्हणणं आहे.

गुजराज अॅडव्हान्स रुलिंगचा निर्णय

नोटीस पिरियड पूर्ण करायचा नसेल तर तुम्हाला 18 टक्के जीएसटी भरावा लागणार असल्याची सूचना अॅडव्हान्स रुलिंगने केली आहे. एखादा कर्मचारी सध्या काम करत असलेली नोकरी सोडू इच्छित आहे. मात्र, तो नोटीस पिरियड पूर्ण करु इच्छित नाही, तर त्याला नोटीस पिरियडच्या पगारावर 18 टक्के जीएसटी भरावा लागेल. कोणत्याही कर्मचाऱ्याला अपॉन्ट्मेंट लेटर किंवा कॉन्ट्रॅक्ट लेटरनुसार घालून दिलेला नोटीस पिरियड पूर्ण करणं कायद्यानुसार गरजेचं आहे.

इतर बातम्या:

आपल्या PF अकाऊंटमधून ‘या’ APPद्वारे काढा हजारो रुपये! प्रक्रिया जाणून घ्या

IRCTC IPO च्या भरघोस कमाईनंतर रेल्वे आणतोय आणखी एक IPO; कमाई करण्याची उत्तम संधी

If the notice period is not completed, 18% GST will have to be paid on the salary