Jio IPO Update : जिओच्या आयपीओची तुफान हवा! शेअर मार्केटचा इतिहास भूगोल बदलणार, ग्रे मार्केटमध्ये काय चाललंय? वाचा Price Band काय?

या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये सध्या चांगली स्थिती असून जीपीएम 151 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हा आयपीओ 37000 कोटी रुपये ते 27800 कोटी रुपयांचा असू शकतो.

Jio IPO Update : जिओच्या आयपीओची तुफान हवा! शेअर मार्केटचा इतिहास भूगोल बदलणार, ग्रे मार्केटमध्ये काय चाललंय? वाचा Price Band काय?
jio ipo update
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 07, 2026 | 1:16 PM

Jio IPO Opening Date : गेल्या बऱ्याच दिवसांपासून जिओच्या आयपीओची चर्चा सुरू आहे. हा आयपीओ नेमका कधी येतोय याची गुंतवणूकदार वाट पाहतायत. विशेष म्हणजे हा आयपीओ गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स देऊ शकतो, असा प्राथमिक अंदाज लावला जातोय. असे असतानाच आता या आयपीओ ओपनिंगबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी पैसे तयार ठेवावेत, असं सांगितलं जातंय. या आयपीओची ग्रे मार्केटमध्येही चांगलीच चर्चा आहे.

नेमकी काय माहिती समोर आली?

मिळालेल्या माहितीनुसार येत्या 21 ऑक्टोबर रोजी जीओचा आयपीओ सूचिबद्ध होऊ शकतो. या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये सध्या चांगली स्थिती असून जीपीएम 151 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हा आयपीओ 37000 कोटी रुपये ते 27800 कोटी रुपयांचा असू शकतो. विशेष म्हणजे या आयपीओतून दिले जाणरे सर्व शेअर हे फ्रेश असतील. या आयपीओचा किंमत पट्टा हा 1350 रुपये ते 1450 रुपये हो असू शकतो. ही कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध झाल्यानंतर या कंपनीचे मूल्यांकन12.40 लाख कोटी ते 13.40 लाख कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत किंवा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा कंपनी सूचिबद्ध व्हायला हवी यासाठी प्रयत्न केले जातायत.

Loading...

आयपीओ कधी सुरू होणार, कधी सूचिबद्ध होणार?

जीओचा आयपीओ अँकर गुंतवणूकदारांसाठी 19 ऑक्टोबर 2026 रोजी खुला होऊ शकतो. सोबतच सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी हा आयपीओ 21 ऑक्टोबर रोजी खुला होऊ शकतो. शेअरचा लॉट घेण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर असू शकते. याच दिवशी शेअर्सचे अलॉटमेंटही होऊ शकते. त्यानंतर जीओ ही कंपनी शेअर बाजारावर 28 ऑक्टोबर रोजी शेअर बाजारात सूचिबद्ध होऊ शकते. जीओ ही टेलिकॉम क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us