18 लाखाच्या उत्पन्नावर शून्य टक्के कर, नव्या कर प्रणालीतून असा घ्या फायदा

अर्थसंकल्प 2025 मध्ये सादर करण्यात आलेल्या 12.75 लाख रुपयांपर्यंत इन्कम टॅक्स फ्री करण्यात आला आहे, पण जर तुमचा पगार 12 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही तुमचे इन्कम टॅक्स फ्री करू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या पगाराचा स्ट्रक्चर बदलून भत्ते आणि लाभांचा वापर करावा लागेल. हे कसे केले जाईल, जाणून घेऊयात.

18 लाखाच्या उत्पन्नावर शून्य टक्के कर, नव्या कर प्रणालीतून असा घ्या फायदा
हे नियम वाचले का
| Edited By: | Updated on: Feb 10, 2025 | 6:37 PM

2025 च्या अर्थसंकल्पात प्राप्तिकराबाबत मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. यामध्ये अर्थमंत्र्यांनी आता 12 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही इन्कम टॅक्स आकाराला जाणार नाही अशी घोषणा केली आहे. अर्थमंत्र्यांच्या या बदलाद्वारे मध्यमवर्गीय करदात्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच जर तुमचे इन्कम हे 12 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर त्यावरील कर भरावा लागेल. मात्र काही असे मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही 12 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर कर वाचवू शकता. कारण नव्या करप्रणालीनुसार 13 लाख, 14, 15 किंवा 18 लाखांचे उत्पन्नही करमुक्त होऊ शकते. कसे ते जाणून घेऊयात.

संपूर्ण कर बचतीचा मार्ग नेमका कोणता आहे?

योग्य पद्धतीने गुंतवणूक (investment) आणि रीइंबर्समेंट (Reimbursement) च्या जास्तीत जास्त मर्यादेचा उपयोग केला, तर 18 रुपयांपर्यंतच्या सॅलरीवरही कोणताही कर भरावा लागणार नाही.याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे सॅलरीची पुनर्रचना करणे. यासाठी सॅलरीची रचना अशा प्रकारे करून तुम्ही अधिक इन्कमचा कर शून्य भरू शकता.
जर तुमचा बेसिक सॅलरी आणि महागाई भत्ता (DA) एकूण 12.25 लाख रुपये असेल तर विविध भत्ते आणि लाभांच्या माध्यमातून करमुक्त केला जाऊ शकतो.

  • NPS मध्ये योगदान 1.71 लाख रुपये,
  • मोटार कार फॅसिलिटी 4 लाख रुपये,
  • गिफ्ट अलाउंस 5,000 रुपये,

1.71 लाख + 4 लाख + 5 हजार = 18.01 लाख रुपये. अशा प्रकारे जर तुम्ही गुंतवणूक करून सॅलरी रीइंबर्समेंट केल्यास तुमचा इन्कम 18 लाख असला तरी त्यावर शून्य टक्के कर आकाराला जाईल.

आता 18 लाख रुपयांच्या इन्कमवर करमुक्त कसे करणार?

वर्षाच्या सुरुवातीला सॅलरी स्ट्रक्चरमध्ये तुम्ही जर बदल केल्यास संधी मिळते. तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला किती रक्कम रीइंबर्समेंटच्या स्वरूपात हवी आणि किती रक्कम करपात्र सॅलरीच्या (taxable salary) स्वरूपात हवी आहे.

१) NPS योगदान: NPS मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला कलम 80 सीसीडी (2) अंतर्गत मूळ वेतनाच्या 14% पर्यंत आणि NPS योगदान म्हणून महागाई भत्ता करमुक्त केला जातो. यामुळे 1.71 लाख रुपयांची बचत होऊ शकते.

२) गिफ्ट अलाउंस : कंपनीने दिलेली पाच हजार रुपयांपर्यंतची भेटवस्तू कलम १७ (२) (७) नियम ३ (७) (४) अन्वये कर प्रणाली द्वारे मुक्त मानली जाते.

३) स्टँडर्ड डिडक्शन : तसेच सर्व पगारदार कर्मचाऱ्यांना 75,000 रुपयांपर्यंत स्टँडर्ड डिडक्शन मिळते. त्यामुळे तुमचा कर शून्य होऊ शकतो.

कर वाचवण्याचे हे ही मार्ग आहेत.

  • कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या उपचाराचा खर्च भागविण्यासाठी वैद्यकीय भत्ता दिला जातो. ज्याद्वारे तुम्ही कर बचत करू शकता.
  • फूड कूपन किंवा जेवणाचे व्हाउचर देणाऱ्या कंपन्यांनाही करसवलत मिळते.
  • तसेच रीइंबर्समेंट पर्यायामध्ये कन्व्हेन्स, LTA, फूड-कूपन, एंटरटेनमेंट, इंटरनेट, फोन बिल आणि पेट्रोल यांचा समावेश होतो.जे कर बचतीसाठी उपयुक्त ठरतात.
  • HRA (House Rent Allowance) देखील कर बचतीसाठी (tax saving) उपयुक्त ठरतो. योग्य पद्धतीने या लाभांचा उपयोग केल्यास तुमची करदेयता (tax liability) मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. भाड्याच्या घरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा सर्वात आवश्यक भत्ता आहे, जो मूळ वेतनाच्या 40-50% पर्यंत असू शकतो.