आतापर्यंत 22,810 कोटींचं वाटप, 21 लाख लोकांना फायदा, सरकारच्या ‘या’ योजनेची 30 जून डेडलाईन

| Updated on: Jun 20, 2021 | 8:41 PM

केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या (Ministry of Labour and Employment) आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचा (ABRY) आतापर्यंत 21 लाख लोकांनी फायदा घेतलाय. त्यांना 22 हजार 810 कोटी रुपयांचं वाटपही झालंय.

आतापर्यंत 22,810 कोटींचं वाटप, 21 लाख लोकांना फायदा, सरकारच्या या योजनेची 30 जून डेडलाईन
Follow us on

नवी दिल्ली : केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या (Ministry of Labour and Employment) आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचा (ABRY) आतापर्यंत 21 लाख लोकांनी फायदा घेतलाय. त्यांना 22 हजार 810 कोटी रुपयांचं वाटपही झालंय. सरकारच्या या योजनेची अंतिम मुदत 30 जून आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेतलेला नसेल तर अशा व्यक्तींसाठी ही चांगली संधी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार या योजनेची अंतिम मुदत वाढवण्यावरही विचार करत आहे. या योजनेला मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात नव्या नियुक्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे (Know all about Aatmanirbhar Bharat Rojgar Yojana ABRY and benefits).

केंद्रीय मंत्रिमंडळाने (Union Cabinet) एबीआरवायला मागील वर्षी डिसेंबरमध्ये मंजुरी दिली होती. या योजनेत सरकार कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी अनिवार्य करण्यासोबतच 2 वर्षांसाठी नव्या नियुक्त्यांबाबतही तरतूद करण्यात आली.

31 मार्चपर्यंत डेडलाईन

आतापर्यंत 22,810 कोटी रुपये वाटप करण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या या योजनेत 1 ऑक्टोबर 2020 ते 30 जून 2021 पर्यंत नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश होतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता कामगार मंत्रालय या योजनेची मुदत 30 जून 2021 वरुन वाढवून मार्च 2022 पर्यंत करणार आहे.

या योजनेचा लाभ कुणाला घेता येतो

या योजनेंतर्गत EPFO मध्ये रजिस्टर्ड संस्थांमध्ये नियुक्ती होणाऱ्या आणि 15,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेतो येतो. याशिवाय 15,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी मासिक वेतन असणारे, 1 ऑक्टोबर 2020 च्या आधी ईपीएफओशी संबंधित संस्थेत नोकरी न करणारे आणि UAN किंवा ईपीएफ सदस्यता खातं नसणारे कर्मचारी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

यूएएन खातं असणारे आणि 15,000 रुपयांपेक्षा कमी वतेन असणारे, परंतू 1 मार्च 2020 ते 30 सप्टेंबर 2020 दरम्यान कोविड-19 संसर्गाच्या काळात नोकरी गमावलेले आणि त्यानंतर ईपीएफओशी संबंधित कोणत्याही संस्थेत नोकरी न करणारे ईपीएफओ सब्सक्राइबर्स देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

हेही वाचा :

सरकारच्या ‘या’ योजनेत महिन्याला फक्त 55 रुपये द्या आणि 36 हजार रुपये पेंशन मिळवा

मुंबई APMC भाजीपाला मार्केट संचालकांचा अजब कारभार, कामगारांकडून ओळखपत्रासाठी पैसे घेण्याचे प्रकार

लॉकडाऊन काळात दीड लाखांहून अधिकांचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश

व्हिडीओ पाहा :

Know all about Aatmanirbhar Bharat Rojgar Yojana ABRY and benefits