तुमच्याकडे बाईक किंवा कार असेल तर आधी करा हे काम, अन्यथा होईल नुकसान

कोरोना साथीच्या कारणास्तव वाहन चालवण्याचा परवाना आणि वाहन नोंदणी, फिटनेस प्रमाणपत्र आणि पीयूसीला 1 फेब्रुवारी नंतर 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ दिली होती.

तुमच्याकडे बाईक किंवा कार असेल तर आधी करा हे काम, अन्यथा होईल नुकसान

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Highways) कोरोना साथीच्या कारणास्तव वाहन चालवण्याचा परवाना आणि वाहन नोंदणी, फिटनेस प्रमाणपत्र आणि पीयूसीला 1 फेब्रुवारी नंतर 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ दिली होती. यामुळे तुम्ही आपलं ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहनाचे आवश्यक कागदपत्र नूतनीकरण न केल्यास 31 मार्चनंतर तुमच्याकडून दंड आकारला जाईल. म्हणून लवकरच सर्व कागदपत्रांचे नूतनीकरण करून घ्या. (driving license and vehicle registration renewed by 31 march otherwise penalty may have to be paid kannd)

कोरोना साथीचा प्रसार रोखण्यासाठी महामार्ग मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. कारण, त्यावेळी देशातील सर्व शहरांच्या आरटीओ कार्यालयात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी आणि फिटनेस सर्टिफिकेटची अनेक प्रकरणे प्रलंबित होती. म्हणूनच महामार्ग मंत्रालयाने लोकांच्या समस्या समजून घेत हा निर्णय घेतला. वाहन चालवण्याचा परवाना, वाहन नोंदणी आणि फिटनेस प्रमाणपत्र यासारख्या महत्वाच्या वाहन कागदपत्रांची वैधता 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली.

मंत्रालयाने नेमकं काय म्हटलं?

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘मोटार वाहन अधिनियम 1988 आणि केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 अंतर्गत वाहनांची फिटनेस, परमिट, परवाना, नोंदणी किंवा अन्य कागदपत्रांची वैधता 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्याचा निर्णय मंत्रालयाने घेतला आहे. सर्व संबंधित कागदपत्रे ज्यांची वैधता यापुढे वाढवली जाऊ शकत नाही किंवा देशव्यापी बंदमुळे मुदतवाढ देण्यात येणार नाही आणि ज्या कागदपत्रांची वैधता 1 फेब्रुवारी 2020 रोजी संपली आहे, ती 31 मार्च 2021 पर्यंत वैध मानली जातील, असं मंत्रालयाने म्हटलं होतं.

31 मार्चनंतर कागदपत्रे वैध राहणार नाही

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 31 मार्चनंतर वाहनांची फिटनेस, परमिट, परवाना, नोंदणी किंवा इतर कागदपत्रांच्या वैधतेच्या निर्णयावर निर्णय घेतला नाही. यामुळे ज्यांनी अद्याप कागदपत्रांचे नूतनीकरण केले नाही. त्यांच्या वाहनाची कागदपत्रे लवकरच नूतनीकरण करण्यात येतील. अन्यथा 31 मार्चनंतर कागदपत्रे वैध राहणार नाही. (driving license and vehicle registration renewed by 31 march otherwise penalty may have to be paid kannd)

संबंधित बातम्या – 

‘या’ बँकेमध्ये खातं असल्यास बसेल आर्थिक फटका, 1 एप्रिलपासून प्रत्येक व्यवहारासाठी द्यावे लागणार पैसेPetrol Diesel Price : सलग 15 दिवस इंधनाच्या दरांमुळे दिलासा, वाचा तुमच्या शहरांमध्ये काय आहेत पेट्रोल-डिझेलच्या किंमती?

LIC कडून नव्या बचत योजनेची घोषणा; जबरदस्त फायदे आणि बरंच काही

(driving license and vehicle registration renewed by 31 march otherwise penalty may have

to be paid kannd)

 

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI