AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुढील आठवडा शेअर मार्केटसाठी कसा राहणार? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध (Russia-Ukraine crisis) सुरूच आहे. रशिया आणि युक्रेमध्ये सुरू असलेले युद्ध आणि कच्च्या तेलाच्या दरात (Crude oil price) आलेली तेजी यामुळे पुढील आठवड्यात देखील शेअर मार्केमध्ये चढ उतार कायम राहणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

पुढील आठवडा शेअर मार्केटसाठी कसा राहणार? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
शेअर मार्केट
| Edited By: | Updated on: Mar 27, 2022 | 12:37 PM
Share

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध (Russia-Ukraine crisis) सुरूच आहे. रशिया आणि युक्रेमध्ये सुरू असलेले युद्ध आणि कच्च्या तेलाच्या दरात (Crude oil price) आलेली तेजी यामुळे पुढील आठवड्यात देखील शेअर मार्केमध्ये चढ उतार कायम राहणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. शेअर बाजार विश्लेषकांनुसार रशिया युक्रेन युद्धाचा मोठा परिणाम हा जागतिक बाजारपेठेवर झाला आहे. खाद्यतेलापासून ते कच्च्या तेलापर्यंत सर्वच वस्तुंचे दर वाढले आहेत. अशा परिस्थितीमध्ये शेअर बाजारावरील दबाव कायम राहण्याची शक्यता आहे. याबाबत बोलताना (Stika Investmart Ltd) चे संशोधन प्रमुख संतोष मीणा यांनी म्हटले आहे की, सध्या जागतिक बजारात काही अंशी स्थिरता दिसून येत आहे. मात्र तरी देखील युद्धामुळे अनिश्चिता कायम राहील.

कच्च्या तेलाच्या दरामध्ये तेजी

पुढे बोलताना संतोष मीणा यांनी म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने कमी जास्त होत आहेत. त्याचा फटका अनेक कंपन्यांना बसला आहे. कच्च्या तेलाच्या दरांमध्ये आलेली तेजी ही भारतीय शेअर बाजाराच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. दुसरीकडे आपल्याला शेअर मार्केटमध्ये सहभागी असलेल्या वाहन कंपन्यांच्या विक्रीवर देखील लक्ष ठेवावे लागणार आहे. येत्या काळात वाहन विक्री घटण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ऑटो सेक्टरवर नकारात्मक परिमाण होई शकतो.

रुपयामध्ये अस्थिरता

भारतीय चलन असलेल्या रुपयांच्या मुल्यात देखील अस्थिरता दिसून येत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य कमी-अधिक होत आहे. याचा देखील शेअर मार्केटवर परिणाम दिसून येत आहे. सध्या तर गुंतवणूकदारांचा शेअरमधील गुंतवणूक मोकळी करण्याकडे कल असल्याने येणाऱ्या काळात शेअर मार्केट आणखी कोसळू शकते असं देखील काही तज्ज्ञांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

सोमवार, मंगळवारी बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप; बँकिंग सेवेवर परिणाम, सलग सुट्यांमुळे ग्राहकांचे हाल 

भविष्यात घरांच्या किंमती आणखी वाढणार? गुढीपाडव्याचा मुहूर्त घर खरेदीसाठी चांगला, पण खिशाला परवडणार?

Gold-silver price: सोन्याच्या दरवाढीला अखेर ब्रेक, सोन्याचे भाव स्थिर; चांदीच्या दरात घसरण

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.