19 कोटी पॅन कार्ड रद्द होणार, तुमचं नाव आहे का?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

मुंबई : पॅनकार्डला आधारकार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2019 जवळ येत आहे. मात्र अजूनही देशातील 50 टक्के पॅनकार्डधारकांनी आपले पॅनकार्ड  आधारसोबत जोडलेलं नाही. जे पॅनकार्डधारक 31 मार्चपर्यंत आपले पॅनकार्ड आधारकार्डसोबत लिंक करणार नाहीत,  त्या सर्वांचं पॅनकार्ड रद्द होणार आहे. सुप्रीम कोर्टाने आधारकार्डवर सुनावणी करताना पॅनकार्ड आधारसोबत जोडणे अनिवार्य असल्याचे सांगितले. सुप्रीम कोर्टाने पॅन […]

19 कोटी पॅन कार्ड रद्द होणार, तुमचं नाव आहे का?
Follow us on

मुंबई : पॅनकार्डला आधारकार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2019 जवळ येत आहे. मात्र अजूनही देशातील 50 टक्के पॅनकार्डधारकांनी आपले पॅनकार्ड  आधारसोबत जोडलेलं नाही. जे पॅनकार्डधारक 31 मार्चपर्यंत आपले पॅनकार्ड आधारकार्डसोबत लिंक करणार नाहीत,  त्या सर्वांचं पॅनकार्ड रद्द होणार आहे. सुप्रीम कोर्टाने आधारकार्डवर सुनावणी करताना पॅनकार्ड आधारसोबत जोडणे अनिवार्य असल्याचे सांगितले. सुप्रीम कोर्टाने पॅन आणि आधारकार्ड जोडण्यासाठी शेवटची मुदत 31 मार्च 2019 पर्यंतची दिली आहे.

आयकर विभागाने आतापर्यंत 42 कोटी पॅनकार्डचे वाटप केले आहे. यामध्ये 23 कोटी लोकांनी पॅनकार्ड आधारसोबत जोडले आहे, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाचे चेअरमन सुशील चंद्रा यांनी दिली. ते म्हणाले, “आधारसोबत पॅन लिंक केल्याने कोणाकडे बनावट पॅन आहे आणि कोणाकडे नाही याची माहिती समोर येईल. जी बनावट पॅनकार्ड आहेत ती आम्ही रद्द करु”

पॅनकार्ड जर आधारकार्डसोबत जोडले आणि पॅन बँक खात्यासोबत जोडलेले असेल, तर त्यामुळे आयकर विभाग करदात्याची संपूर्ण माहिती सहज मिळवू शकतील. शिवाय अन्यत्र आधार लिंक करुन फायदे घेतले जात असतील, तर त्याचीही माहिती मिळेल, असंही चंद्रा म्हणाले.

यावर्षी आतापर्यंत 6.31 कोटी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल झाले आहेत. गेल्यावर्षी ही संख्या 5.44 कोटी इतकी होती. यंदा 95 लाख नवीन करदात्यांनी आयटी रिटर्न भरल्याचं चंद्रा यांनी सांगितलं.