म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक वाढली; वर्षभरात 24 टक्क्यांची वाढ, ‘ही’ आहेत प्रमुख कारणे

| Updated on: Dec 27, 2021 | 12:27 PM

गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना काळात गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडला पसंती दिल्याचे दिसून येत आहे. 2021 मध्ये म्युच्युअल फंडात तब्बल सात लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक वाढली; वर्षभरात 24 टक्क्यांची वाढ, ही आहेत प्रमुख कारणे
संग्रहीत छायाचित्र
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली : गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना काळात गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडला पसंती दिल्याचे दिसून येत आहे. 2021 मध्ये म्युच्युअल फंडात तब्बल सात लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. परंतु सध्या पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होऊ लागलेली आहे. तसेच कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने देखील भारतात शिरकाव केला आहे. त्यामुळे येणारा काळ म्युच्युअल फंडमधून मिळणाऱ्या परताव्यासाठी फारसा अनुकूल दिसत नसल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी म्हटले आहे. चालू वर्षामध्ये म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीमध्ये तब्बल 24 टक्क्यांनी वाढ झाली असून, एकूण मार्केट कॅप ही 38.45 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2020 साली एकूण मार्केट कॅप ही 31 लाख कोटी रुपये इतकी होती.

…तर 2022 मध्ये गुंतवणूक घटणार

तज्ज्ञांच्या मते चालू वर्षात म्युच्युअल फंडमधील एकूण संपत्ती ही तब्बल 24 टक्क्यांनी वाढून 38.45 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मार्चपासून कोरोना रुग्ण कमी होण्यास सुरुवात झाली होती. तसेच लसीकरणाला देखील वेग आला होता. त्यामुळे गुंतवणूकदार देखील मोठ्या संख्येने गुंतवणुकीसाठी पुढे आले. मात्र गेल्या दोन वर्षांचा अनुभव लक्षात घेता आता परिस्थिती तशी दिसून येत नाही. कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. तसेच ओमिक्रॉनने देखील भारतामध्ये शिरकाव केला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने पुढील वर्षी म्यूचल फंडमधील गुंतवणूक काही अंशी घटण्याची शक्यता आहे.

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक वाढण्याची काराणे

सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे तुम्ही बँकेत एखादी एफडी करता, किंवा कुठल्या योजनेमध्ये पैसे गुंतवता तेव्हा त्यावर तुम्हाल मर्यादीत व्याज मिळते. म्हणावा तसा परतावा मिळत नाही. बँकेच्या अनेक योजना या दीर्घ मुदतीच्या असतात. मात्र म्युच्युअल फंडचे तसे नसते. तुम्ही अल्पवधित देखील चांगला परतावा मिळू शकता. बँकेपेक्षा कितीतरी पटीने अधिक परतावा हा तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये मिळतो. पैसे गुंतवताना बँकेपेक्षा म्यूच्युअल फंडमध्ये जोखमी अधिक असते, मात्र परतावा देखील अधिक मिळत असल्याने सद्या गुंतवणूकदार हे म्यूच्युअल फंडकडे वळल्याचे दिसून येत आहेत.

 

संबंधित बातम्या

बेरोजगारांना मोठा दिलासा! नव्या वर्षात रोजगार वाढणार; जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ

Income Tax Return Filing : आतापर्यंत 4.43 कोटींपेक्षा अधिक आयकर रिटर्न दाखल

पेट्रोल, डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव