इंडसइंड बँकेचे सणांच्या आधी एक मोठे पाऊल, गोल्ड लोनसाठी इंडेल मनीशी करार

| Updated on: Sep 30, 2021 | 7:47 AM

इंडेल मनी कंपनी प्रत्यक्षात पिवळ्या धातू अर्थात सोन्याच्या आधारावर दीर्घ मुदतीची कर्जे पुरवते. इंडेल मनीचे मुख्य कार्यकारी उमेश मोहनन यांनी बुधवारी सांगितले की, या कराराअंतर्गत इंडल मनीच्या वतीने इंडसइंड बँक आपल्या ग्राहकांना स्पर्धात्मक दराने सुवर्ण कर्ज देईल.

इंडसइंड बँकेचे सणांच्या आधी एक मोठे पाऊल, गोल्ड लोनसाठी इंडेल मनीशी करार
Follow us on

नवी दिल्लीः खासगी क्षेत्रातील बँक इंडसइंड बँकेने सुवर्ण कर्ज क्षेत्रासाठी कोचीस्थित कंपनी इंडेल मनीसोबत सह-कर्ज भागीदारी केली. कंपनीने बुधवारी एका निवेदनात म्हटले आहे की, सुवर्ण कर्ज आणि व्यावसायिक बँक यांच्यावर लक्ष केंद्रित करणारी नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) यांच्यातील ही पहिली सह-कर्ज भागीदारी आहे.

सोन्याच्या आधारावर दीर्घ मुदतीची कर्जे

इंडेल मनी कंपनी प्रत्यक्षात पिवळ्या धातू अर्थात सोन्याच्या आधारावर दीर्घ मुदतीची कर्जे पुरवते. इंडेल मनीचे मुख्य कार्यकारी उमेश मोहनन यांनी बुधवारी सांगितले की, या कराराअंतर्गत इंडल मनीच्या वतीने इंडसइंड बँक आपल्या ग्राहकांना स्पर्धात्मक दराने सुवर्ण कर्ज देईल.

80% सुवर्ण कर्जाची रक्कम इंडसइंड बँकेच्या खात्यात जमा केली जाणार

मोहनन म्हणाले की, सह-कर्ज व्यवस्थेअंतर्गत 80 टक्के सुवर्ण कर्जाची नोंद इंडसइंड बँकेच्या खात्यात केली जाणार आहे. तर उर्वरित 20 टक्के निधी इंडेल मनीद्वारे दिला जाईल. कंपनीने या करारातून व्यवस्थापनाखालील मालमत्ता वाढवण्याची किती अपेक्षा आहे हे स्पष्ट केलेले नाही. इंडसइंड बँकेचे सर्वसमावेशक बँकिंगचे प्रमुख श्रीनिवास बोनाम म्हणाले की, हे सहकार्य बँकेच्या कार्यक्षम आणि सर्वसमावेशक कर्ज देण्याच्या धोरणानुसार आहे.

2 वर्षांसाठी सुवर्ण कर्जाची ऑफर

इंडेल मनीने सोने कर्ज बाजारात प्रवेश केलाय. पूर्वी फक्त तीन महिन्यांच्या कालावधीसाठी कर्ज देणारी कंपनी आता दोन वर्षांपर्यंत कर्ज देतेय. अनेक वर्षांनंतरही इंडेल ही एकमेव सुवर्ण कर्ज कंपनी आहे, जी दोन वर्षांचे सुवर्ण कर्ज देते. इतरांनीही आता एक वर्षापर्यंत कर्ज देणे सुरू केलेय.

इंडेलच्या 191 शाखांचे नेटवर्क

केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पुद्दुचेरीमध्ये इंडेलच्या 191 शाखांचे नेटवर्क आहे. या आर्थिक वर्षात ओरिसा, बंगाल आणि महाराष्ट्रात तर पुढील आर्थिक वर्षात गुजरात आणि राजस्थानमध्ये प्रवेश करण्याची कंपनीची योजना आहे. दुसरीकडे इंडसइंडच्या 760 ठिकाणी 2,000 पेक्षा जास्त शाखा आहेत. मोहनन म्हणाले की, FY20 मध्ये इंडेल मनीचे सुवर्ण कर्ज AUM 580 कोटी रुपये होते, जे FY20 मध्ये 336 कोटी रुपये होते. या आर्थिक वर्षात कंपनीचे AUM लक्ष्य 850 कोटी रुपये आहे.

2013 मध्ये गोल्ड लोन सेगमेंटमध्ये पाऊल टाकले

गेल्या वर्षी 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल असलेल्या विविध प्रकारच्या इंडेल कॉर्पोरेशनचा एक भाग असलेल्या इंडेलने 2013 मध्ये सुवर्ण कर्जासाठी प्रयत्न केले. आधी सोने गहाण ठेवून एक वर्षासाठी कर्ज दिले जाते आणि नंतर दोन वर्षांसाठी सुवर्ण कर्ज दिले जाते. कंपनीने यापूर्वी तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ सुवर्ण कर्जाची ऑफर दिली नाही. तीन महिन्यांनंतर ते ग्राहकांच्या दागिन्यांचा लिलाव करतील आणि ग्राहकाला योजनेतून बाहेर काढतील.

संबंधित बातम्या

ज्येष्ठ नागरिकांसाठी देशात पहिल्यांदा एल्डर लाइन टोल फ्री क्रमांक, मदतीसाठी 14567 वर करा कॉल

मोदी सरकारची मोठी घोषणा, सरकारी शाळेत दुपारचं जेवण मोफत, कोट्यवधी मुलांना फायदा होणार