Tata Group : टाटा समूहाच्या या शेअरची तुफान बॅटिंग, 10 हजारांचे झाले 6 लाख

| Updated on: Jun 10, 2023 | 7:43 PM

Tata Group : टाटा समूहाच्या या शेअरने तुफान बॅटिंग केली आहे. गुंतवणूकदारांच्या 10 हजारांचे 6 लाख झाले.

Tata Group : टाटा समूहाच्या या शेअरची तुफान बॅटिंग, 10 हजारांचे झाले 6 लाख
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजाराने मरगळ झटकली आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजाराने आघाडी घेतली आहे. बाजाराने एकाच दिवसात जोरदार फायदा मिळवून दिला. काही कंपन्यांच्या शेअरने गुंतवणूकदारांना वसुली करुन दिली. टाटा समूहाच्या (Tata Group Stock) या शेअरने तुफान बॅटिंग केली. या शेअरने गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला. 10 वर्षांतच गुंतवणूकदारांना जोरदार फायदा झाला. टाटाच्या एलेक्सीने (Tata Elxsi Share Price) जबरदस्त रिटर्न दिला. ज्या गुंतवणूकदारांनी 10 वर्षांपूर्वी 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली, त्यांच्या गुंतवणूकीचे मूल्य सध्या जवळपास 6 लाख रुपये आहे.

आघाडीची कंपनी
टाटा समूहाच्या अनेक कंपन्या शेअर बाजारात आहेत. तर काही कंपन्या शेअर बाजारात नाही. टाटाची उत्पादने विश्वसनीय म्हणून ओळखल्या जातात. टाटा एलेक्सी ऑटोमोटिव्ह, मीडिया, टेलिकॉम, हेल्थकेअर आणि ट्रान्सपोर्टेशन सह अनेक सेक्टरमध्ये डिझाईन आणि टेक्नॉलॉजी सेवा पुरविणारी अग्रेसर कंपनी आहे. कंपनी ऑटोमोटिव्ह आणि ट्रान्सपोर्टेशन इंडस्ट्रीजमध्ये अग्रगण्य ओईएम आणि पुरवठ्यासोबतच आरएंडडी, डिझाईन आणि प्रोडक्ट इंजिनिअरिंग सेवामध्ये काम करते.

शेअरहोल्डिंग पॅटर्न
कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, सर्वसामान्य गुंतवणूकदारांकडे कंपनीचा 56.08 टक्के हिसा आहे. तर प्रमोटर्सकडे या कंपनीचा 43.92 टक्के वाटा आहे.

हे सुद्धा वाचा

टाटा एलेक्सीच्या शेअरचा भाव
टाटा एलेक्सीच्या शेअरचा भाव शुक्रवारी 0.38 टक्क्यांनी घसरला. हा शेअर 7,815 रुपयांवर बंद झाला. गेल्या काही महिन्यात या शेअरमध्ये 9.73 टक्क्यांची तेजी दिसून आली. गेल्या सहा महिन्यात हा शेअर 16.78 टक्क्यांनी वधारला. या स्टॉकमध्ये यावर्षी आतापर्यंत 24.04 टक्क्यांची तेजी दिसून आली. एका वर्षात या शेअरमध्ये 9.16 टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या पाच महिन्यात या शेअरने 500 टक्के परतावा दिला आहे.

तिमाही निकाल जोरदार
आर्थिक वर्ष 2022-23 मधील चौथ्या तिमाहीत Tata Elxsi चा निव्वळ नफा 25 टक्क्यांनी वाढून तो 201 कोटी रुपयांवर पोहचला. एक वर्षांपूर्वीच्या समान तिमाहीत हा आकडा 160 कोटी रुपये होता.

कंपनी होईल कर्जमुक्त
टाटा समूहाची कंपनी टाटा मोटर्सचे (Tata Motors Share) तिमाही निकाल लवकरच हाती येणार आहे. यावेळी कंपनी जोरदार कामगिरी करु शकते, असा अंदाज बांधण्यात येत आहे. आर्थिक वर्ष 2025 पर्यंत टाटा मोटर्स कर्जमुक्त होईल, असा अंदाज मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेज लिमिटेडने व्यक्त केला आहे. या ब्रोकरेज फर्मने हे शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक खरेदी करणे फायद्याचे गणित ठरु शकते. टाटा कंपनीवर गुंतवणूकदारांचा मोठा विश्वास आहे. हा शेअर काही दिवसातच लांबचा पल्ला गाठेल. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फायदा होईल.

हा कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यापूर्वी बाजाराचा, कंपनीचा अभ्यास जरुर करावा. गुंतवणूक तज्ज्ञ, विश्लेषकाची मदत आवश्य घ्यावी. त्याशिवाय गुंतवणूक करणे जोखमीचे ठरेल.