ITR Filing : आता मागे हटू नका;आयकर भरण्यासाठी अजून एक संधी, ITR ची डेडलाईन वाढवली?

Income Tax Return Filling : करदात्यांना आयकर भरण्यासाठी अजून एक संधी मिळाली आहे. त्यामुळे करदात्यांच्या आनंदाला भरते आले आहे. सरकारने याविषयी सोशल मीडियावर एक पोस्ट केल्याने करदात्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काय आहे ही अपडेट?

ITR Filing : आता मागे हटू नका;आयकर भरण्यासाठी अजून एक संधी, ITR ची डेडलाईन वाढवली?
मुदत वाढली रे
| Updated on: Sep 16, 2025 | 8:46 AM

ITR Filing Last Date : आयकर रिटर्न (ITR) भरण्याविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे. आयकर भरण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. वर्ष 2025-2026 साठी आयकर रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख आज 16 सप्टेंबर 2025 इतकी असेल. ही तारीख वाढवण्यामागे एक मोठी अपडेट समोर आली आहे. एकाच दिवशी आयटीआर भरण्यासाठी देशभरातून पोर्टलवर मोठी गर्दी उसळली. काही तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे अनेकांना आयटीआर भरता आला नाही. आज आता ITR भरण्याची अखेरची मुदत आहे.

CBDT ने काय केली पोस्ट

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर एक पोस्ट केली आहे. त्यानुसार, आयकर भरण्याची मुदत एक दिवसाने वाढवण्यात आली आहे. या पोस्टनुसार, 15 सप्टेंबर 2025 पर्यंत रेकॉर्डब्रेक 7.30 कोटींहून अधिक आयटीआर दाखल करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी हा आकडा 7.28 कोटींपेक्षा अधिक होता. आयकर विभागाच्या साईटमध्ये तांत्रिक खराबी आल्याने काल अनेक करदात्यांना आयकर रिटर्न दाखल करता आले नाही. आता ITR दाखल करण्याची तारीख एक दिवसाने वाढवली आहे. आज 16 सप्टेंबर 2025 रोजी आयकर रिटर्न दाखल करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आज संध्याकाळपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे.


ऑनलाईन असा भरा आयटीआर

1. ऑनलाईन आयटीआर फाईल करण्यासाठी incometax.gov.in या संकेतस्थळावर जा.

2. पॅन आणि युझर आयडी टाकून पासवर्ड तयार करा. लॉगिन करा.

3. असेसमेंट वर्ष आणि आर्थिक वर्ष निवडा.

4. आर्थिक वर्ष तर मूल्यांकन वर्ष निवडा

5. आता आयटीआर फॉर्मचा टाईप निवडा

6. करपात्र उत्पन्न आणि टीडीएसनुसार आयटीआर फॉर्मची निवड करा

7. आता सर्व कागदपत्रे स्कॅन करुन स्टार्ट हा पर्याय निवडा

8. आता प्रश्नांसमोरील चेक बॉक्सवर मार्क करा

9. तुमचे उत्पन्न, कर कपात यासंबंधीचे विवरण संबंधीत रकान्यात भरा

10. आता रिटर्न जमा करण्याच्या चेकबॉक्सवर क्लिक करा

11. रिटर्न ई-व्हेरिफाई करा. फॉर्म जमा झाल्याची माहिती स्क्रीनवर येईल

12. तुमच्या ई-मेलमध्ये आता याविषयीचा मॅसेज आला असेल

13. रिटर्न दाखल केल्यानंतर 30 दिवसांच्या आता ई-व्हेरिफाई करणे गरजेचे असते.

ऑफलाईन मोडमध्ये आयटीआर कसा भरणार

1. आयटीआर फायलिंग पोर्टलवर लॉग-इन करा

2. आता उत्पन्नाची माहिती देऊन आयटीआर फॉर्म डाऊनलोड करा

3. एक्सेल शीटमध्ये आयटीआर फॉर्म डाऊनलोड करा

4. आता योग्य माहिती जमा करा.

5. माहिती भरलेला फॉर्म आता अपलोड करा

6. आता 6 पर्यायांपैकी एकाने आयटीआर व्हेरिफाईड करा

7. त्यानंतर रिटर्न फॉर्म जमा करा