घरात किती सोनं ठेवू शकतो, लिमिटच्या बाहेर सोनं ठेवलं तर… नियम आताच जाणून घ्या

घरात सोनं बाळगण्याची एक मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. जर या मर्यादेपेक्षा जास्त सोनं बाळगलं तर त्याचा सोर्स, पुरावा तुम्हाला दाखवा सरकारला लागेल, सोने खरेदी संदर्भातील पावत्या दाखवाव्या लागतील.

घरात किती सोनं ठेवू शकतो, लिमिटच्या बाहेर सोनं ठेवलं तर... नियम आताच जाणून घ्या
ऑनलाइन आणि ऑफलाइन डिलर सोन्याची विक्री करतात. काही डिलर सोन्याच्या खरेदीवर चांगली डिल देतात. त्यांच्याकडे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. संयुक्त अरब अमीरातमध्ये ऑनलाइन डिलरची ऑफर ऑफलाइन डिलरच्या तुलनेत अधिक आकर्षक आहे.
Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jul 09, 2024 | 9:05 PM

भारतीयांना सोन्याच्या दागिन्यांवरील प्रेम जगजाहीर आहे. हे सोन अखेर अडीअडचणीला कामी येतं म्हणून महिला वर्ग देखील सोन्यात गुंतवणूक करायला नेहमीच तयार असतात. कोणत्याही शुभ घडीला आपण अगदी गुंजभर नसलं तरी सोन्याचं किंवा चांदीचं एखादं नाणं तरी विकत घेतोच. या सोन्याच्या भावाने सध्या आभाळ गाठलं आहे. भारतातील गृहीणींचा या सोन्यावर जरा जास्तच विश्वास असतो. सोनं विकत घेण्याचे बहाणेच गृहीणींना हवे असतात. परंतू आपल्या घरात आपण नेमकं किती सोनं बाळगू शकतो. याची तुम्हाला काही माहिती आहे का ?

जर तुम्ही घोषीत उत्पन्नातून किंवा कर मुक्त उत्पन्नातून सोन्याची खरेदी केली आहे. किंवा वारसाहक्कातून तुम्हाला सोनं मिळालं आहे तर आपल्याला त्यावर कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. म्हणजे मर्यादित सीमेपर्यंत मिळालेल्या सोन्याच्या दागिन्यांना सरकार जप्त करीत नाही. परंतू जर मर्यादेपेक्षा जास्त सोन्याची खरेदी तुम्ही केली असेल तर मात्र तुम्हाला सोने खरेदीची पावती दाखवावी लागते.

जर तुम्ही घरात ठेवलेल्या सोन्याला विकायला गेला तर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार आहे. जर तुम्ही सोन्याला तीन वर्षांनंतर विक्री केली तर त्यातून होणाऱ्या फायद्याला लॉंग टर्म कॅपिटल्स गेन्स ( LTCG ) समजले जाते. यावर 20 टक्के दराने टॅक्स लावला जातो.

वारसा म्हणून मिळालेल्या सोन्यावर टॅक्स

जर तुम्ही गोल्ड बॉण्डला तीन वर्षांच्या आत विकाल तर त्यातून होणारा फायदा तुमच्या उत्पन्नाशी जोडला जाईल आणि आयकरातून इन्कम टॅक्स स्लॅबच्या हिशोबातू टॅक्स लावला जाईल, जर तीन वर्षांनंतर सोनाच्या बॉण्डची विक्री केली तर होणाऱ्या फायद्यावर 20 टक्के इंडक्सेशन आणि 10 टक्के विना इंडेक्सेशनच टॅक्स लागतो. परंतू जर तुम्ही गोल्ड बॉण्डला म्यच्युरिटीपर्यंत ठेवाल तर मात्र फायद्यावर कोणताही कर लागणार नाही.

भारतात घरात इतकं सोनं आपण बाळगू शकतो…

1. भारतात विवाहित महिला 500 ग्रॅम सोने घरात ठेवू शकते

2. अविवाहित महिला 250 ग्रॅमपर्यंत सोने घरात ठेवू शकते

3. पुरुषांना केवळ 100 ग्रॅम सोने ठेवण्याची परवानगी आहे