रेल्वे स्टेशनवर विमानतळासारखी सुविधा, एक्झिक्युटीव्ह लाऊंचमधून 60-70 लाख कमावणार रेल्वे, लवकरच मोठ्या शहरात सुरुवात

| Updated on: Sep 22, 2021 | 12:56 PM

हा एक्सिक्युटीव्ह लाऊंच बनवण्यासाठी 2 ते 4 कोटींचा खर्च आला आहे. कंपनीला आशा आहे की, या लाऊंचमधून 60-70 लाखांची कमाई होऊ शकते.

रेल्वे स्टेशनवर विमानतळासारखी सुविधा, एक्झिक्युटीव्ह लाऊंचमधून 60-70 लाख कमावणार रेल्वे, लवकरच मोठ्या शहरात सुरुवात
या एक्सिक्युटीव्ह लाऊंचमध्ये प्रवाशांना स्पा, लायब्रेरीसोबतच मल्टी क्युझिनची (Multi Cuisine) सुविधाही मिळणार आहे
Follow us on

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेची (Indian Railways) सब्सिडिअरी इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिजम कॉर्पोरेशन (IRCTC) रेल्वे प्रवाशांना आता विमानतळासारख्या सुविधा देणार आहे. आयआरसीटीसी ने प्रवाशांसाठी नवी दिल्ली स्टेशनवर लाऊंच बनवला आहे. या एक्सिक्युटीव्ह लाऊंचमध्ये प्रवाशांना स्पा, लायब्रेरीसोबतच मल्टी क्युझिनची (Multi Cuisine) सुविधाही मिळणार आहे. हा एक्सिक्युटीव्ह लाऊंच बनवण्यासाठी 2 ते 4 कोटींचा खर्च आला आहे. कंपनीला आशा आहे की, या लाऊंचमधून 60-70 लाखांची कमाई होऊ शकते. ( Indian Railways to set up executive launch, airport-like facilities at railway stations, new IRCTC venture )

नवीन रेल्वे गाड्या सुरु करण्यासोबतच IRCTCने प्रवाशांना अनेक सुविधा देणं सुरु केलं आहे. IRCTC भारतातील 12 शहरांमध्ये अशा प्रकारचे एक्जिक्युटीव्ह लाऊंच तयार करण्याच्या विचारात आहे. या प्रयोगातील पहिला एक्सिक्युटीव्ह लाऊंच हा नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर (New Delhi Railway Station) सुरु करण्यात आला आहे. प्लॅटफॉर्म नंबर 16 वर नवीन फूड प्लाझा ‘Pop n Hop’ ची सुरुवात करण्यात आली आहे. या फूड प्लाझामध्ये प्रवाशांना KFC, डोमिनोज, हल्दीराम, वाव मोमोज आणि अनेक ब्रांडेड खाद्यपदार्थांचे स्टॉल्स मिळतील.

लाऊंच बनवायला किती खर्च आला?

हा एक्सिक्युटीव्ह लाऊंच बनवण्यासाठी 2 ते 4 कोटींचा खर्च आला आहे. कंपनीला आशा आहे की, या लाऊंचमधून 60-70 लाखांची कमाई होऊ शकते. अशा प्रकारचे अजून लाऊंच बनवण्याचं प्लानिंग रेल्वेने सुरु केलं आहे. नवी दिल्ली विमानतळावरील प्रवाशांचा प्रतिसाद पाहून इतर शहरात हे लाऊंच उभारले जातील आणि त्यात आवश्यक ते बदलही केली जातील.

कुठल्या शहरांमध्ये नवे लाऊंच उघडणार?

IRCTCच्य म्हणण्यानुसार, पटना, लखनऊ, चंदीगढ आणि बनारसमध्ये पहिल्या टप्प्यात एक्झिक्युटीव्ह लाऊंच उभे केले जाणार आहेत. याशिवाय विविध शहरांमध्ये तब्बल 25 फूट प्लाझा उभे करण्याचा रेल्वेचा विचार आहे.

IRCTC च्या शेअरची किंमत वधारली

बुधवारी IRCTC च्या शेअर्समध्ये वाढ पाहायला मिळाली. बीएसईवर शेअर 1.52 टक्के वधारला आणि त्याचा भाव प्रतिशेअर 3680 रुपये राहिला. त्याचवेळी शेअरचा भाव पुन्हा 3.45 टक्क्यांनी वाढला आणि तो 3750 वर जाऊन पोहचला.

IRCTCच्या शेअरने पहिल्यांदाच 4 हजारांचा आकडा पार करत रेकॉर्ड बनवला आहे. 17 सप्टेंबरला IRCTCचा शेअर पहिल्यांदा 4000 हजारांचा आकडा पार करुन पुढे पोहचला. IRCTC च्या शेअरमध्ये तेव्हपासून वाढ पाहायला मिळत आहे, जेव्हापासून बोर्डाने शेअर 1:5 च्या तुलनेत तोडायला परवानगी दिली आहे.

मागच्या महिन्यात 12 ऑगस्टला IRCTC ने आपला शेअर स्टॉक स्प्लिट केला होता, त्यानंतर आतापर्यंत तब्बल प्रतिशेअर 56 टक्क्यांची वाढ झाली आहे.

IRCTC चा नफाही वाढला

2021-22 च्या आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या त्रैमासिकात IRCTCने चांगला नफा कमावला आहे. पहिल्या त्रैमासिकात 82 कोटी रुपयांच नेट प्रॉफिट झाला आहे. पहिल्या वर्षभरात कंपनीला 24 कोटींचा तोटा झाला होता. मात्र आता कंपनीच्या ऑपरेशन्स रेव्हेन्यूमध्ये 85 टक्के वाढ पाहायला मिळते आहे. जून 2020 च्या त्रैमासिकात रेव्हेन्यू 131 कोटी होता जो आता एप्रिल-जून 2021 मध्ये 243 कोटी रुपयांवर पोहचला आहे.

हेही वाचा:

 

1 ऑक्टोबरपासून ऑटो डेबिट पेमेंटचा नियम बदलणार, भुर्दंड बसण्याआधी बँकांचा नवा नियम समजून घ्या

मोठी बातमी! Zee एंटरटेनमेंट सोनी पिक्चर्समध्ये विलीन होणार, मंडळाने दिली मान्यता!