ग्राहकांच्या मनात घर करायचं असेल तर…; नारायण मूर्ति यांनी सांगितला ‘सक्सेस मंत्रा’

Indian Businessman NR Narayana Murthy Give Success Mantra To Youth : सक्सेसफुल बिझनेसमन व्हायचं असेल तर नारायण मूर्ति यांचा हा सल्ला जरूर ऐका!; काममंत्र तुमच्या उपयोगी येईल. यशस्वी बिझनेसमन होण्याचा मंत्र नारायण मूर्ति यांनी सांगितला आहे. वाचा सविस्तर...

ग्राहकांच्या मनात घर करायचं असेल तर...; नारायण मूर्ति यांनी सांगितला सक्सेस मंत्रा
| Updated on: Jan 28, 2024 | 3:00 PM

मुंबई | 28 जानेवारी 2024 : एखादा बिझनेस मोठा करायचा असेल. त्याला यशाच्या शिखरावर न्यायचं असेल. तर त्यामागची थॉट प्रोसेस खूप महत्वाची ठरते. आयटी सेक्टरमधील देशातली दुसऱ्या क्रमांकाची कंपनी असलेल्या इन्फोसिस या कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ति यांनी बिझनेसमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर काय करावं, याचा सक्सेस मंत्रा सांगितला आहे. बिझनेसला मोठं करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी नारायण मूर्ति यांनी तरूणाईला काममंत्र दिलाय. जर या युक्तिचा तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये उपयोग केला. तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. नारायण मूर्ति यांनी मोलाचा सल्ला दिला आहे. त्यांनी एक सल्ला नवउद्योजकांना दिलाय.

नारायण मूर्ति यांनी काय कानमंत्र दिला?

जाहिरातींमधील दाव्यांवर मूर्ति यांनी भाष्य केलं आहे. एखाद्या प्रोडक्टची जाहिरात करताना कोणतीही कंपनी काही दावे करते. प्रोडक्टमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे, याचा कंपनीकडून ग्राहकांसमोर आराखडा मांडला जातो. या दाव्याच्या 5- 10 टक्के जास्तीचा फायदा ग्राहकाला दिला पाहिजे, असं नारायण मूर्ति एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

ग्राहक समाधानी हवा

नारायण मूर्ति यांनी ग्राहकाला खुश ठेवण्याचा मंत्र दिला. ग्राहक खुश असेल तर तो पुन्हा-पुन्हा तुमचं प्रोडक्ट खरेदी करतो. आपण जितके पैसे घेतो. तितकाच मोबदला ग्राहकाला मिळाला पाहिजे. किंबहुना ग्राहक मोजत असलेल्या पैशांपैक्षा त्याला मिळणारा मोबदला अधिक असायला हवा. जेव्हा ग्राहक एखाद्या प्रोडक्टच्या खरेदीसाठी पैसे मोजतो तेव्हा त्याला समाधान मिळालं पाहिजे. ते पैसे देण्याचा निर्णय चांगला होता, असं ग्राहकाला वाटायला हवं, असं नारायण मूर्ति यांनी सांगितलं.

हे गुण अंगी बाळगा

एखादी कंपनी चालवताना त्या कंपनीच्या लिडरमध्ये कोणते गुण असयला हवेत. यावरही नारायण मूर्ति यांनी प्रकाश टाकला. यावेळी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा दाखला दिला. महात्मा गांधी यांच्या सिद्धांताचं पालन केलं गेलं पाहिजे. जे पारदर्शकता आणि अखंडतेचं प्रतिक आहेत. महात्मा गांधी यांच्याकडून प्रेरणा घ्या, असंही नारायण मूर्ति म्हणाले.