Agriculture News : परदेशात भारतीय कांद्याची मागणी वाढण्याचं नेमकं कारण काय? वाचा सविस्तर

| Updated on: Mar 16, 2021 | 8:39 AM

गेल्या वर्षाच्या अखेरीस भारत देशांतर्गत गरजा भागवण्यासाठी कांद्याची आयात करत होता. परंतु, या वर्षाच्या सुरूवातीपासूनच त्याची निर्यात सुरू झाली आहे.

Agriculture News : परदेशात भारतीय कांद्याची मागणी वाढण्याचं नेमकं कारण काय? वाचा सविस्तर
कांदा
Follow us on

नवी दिल्ली : मागील महिन्यापर्यंत कांद्याच्या महागाईमुळे देशातील ग्राहक त्रस्त झाले होते, परंतु आता रब्बी हंगामाच्या पिकाची आवक वाढल्यामुळे किंमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. किंमती कमी झाल्यामुळे परदेशी भारतीय कांद्याची मागणी वाढली आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस भारत देशांतर्गत गरजा भागवण्यासाठी कांद्याची आयात करत होता. परंतु, या वर्षाच्या सुरूवातीपासूनच त्याची निर्यात सुरू झाली आहे. परदेशातील वाढत्या मागणीमुळे या महिन्यात देशातून कांद्याची निर्यात सुमारे दोन लाख टनांवर पोहोचू शकते, अशी माहिती व्यापाऱ्यांकडून देण्यात आली आहे. (indian onion exports increase due to low prices in abroad)

देशाच्या राजधानी दिल्लीच्या आझादपूर मंडीमध्ये सोमवारी कांद्याचा घाऊक दर 7.50 ते 22.50 रुपये प्रतिकिलो होता तर मॉडेल दर प्रति किलो 15.75 रुपये होता. कांद्याचं सर्वात मोठं उत्पादन असलेल्या महाराष्ट्रातील घाऊक मंड्यांमध्ये कांद्याचे दरही 13 ते 14 रुपयांपर्यंत वाढले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

कांद्याचे भाव घसरले

आजादपुर मार्केटमध्ये मागच्या महिन्यामध्ये कांद्याचा भाव घसरून अर्ध्यावर आल्याचं सांगण्यात आलं आहे. भाव घसरल्यामुळे देशातून कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचंही सांगण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांसह देशाच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा होणार आहे.

हॉर्टिकल्चर उत्पादक निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष अजित शहा यांनी आयएएनएसला सांगितले की, ‘कांद्याची निर्यात मागणी प्रचंड आहे आणि या महिन्यात दोन लाख टन कांद्याची निर्यात होऊ शकते आणि पुढील महिन्यापासून त्यापेक्षा जास्त होऊ शकते. अशा परिस्थितीत मागील वर्षाच्या तुलनेत या हंगामात कांद्याची निर्यात दर महिन्याच्या सरासरीपेक्षा अधिक वाढू शकते.’

सरकारने निर्यातीवर आणली होती बंदी

गेल्या वर्षी देशातील महागाई आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने 14 सप्टेंबर 2020 ला आयातीवर बंदी आणण्यापूर्वी भारत दरमहा सरासरी 2.18 लाख टन कांद्याची निर्यात करत होता. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी नुकतीच संसदेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवल्यानंतर जानेवारीत भारताने कांद्याची 56,000 टन आणि यावर्षी फेब्रुवारीमध्ये 31,000 टन कांद्याची निर्यात केली होती तर गेल्या वर्षी डिसेंबरच्या अखेरीस भारताने 65, 546 ची निर्यात केली. भारत बांगलादेश, श्रीलंका आणि इतर अनेक देशांसह शेजारच्या देशांमध्ये कांद्याची निर्यात करतो. (indian onion exports increase due to low prices in abroad)

संबंधित बातम्या – 

तुमच्याकडे बाईक किंवा कार असेल तर आधी करा हे काम, अन्यथा होईल नुकसान

‘या’ बँकेमध्ये खातं असल्यास बसेल आर्थिक फटका, 1 एप्रिलपासून प्रत्येक व्यवहारासाठी द्यावे लागणार पैसे

Petrol Diesel Price : सलग 15 दिवस इंधनाच्या दरांमुळे दिलासा, वाचा तुमच्या शहरांमध्ये काय आहेत पेट्रोल-डिझेलच्या किंमती?

(indian onion exports increase due to low prices in abroad)