Petrol Diesel Price : 78 दिवसांत 51% टक्क्यांनी महागलं कच्च तेल आणि.. , तुमच्या शहरात इंधनाचे दर किती ?

15 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ करण्यात आली. एप्रिल 2022 नंतरची ही पहिलीच दरवाढ होती. कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने होणारी वाढ आणि डॉलरच्या तुलनेत सातत्याने घसरणारा रुपया ही या दरवाढीमागची मुख्य कारणं होती. अमेरिका- इराण युद्धाच्या काळात कच्च्या तेलाच्या किमती 50 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत, तर डॉलरच्या तुलनेत रुपया 5 टक्क्यांहून अधिक घसरला आहे.

Petrol Diesel Price : 78 दिवसांत 51% टक्क्यांनी महागलं कच्च तेल आणि.. , तुमच्या शहरात इंधनाचे दर किती ?
इंधनाचे दर
| Updated on: May 17, 2026 | 8:28 AM

28 फेब्रुवारीला अमेरिका-इस्त्रायलने मिळून इराणवर हल्ला चढवला आणि मोठ्यायुद्धाला तोंड फुटलं. जेव्हापासून हा संघर्ष सुरू झाला, ते फक्त या तीन देशांसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी डोकेदुखीचं कारण ठरलं आहे. कारण अमेरिका-इराण युद्धाला सुरूवात झाल्यापासून आतापर्यंत कच्चा तेलाच्या किमतीमध्ये तब्बल 51 टक्के वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत 100 डॉलरच्या पार गेली आहे. मात्र भारतसाठी ही एक मोठी समस्या ठरली आहे. यामागे एक कारण आहे. भारताला दुहेरी फटका बसला आहे. एकीकडे कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 100 डॉलरच्या वर आहेत, तर दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपया हा सातत्याने घसरत आहे.

या दोन्ही गोष्टींचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि तिजोरीवर अधिक तीव्रतेने जाणवत आहे. यामुळेच पेट्रोलियम कंपन्यांनी अलीकडेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांनी वाढ केली. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, येत्या काही दिवसांत इंधनाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या देशाची राजधानी दिल्लीसह इतर मोठ्या शहरांमध्ये, तुमच्या शहरांत पेट्रोल आणि डिझेलचे सध्याचे दर किती आहेत ? चला जाणून घेऊया.

पुन्हा वाढले पेट्रोल आणि डिझेलचे दर ?

आयओसीएलच्या आकडेवारीनुसार, देशाची राजधानी दिल्लीसह इतर महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिलेत. म्हणजेच 15 मे रोजी झालेल्या दरवाढीनंतर सलग दुसऱ्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलचे दर तेच राहतील. आयओसीएलच्या आकडेवारीनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर हे अनुक्रमे, 97.77 रुपये आणि 90.67 रुपये प्रति लिटर आहेत. तर कोलकाता येथे पेट्रोलचा दर 108.74 रुपये आणि डिझेलचा दर 95.13 रुपये प्रति लिटर आहे. तर देशाची आर्थिकक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर सध्या अनुक्रमे 106.68 रुपये आणि 93.14 प्रति लिटर इतके आहेत. आणि चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोल 103.67 रुपयांना तर डिझेल 95.25 रुपयांना मिळतंय.

इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमतीत 51 टक्क्यांनी वाढ

विशेष म्हणजे, इराण युद्धाच्या काळात कच्च्या तेलाच्या किमतीत 50 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, 27 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात आखाती देशांमधून येणाऱ्या कच्च्या तेलाचा व्यापार प्रति बॅरल 72.48 डॉलर दराने होत होता. तेव्हापासूनच, ब्रेंटच्या किमती जवळपास 51 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 109.26 डॉलरवर पोहोचल्या आहेत. दरम्यान, अमेरिकन क्रूड (डब्ल्यूटीआय) च्या किमतीत 57 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, 27 फेब्रुवारी रोजी अमेरिकन क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरल 67.02 डॉलर होती आणि आता ती प्रति बॅरल105.42 डॉलरवर पोहोचली आहे.

रुपयांत 5 टक्क्यांहून अधिक घसरण

एकीकडे कच्च तेल, इंधनाच्या किमती वाढत असतानाच दुसरीकडे, इराण युद्धाच्या काळात डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात 5 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. 27 फेब्रुवारी रोजी चलन बाजारात रुपया डॉलरच्या तुलनेत 91.08 च्या पातळीवर होता. आतापर्यंत त्यात 5.19 टक्क्यांची घसरण झाली. 15 मे रोजी रुपया डॉलरच्या तुलनेत 95.81 वर बंद झाला. याचा अर्थ, या आठवड्यात रुपया डॉलरच्या तुलनेत 4.73 रुपयांनी घसरला. दरम्यान, आठवड्याच्या व्यवहाराच्या दिवसांमध्ये रुपया 230 पैशांनी घसरल्याचं दिसून आलं.

 

Follow Us