भविष्यात घरांच्या किंमती आणखी वाढणार? गुढीपाडव्याचा मुहूर्त घर खरेदीसाठी चांगला, पण खिशाला परवडणार?

भविष्यात घरांच्या किंमती आणखी वाढणार? गुढीपाडव्याचा मुहूर्त घर खरेदीसाठी चांगला, पण खिशाला परवडणार?
रिअल इस्टेट संदर्भातील महत्त्वाचे अपडेट
Image Credit source: Housing

1 BHK Rates in Panvel & Navi Mumbai : 2016 पासून बांधकाम साहित्याचे दर कमालीचे वाढले आहेत. ही भाववाढ आता कुणाच्याच नियंत्रणात राहिलेली नाही. त्याचा फटका सर्वच बांधकाम व्यावसायिकांना बसताना पाहायला मिळतोय.

सिद्धेश सावंत

|

Mar 27, 2022 | 12:08 PM

मुंबई : गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला नवी गोष्ट घेणं चांगलं असतं, असं मानलं जातं. याचसाठी अनेकदा ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या वेगवेगळ्या जाहिराती बाजारात झळकू लागलात. अशातच सर्वात चर्चेत असणार मार्केट कोणतं असेल तर ते रिअल इस्टेटचं (Real Estate)! रिअल इस्टेट मार्केटमध्ये सध्या जाहिरातींमधून ग्राहकांना घरखरेदीसाठी आकर्षित ठरतील, अशा वेगवेगळ्या योजना, स्किम विकासकांकडून दाखवल्या जात आहेत. मात्र घरखदेरीला (Home buying) मिळणारा उत्साह कसा असेल, याकडे या संपूर्ण क्षेत्रातील जाणकारांची नजर लागली आहे. कोरोना महामारी, लॉकडाऊन, रोजची पेट्रोल डिझेलची दरवाढ (Petrol Diesel Rates Today), वाढती महागाई इतकंच काय जीएसटी, महारेरा या सगळ्याचाही परिणाम घरखरेदीवर होताना पाहायला मिळतो आहे. दरम्यान, गेल्या तीन वर्षात साहित्याच्या किंमती अव्वाच्या सव्वा महागल्या आहेत. त्यामुळ घरांच्या किंमती वाढलेल्या आहेत. तर दुसरकीडे कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात. विकासदरातही काही उल्लेखनीय वाढ नोंदवण्यात आलेली नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर येत्या काळात घरं आणखी महाग होतील, अशी शक्यता वर्तवली जाते आहे. मुंबईपासून अगदी पनवेलपर्यंत अनेक फ्लॅट्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गुढीपाडव्याच्या निमित्तानं अनेकजण या फ्लॅट्सवर आकर्षक सवलती देत आहेत. मात्र त्याला मिळणारा प्रतिसाद कसा असणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

नवी मुंबई, पनवेलला वाढती मागणी!

कोविड महामारीत लागू करण्यात आलेले निर्बंध आता हटवण्यात आलेले आहेत. पनवेल आणि आजूबाजूच्या परिसरासह नवी मुंबईतील जागा किंवा खरेदीला लोकांची पहिली पसंती आहे. त्यामुळे या भागातील घरांच्या, सदनिकांच्या, फ्लॅट्सच्या किंमती अव्वाच्या सव्वा वाढल्या आहेत. भविष्यात या किंमती कमी होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचं बोललं जातंय. दरम्यान, येत्या काळात या भागातील जागांचे दर आणखी वाढले, तर आश्चर्य वाटायला नको.

‘काय सांगता? बिल्डर तोट्यात आहेत…!’

कोरोना काळात बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसला. त्यानंतर गेल्या एक दीड वर्षात हे क्षेत्र पुन्हा उभारी घेईल, अशी शक्यता वर्तवली जात होता. मात्र उभारी घेण्याची ही प्रक्रिया फारशी वेगवान झालेली नाही. ‘काय सांगता, बिल्डर तोड्यात आहेत?’ अशी कुजबूज यानिमित्तानं पुन्हा सुरु झाली आहे. वाढलेल्या बांधकाम क्षेत्रातील साहित्याचा, पेट्रोल दरवाढीचा फटका विकासकांना थेट बसतोय. त्यामुळे त्यांच्या नफ्यात मोठी तूट झाली आहे.

असं आहे गणित…

 1. बांधकाम क्षेत्रातील साहित्य महागलं
 2. साहित्य महागल्यानं घरांच्या किंमती महागल्या
 3. इमारत बांधण्यासाठी जमिनींच्या खरेदीवर आधीच विकासकांकडून कोट्यवधींची गुंतवणूक
 4. इंधनाचे दर वाढल्यानं इतरही अनेक अवलंबून असलेल्या गोष्टीची दरवाढ
 5. घरांच्या किमतींही पर्यायनं वाढल्या, पण विकसांना होणारा फायदा वाढला नाही
 6. अनेक गोष्टींचे दर नियंत्रणाबाहेर गेल्यानं विकासकांना आता फक्त नगण्य फायदा

2016 पासून बांधकाम साहित्याचे दर कमालीचे वाढले आहेत. ही भाववाढ आता कुणाच्याच नियंत्रणात राहिलेली नाही. त्याचा फटका सर्वच बांधकाम व्यावसायिकांना बसताना पाहायला मिळतोय.

कोणत्या गोष्टी किती महागल्या?

 1. प्लबिंगच्या साहित्यानं शंभरी ओलांडली
 2. हेल्परची मजुरी जवळपास आठशे रुपये प्रतिदिन
 3. इलेक्ट्रिशियचे दर 30 ते 45 टक्क्यांनी वाढले
 4. इलेक्ट्रीक साहित्य, प्लायवूड, ट्रान्सपोर्ट, पेंटर, फॅब्रिकेशन, ट्रान्सपोर्ट, खरेदी-विक्रीतील दलाल, जाहिरातदार या घटकांमध्ये 40 टक्क्यांपर्यंत दरवाढ

नैना बिल्डर्स वेल्फेअप असोसिएशनच्या प्रकाश बाविस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त नवी मुंबई आणि पनवेलमध्ये तब्बल दोन ते अडीच हजार प्रकल्प सध्या सुरु आहेत. यामुळे लोकांसमोर अनेक पर्याय उपलब्ध झालेत. त्याचा फटका विकासकांनाही बसतोय. मात्र पर्याय जास्त असूनही ग्राहकांना काही फार स्वस्त दरात घरं मिळत आहेत, अशातलाही काही भाग नाही. मात्र केवळ साहित्य पुरवठादारांचे पैसे देण्याइतकच काम सध्या विकासकांना उरलंय.

9 महिन्यात कोणत्या गोष्टी किती महागल्या?

दैनिक पुढारीनं दिलेल्या वृत्तानुसार गेल्या 9 महिन्यात बांधकाम क्षेत्रातील साहित्यात लक्षणीय दरवाढ नोंदवण्यात आली आहे. ही दरवाढ खालीलप्रमाणे :

 1. स्टील – आधी 65/- आता 85/-
 2. सिमेंट – आधी 315/- आता 400/-
 3. ब्लॉक – आधी 60/- आता 90/-
 4. वीट – आधी 10/- आता 15/-
 5. रेती – ब्रासमध्ये आधी 6000/- आता 7500/-
 6. मिस्त्री – आधी 1100/- आता 1200/-
 7. इलेक्ट्रीक – आधी 600/- आता 750/-
 8. रंग – आधी 2800/- आता 4000/-

या सगळ्या भाववाढीत आकर्षक जाहिराती करुनही विकासकांनी ग्राहक नेमका कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे. एकूण वाढलेल्या महागाईत गुंतवणुकीच्या पर्यायाचा विचार करण्याची सध्या तरी सर्वसामान्यांची मानसिकता दिसत नसल्याचं जाणकारांचं मत आहे. तर दुसरीकडे ऐन सवलतींच्या दरांबाबत ग्राहक कशा पद्धतीनं पाहतात, यावर सगळं अवलंबून असल्याचं बोललं जातंय.

संबंधित बातम्या :

Gold-silver price: सोन्याच्या दरवाढीला अखेर ब्रेक, सोन्याचे भाव स्थिर; चांदीच्या दरात घसरण

सोमवार, मंगळवारी बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप; बँकिंग सेवेवर परिणाम, सलग सुट्यांमुळे ग्राहकांचे हाल 

Petrol,Diesel Price: आठवड्याभरात पाचव्यांदा दरवाढ, जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें