…तर पुढील आठ वर्षांत भारताची अर्थव्यवस्था दुप्पट होणार; निती आयोगाचा अंदाज

| Updated on: Mar 27, 2022 | 1:22 PM

भारताने दीर्घ काळापासून 8.5 टक्के विकासदर (Growth rate) कायम ठेवला आहे. भविष्यात आठ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक विकास दर राहिल्यास आपण येत्या सात ते आठ वर्षात दुप्पट अर्थव्यवस्थेचे (Economy) लक्ष्य गाठू शकू, असे निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी म्हटले आहे.

...तर पुढील आठ वर्षांत भारताची अर्थव्यवस्था दुप्पट होणार; निती आयोगाचा अंदाज
Follow us on

भारताने दीर्घ काळापासून 8.5 टक्के विकासदर (Growth rate) कायम ठेवला आहे. भविष्यात आठ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक विकास दर राहिल्यास आपण येत्या सात ते आठ वर्षात दुप्पट अर्थव्यवस्थेचे (Economy) लक्ष्य गाठू शकू, असे निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी म्हटले आहे. राजीव कुमार पुढे बोलताना म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था 8 टक्के दराने वाढल्यास सुमारे 7 ते 8 वर्षांमध्ये आपली अर्थव्यवस्था दुप्पट होऊ शकते. मात्र सध्याचा विकास दर भविष्यातही काय ठेवण्यासाठी आपल्याचा प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. जर प्रत्येक गोष्ट अनुकूल झाली. कोरोनाच्या चौथ्या लाटेचा भारताला सामना करावा लागला नाही आणि रशिया युक्रेन युद्धाचा जर देशाला फटाक बसला नाही तर आपण सहज पुढील आठ वर्षांमध्ये दुप्पट अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठू शकतो. भारत पुढील आठ वर्षात 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनू शकतो.

कोरोनाचा अर्थव्यवस्थेला फटका

पुढे बोलताना त्यांनी म्हटले हे सत्य आपल्याला नाकारून चालणार नाही की, भारताने 2003 पासून ते 2011 पर्यंत सातत्याने 8.5 टक्के विकासदर कायम ठेवला होता. त्यानंतर त्यात आणखी वृद्धी झाली. मात्र गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोना संकट आहे. कोरोना संकटाचा सामना देशाला करावा लागला. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात सर्व उद्योग धंदे ठप्प होते त्याचा मोठा फटका हा अर्थव्यवस्थेला बसला.

निर्बंध शिथिलतेचा अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम

मात्र आता परिस्थिती बदलली आहे. कोरोनाचा प्रदुर्भाव कमी झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने निर्बंध देखील शिथिल करण्यात आले आहेत. उद्योग-धंदे पुन्हा एकदा नव्या दमाने सुरू झाले आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम हा अर्थव्यवस्थेवर होताना दिसून येत आहे. भारताने नुकताच निर्यातीत चारशे अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. जर भविष्यात हे असंच सुरळीत सुरू राहिले तर आपण येत्या आठ वर्षांमध्ये दुप्पट अर्थव्यवस्थेचे उदिष्ट गाठू शकतो असा विश्ववास राजीव कुमार यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या

पुढील आठवडा शेअर मार्केटसाठी कसा राहणार? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

भविष्यात घरांच्या किंमती आणखी वाढणार? गुढीपाडव्याचा मुहूर्त घर खरेदीसाठी चांगला, पण खिशाला परवडणार?

सोमवार, मंगळवारी बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप; बँकिंग सेवेवर परिणाम, सलग सुट्यांमुळे ग्राहकांचे हाल