ITR भरताना येतेय अडचण? नेमकं काय करावं? जाणून घ्या सविस्तर…

आयटीआर दाखल करण्याची आजची शेवटची तारीख आहे. मात्र अनेकांना वेगवेगळ्या अडचणी येत आहेत. या अडचणी येऊ नयेत म्हणून काय करावे हे प्राप्तिकर विभागाने सांगितले आहे.

ITR भरताना येतेय अडचण? नेमकं काय करावं? जाणून घ्या सविस्तर...
ITR 2025 FILING
| Updated on: Sep 15, 2025 | 6:16 PM

ITR 2025 : वित्त वर्ष 2024-25 साठी आयटीआर भरण्याची शेवटची तारीख अगोदर 31 जुलै होती. त्यानंतर ही तारीख 15 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली. म्हणजेच आज (15 सप्टेंरबर) आयटीआर भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळेच आयटीआर दाखल करण्याचा करदाते प्रयत्न करत आहेत. एकाच वेळी अनेकजण आयटीआर भरण्याचा प्रयत्न करत असल्याने या पोर्टलवर तांत्रिकदृष्ट्या अडचणी येत आहेत. विशेषत: AIS डाऊनलोड करण्यासाठी समस्या येत असल्याचे सांगितले जात आहे.

प्राप्तिकर विभागाने दिली होती सूचना

बऱ्याच करदात्यांना ही अडचण येत असली तरी सर्वच ठिकाणी ही समस्या नाहीये. तुम्हाला आयटीआर भरताना अडचण येऊ नये यासाठी प्राप्तिकर विभागाकडून काही विशेष ब्राऊजर्सचा वापर करावा, असा सल्ला देण्यात येत आहे. प्राप्तिकर विभागाचे पोर्टल व्यवस्थित काम करत असले तरी एकाच वेळी आयटीआर भरणाऱ्यांची संख्या प्रचंड असल्यामुळे काही करदात्यांना अडचण येत आहे. हीच संभाव्य अडचण लक्षात घेऊन प्राप्तिकर विभागाने 13 सप्टेंबर 2025 रोजी एक संदेश दिला होता. यापुढे AIS कोणत्याही थर्ड पार्टी अॅप किंवा संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार नाही. AIS डाऊनलोड करण्याचा एकच मार्ग आहे. अगोदर तुम्हाल ई-फायलिंग आयटीआर पोर्टलवर तुम्हाला लॉगिन करावे लागेल. त्यानंतर AIS कंम्पालायन्स पोर्टलवर (https://ais.insight.gov.in/complianceportal/ais) जावे आणि तेथून AIS डाऊनलोड करून घ्यावी, असे प्राप्तिकर विभागाने आपल्या सूचनेत सांगितले होते.

आयटीआर भरताना अडचण येऊ नये यासाठी काय करता येईल?

आयटीआर दाखल करताना तुम्हाला या अडचणी येऊ नयेत म्हणून मायक्रोसॉफ्ट एज (व्हर्जन 88 वापरावे), मॉझिला फायरफॉक्स (86+), ओपेरा (66+) यासारख्या ब्राऊजर्सचा वापर करावा. तसेच ब्राऊजरमधील कुकीज आणि इतर कॅचे क्लियर करावेत. हायस्पीड इंटरनेट वापरावे. यांच्या मदतीने तुम्हाला आयटीआर भरता येईल.

आयटीआर दाखल करण्याची तारीख वाढली का?

दरम्यान, आयटीआर भरण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आल्याचा दावा केला जात होता. मात्र हा दावा फोल असल्याचे प्राप्तिकर विभागाने सांगितले आहे. त्यामुळे 15 सप्टेंबरपर्यंतच तुम्हाला आयटीआर भरता येणार आहे.