Jio : वर्षभराची झंझट संपणार! एकदाच 1,234 रूपयांचा रिचार्ज आणि वर्षभराची वैधता मिळावा, त्यासोबत 168 GB डेटा आणि बरंच काही
दर महिन्याला मोबाईल रिचार्ज करण्याचा कंटाळा येतो ना? केव्हा केव्हा लक्षातही नाही राहत आणि सिम बंद पडून जातं. मग काळजी नको. मग हा जिओचा प्लॅन तुमच्यासाठीच आहे.

दर महिन्याला मोबाईल रिचार्ज करण्याचा कंटाळा येतो ना? केव्हा केव्हा लक्षातही नाही राहत आणि सिम बंद पडून जातं. मग काळजी नको. 1234 रूपयांचा जिओचा प्लॅन हा तुमच्यासाठीच आहे.
कमी किमतीत दीर्घकाळ कॉलिंग आणि इंटरनेटची सुविधा तसेच बरेच 4G फिचर या रिचार्जमध्ये दररोज 500MB HIGH SPEED डेटा मिळतो.
म्हणजेच संपूर्ण वैधतेदरम्यान एकूण 168GB डेटा वापरता येतो. दररोजचा डेटा संपल्यानंतर 64KBPS डेटा वापरता येतो. त्यामुळे इंटरनेटची चिंताच संपली.
या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधाही देण्यात आली आहे. तसेच दर 28 दिवसांनी 300 नॅशनल MMS मिळतात. त्यामुळे कॉलिंग आणि मर्यादित इंटरनेट वापरणाऱ्यांना ग्राहाकांना हा पर्याय उपयोगी ठरू शकतो.
मात्र हा प्लॅन प्रत्येक मोबाईलसाठी नाही, जिओच्या अधिकृत माहितीनुसार हा रिचार्ज फिजिकल किपॅड असलेल्या आणि जिओच्या 4G LTE/ VOLT नेटवर्कला सपोर्ट करणाऱ्या फीचर फोनवरचं वापरता येतो. त्यामुळे रिचार्ज करण्यापू्र्वी आपला फोन पात्र आहे की नाही हे तपासा