Debt : कर्जाची काटेरी वाट भारताला सोसल का? विकासाचा ट्रॅक सुटणार की अर्थव्यवस्था राहील गतिमान? काय होईल परिणाम..

Debt : कर्जाच्या बेडीत अडकलेला भारत विकास दरात मोठी झेप घेईल का?..काय सांगतात आकडे

Debt : कर्जाची काटेरी वाट भारताला सोसल का? विकासाचा ट्रॅक सुटणार की अर्थव्यवस्था राहील गतिमान? काय होईल परिणाम..
कर्जाच्या ओझ्याखाली गती साधणार का?
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Oct 13, 2022 | 4:07 PM

दिल्ली : भारत (India) सध्या कर्जाच्या जाळ्यात (Debt Trap) अडकत चालला आहे. आतंरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) याविषयीचा इशारा भारताला दिला आहे. त्यानुसार, भारताचा कर्जाच्या प्रमाणात देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) 84 टक्के राहणार आहे. सध्या हे प्रमाण कर्जाच्या प्रमाणात 69.62 टक्के आहे. सध्या विकसीत आणि विकसनशील राष्ट्रांच्या तुलनेत भारताच्या एकूण सकल उत्पन्नाच्या तुलने कर्जाचे प्रमाण सर्वात जास्त आहे.

IMF ने कर्जाच्या प्रमाणात जीडीपी घसरत असल्याचे दिसत असले तरी त्याचा फारसा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर दिसून येणार नाही. IMF च्या दाव्यानुसार, कर्जाचा भार वहन करण्यात भारताला मोठा अडसर येणार नाही.

महसूली तुटीबाबत भारताने सजग राहणे आवश्यक असल्याचे मत, IMF च्या आर्थिक संबंधाचे उप निदेशक पाओलो मौरो (Paolo Mauro) यांनी सांगितले. याविषयी भारताने स्पष्ट धोरण स्वीकारणे आवश्यक असल्याचा दावा त्यांनी केला. नाहीतर परिस्थिती बिकट होऊ शकते असा इशारा त्यांनी दिला.

IMF चे आशिया-प्रशांत विभागाचे प्रमुख कृष्ण श्रीनिवासन यांनी भारताच्या प्रगतीचे कौतुक केले आहे. इतर देशांच्या विकास दरात घट झाली असली तरी भारत विकासाच्या वाटेवर झपाट्याने मार्गाक्रमण करत असल्याचा दावा त्यांनी केला. इतर देशांच्या तुलनेत भारताचा विकास दर चांगला असल्याचे त्यांनी सांगितले.

IMF च्या दाव्यानुसार, प्रत्येक वर्षी भारताला एकूण सकल उत्पादनाच्या 15 टक्के कर्ज घ्यावे लागते. त्यामुळे देशाला कर्ज घेण्याविषयी सजग राहणे अत्यावश्यक आहे. तसेच महसूली तूट भरून काढण्यावरही देशाने लक्ष देणे आवश्यक आहे. तरच येत्या काळात देशाला विकास दर कायम ठेवणे शक्य होईल, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.