Gold Rate Today : आज सोनं घ्यायचं की थांबायचं ? खरेदीपूर्वी नक्की जाणून घ्या आजचे भाव

Gold Rate Today 6 August Latest News Updates in Marathi : सणासुदीचा हंगाम जवळ येत असून सोनं-चांदी खरेदी करण्यास ग्राक उत्सुक आहेत. तुम्हालाही आजखरेदी करायची असेल, तर आजचे देशांतर्गत भाव जाणून घ्या..

Gold Rate Today : आज सोनं घ्यायचं की थांबायचं ? खरेदीपूर्वी नक्की जाणून घ्या आजचे भाव
सोन्याचे आज दर पाहिलेत का ?
| Updated on: Aug 06, 2026 | 8:31 AM

देशभरातील सराफा बाजारात आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. जागतिक बाजारातील तेजीचा थेट परिणाम भारतीय बाजारावर दिसून येत असून, 6 ऑगस्ट रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर अनेक प्रमुख शहरांमध्ये 1.45 लाख रुपयांच्या पुढे पोहोचला आहे. लग्नसराई, सणासुदीचा हंगाम आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला कल यामुळेही सोन्याच्या किमतींना आधार मिळत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर 1,45,910 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला असून, मुंबई, पुणे, चेन्नई, कोलकाता आणि बेंगळुरू येथे हा दर 1,45,760 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका नोंदवला गेला आहे. त्याचवेळी 22 कॅरेट सोन्याचे दरही लक्षणीयरीत्या वाढले असून, ग्राहकांना दागिने खरेदीसाठी आता अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

जागतिक बाजारातील तेजीचा भारतावर परिणाम

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती सातत्याने वाढत आहेत. सध्या स्पॉट गोल्डचा दर 4,162.76 डॉलर प्रति औंस इतका झाला आहे. या वाढीमागे अनेक जागतिक घडामोडी कारणीभूत असल्याचे बाजार विश्लेषक सांगतात.

विशेष म्हणजे, जगातील सर्वाधिक महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गांपैकी एक असलेल्या स्ट्रेट ऑफ होर्मुझ या समुद्री मार्गाबाबत अमेरिका आणि इराण यांच्यात सकारात्मक तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जागतिक महागाईबाबतची चिंता काहीशी कमी झाली असून, अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवण्याची शक्यता कमी झाल्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक वाढल्याने सोन्याच्या किमतींना आणखी बळ मिळाले आहे.

देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे दर

दिल्ली

24 कॅरेट: 1,45,910 रुपये प्रति 10 ग्रॅम

22 कॅरेट: 1,32,240 रुपये प्रति 10 ग्रॅम

मुंबई

24 कॅरेट: 1,45,760 रुपये प्रति 10 ग्रॅम

22 कॅरेट: 1,33,610 रुपये प्रति 10 ग्रॅम

कोलकाता

24 कॅरेट: 1,45,760 रुपये प्रति 10 ग्रॅम

22 कॅरेट: 1,33,610 रुपये प्रति 10 ग्रॅम

चेन्नई

24 कॅरेट: 1,45,760 रुपये प्रति 10 ग्रॅम

22 कॅरेट: 1,33,610 रुपये प्रति 10 ग्रॅम

शहर 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर  (₹) 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर  (₹)
दिल्ली 133760 145910
मुंबई 133610 145760
अहमदाबाद 133660 145810
चेन्नई 133610 145760
कोलकाता 133610 145760
हैदराबाद 133610 145760
जयपुर 133760 145910
भोपाळ 133660 145810
लखनऊ 133760 145910
चंदीगड 133760 145910

चांदीनेही गाठला उच्चांक

सोन्यासोबतच चांदीच्या किमतींमध्येही जोरदार वाढ झाली आहे. देशांतर्गत बाजारात चांदीचा दर प्रति किलो 2,40,100 रुपये इतका झाला असून, गुंतवणूकदारांसाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही स्पॉट सिल्व्हरचा दर वाढून 61.35 डॉलर प्रति औंस इतका पोहोचला आहे. औद्योगिक मागणी आणि जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे चांदीच्या किमतींना पाठबळ मिळत आहे.

सणासुदीचा हंगाम आणि जागतिक आर्थिक घडामोडी लक्षात घेता, येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये आणखी चढ-उतार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक या दोघांच्याही नजरा आता सराफा बाजाराकडे लागल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us