AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समृद्धी महामार्गावरून प्रवास करताय? सावधान! रात्रीच्या अंधारात….; सरकारी अधिकाऱ्याचा जीव थोडक्यात वाचला 

समृद्धी महामार्गावरू प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांवर दगडफेक केली जात आहे, असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  

समृद्धी महामार्गावरून प्रवास करताय? सावधान! रात्रीच्या अंधारात....; सरकारी अधिकाऱ्याचा जीव थोडक्यात वाचला 
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 20, 2026 | 9:52 AM
Share

समृद्धी महामार्गावर प्रवास करणार्‍यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. समृद्धी महामार्गावर शासकीय वाहनावर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आली आहे.  वाशिम जिल्हा रुग्णालयाच्या कार्यालयीन अधीक्षकांच्या वाहनाची समोरची काच फुटली. सावंगी परिसरातील चॅनेल क्रमांक 426 जवळ घटना घडली. या वाहनातील पाचही जण सुखरूप असून मोठी दुर्घटना टळली आहे. समृद्धी महामार्गावरील सहा महिन्यातील आठवी दगडफेकीची घटना आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. छत्रपती संभाजीनगरजवळील सावंगी परिसरात वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयाचे कार्यालय अधीक्षक हिंमत राठोड यांच्या शासकीय वाहनावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. या घटनेत वाहनाची समोरील काच फुटली आहे. यात सुदैवाने वाहनातील पाचही जण सुखरूप आहेत. राठोड हे सहकाऱ्यांसह शासकीय बैठकीसाठी वाशिमहून पुण्याकडे जात असताना चॅनेल क्रमांक 426 जवळ हा प्रकार घडला. विशेष म्हणजे, घटनेनंतर 112 क्रमांकावर तीन वेळा फोन करूनही मदत मिळाली नसल्याचा आणि दोन तास प्रतीक्षा करूनही पोलिसांचे पथक न पोहोचल्याचा आरोप राठोड यांनी केलाय. महामार्ग पोलिसांचे पथक मात्र 20 मिनिटांत घटनास्थळी पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेसह आपत्कालीन मदत यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

वर्ध्यात पोलिसांकडून खास उपाय 

दरम्यान, वर्ध्यातही समृद्धी महामार्गावर लूटमार, दरोडा, चोरी हे गुन्हे वारंवार होत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे महामार्गावर रात्रीच्या सुमारास घडणाऱ्या घटनेने चिंता व्यक्त करण्यात येत होती. वर्धा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर लुटमारीचे अंत्यत गंभीर गुन्हे घडत असल्याने वाहनधारकांमध्ये भीती पसरली होती. यामुळे शासन चिंतेत पडले होते. त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून खास उपाय प्रस्तावित करण्यात आले. वर्ध्यातील एकूण ६१ किलोमीटरचा समृद्धी महामार्ग सिंदी रेल्वे, सेलू, सावंगी आणि पुलगाव या चार पोलीस स्टेशन हद्दीतून जातोय. या संपूर्ण भागात सुरक्षेची व्यवस्था आखण्यात आली. त्यामुळे आता वर्ध्या प्रमाणे वाशिममध्ये सुरक्षिततेसाठी काय पावले उचलली जातात, हे पाहावे लागेल.

Follow Us
राहुल गांधींचा दावा! केंद्रातील मंत्री आमच्या संपर्कात, 8 महिन्यात...
राहुल गांधींचा मोठा दावा! केंद्रातील मंत्री विरोधकांच्या संपर्कात, 8 महिन्यांत मोठ्या घडामोडी?
छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रुटवालाचा खळबळजनक व्हिडीओ व्हायरल...
छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रुटवालाचा खळबळजनक व्हिडीओ व्हायरल, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या...
दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय, आता
Drought Affected Students : दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय, आता वार्षिक...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाच्या नावावरून वाद, थेट न्यायालयात..
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाच्या नावावरून वाद कायम, थेट न्यायालयात याचिका दाखल
शरद पवार, वळसे पाटील आणि भुजबळ येणार एकाच मंचावर? राजकीय वर्तुळात...
शरद पवार, वळसे पाटील आणि भुजबळ येणार एकाच मंचावर? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
केद्र सरकारचा मोठा निर्णय; वाहनाच्या PUC प्रमाणपत्राच्या वैधतेसाठी...
PUC : केद्र सरकारचा मोठा निर्णय; वाहनाच्या PUC प्रमाणपत्राच्या वैधतेसाठी नवे नियम जारी...
तुम्ही कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला का? पंतप्रधान मोदींचा उद्योगपतींना...
PM Modi : तुम्ही कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला का? पंतप्रधान मोदींचा उद्योगपतींना थेट सवाल
सोनिया गांधींच्या पुस्तकावर बंदी घाला! बड्या नेत्याची CM देवेंद्र...
सोनिया गांधींच्या पुस्तकावर बंदी घाला! बड्या नेत्याची CM देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी
दादरच्या नामकरणावरून संभ्रम दूर! रेल्वे स्थानकाला नाही, मेट्रो...
दादरच्या नामकरणावरून संभ्रम दूर! रेल्वे स्थानकाला नाही, मेट्रो स्टेशनला मिळणार चैत्यभूमी नाव
मुंबई बँक निवडणुकीसाठी शिंदेसेनेची मोठी तयारी; स्वबळावर लढणार? आजच्या
मुंबई बँक निवडणुकीसाठी शिंदेसेनेची मोठी तयारी; स्वबळावर लढणार? आजच्या बैठकीत ठरणार रणनीती!