सोमवार, मंगळवारी बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप; बँकिंग सेवेवर परिणाम, सलग सुट्यांमुळे ग्राहकांचे हाल 

सोमवार, मंगळवारी बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप; बँकिंग सेवेवर परिणाम, सलग सुट्यांमुळे ग्राहकांचे हाल 
कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर

सरकारकडून सुरू असलेले बँकांचे खासगीकरण (Privatisation of Banks) थांबवावे तसेच बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक 2021 च्या निषेधार्थ येत्या सोमवारी आणि मंगळवारी बँक कर्मचारी देशव्यापी संपावर (nationwide strike) जाण्याची शक्यता आहे.

अजय देशपांडे

|

Mar 27, 2022 | 11:45 AM

नवी दिल्ली : सरकारकडून सुरू असलेले बँकांचे खासगीकरण (Privatisation of Banks) थांबवावे तसेच बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक 2021 च्या निषेधार्थ येत्या सोमवारी आणि मंगळवारी बँक कर्मचारी देशव्यापी संपावर (nationwide strike) जाण्याची शक्यता आहे. बँक कर्मचारी संपावर गेल्यास बँका बंद राहातील. काल चौथा शनिवार होता. तसेच आज रविवारची सर्व बँकांना साप्ताहिक सुटी असते. अशा स्थितीमध्ये आणखी दोन दिवस बँका बंद राहिल्यास मोठा फटका बसू शकतो. सलग चार दिवस बँका बंद राहिल्याने एटीएममध्ये पैसे पोहोचणार नाहीत. एटीएममध्ये पैशांचा तुटवडा निर्माण झाल्यास नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. देशव्यापी संपाबाबत बोलताना देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) सांगितले की, या संपामुळे किती नुकसान होऊ शकते याचा अंदाज सध्या तरी लावला जावू शकत नाही.

एटीएममध्ये पैशांचा खडखडात

स्टेट बँक ऑफ इंडियाने पुढे म्हटले आहे की, सोमवारी आणि मंगळवारी कर्मचारी संपवर गेल्यास बँकांना सलग चार दिवस सुटी राहील. यामुळे नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. कोट्यावधीची उलाढाल ठप्प होईल. एटीएममध्ये पैसा नसल्याने नागरिकांना अडचणी येऊ शकतात. संभाव्य संपाची शक्यता लक्षात घेऊन जास्त प्रमाणात नुकसान होऊ नये यासाठी आवश्यक ती व्यस्था यापूर्वीच करण्यात आल्याचे बँकेने सांगितले.

पश्चिम बंगलामध्ये बँका सुरूच राहणार?

बँक कर्मचाऱ्यांच्या संपाची शक्यता लक्षात घेऊन पश्चिम बंगला सरकारने आधीच आपल्या सर्व सरकारी कर्मचारी आणि बँक कर्मचाऱ्यांसाठी नोटीस जारी केली आहे. येत्या सोमवारी आणि मंगळवारी बँक कर्मचारी देशव्यापी संपावर जाण्याची शक्यता आहे. मात्र पश्चिम बंगाल सरकारच्या नियंत्रणाखाली येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नियमित कामावर यावे असे आदेश या नोटीसीच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता पश्चिम बंगलामध्ये संपाच्या काळात देखील बँका सुरू राहणार का हे पहाणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

संबंधित बातम्या

Gold-silver price: सोन्याच्या दरवाढीला अखेर ब्रेक, सोन्याचे भाव स्थिर; चांदीच्या दरात घसरण

Petrol,Diesel Price: आठवड्याभरात पाचव्यांदा दरवाढ, जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

आजपासून आंतरराष्ट्रीय विमानांच्या नियमित उड्डाणास परवानगी; विदेशवारी स्वस्त होणार?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें