
नवी दिल्ली : जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल आणि तुम्हाला ते बनवायचं असेल तर आता हे काम अगदी सोपं झालं आहे. यासाठी कोणत्याही मध्यस्थाची म्हणजेच एजंटची गरज नाही. हे काम तुम्हीही करु शकता. यासाठी तुम्हाला केवळ 10 मिनिटं पुरेशी आहेत. जर तुम्हाला ऑनलाईन माध्यमातून तात्काळा पॅन कार्ड बनवू इच्छि असाल तर इनकम टॅक्सच्या नव्या अधिकृत वेबसाईटवर याची सोपी पद्धत आहे. वेबसाईट बदलल्याने पॅन कार्डची पद्धत बदलली असून अधिक वेळेची बचत करणारी आहे (Know how to apply for Pan Card within 10 Minutes on new income tax website).
विशेष म्हणजे येथे पॅन कार्ड बनवण्यासाठी कोणतेही शुल्क देण्याची किंवा कागदपत्र देण्याची गरज नाही. Instant Pan Card सुविधेमुळे विना वाट पाहता तुम्ही तात्काळ तुमची अडचण सोडवू शकता. यासाठी ऑनलाईन अर्ज करत पॅन नंबर तयार होतो. हे पॅन कार्ड इतर सामान्य पॅन कार्डप्रमाणेच वैध असतं. यासाठी कोणत्याही कागदपत्राची गरज नाही. ऑनलाईननंतर तुम्हाला पॅन कार्डची प्रत घरीही मागवता येते.
हेही वाचा :
व्हिडीओ पाहा :
Know how to apply for Pan Card within 10 Minutes on new income tax website