Stock Market Today: शेअर बाजारात करायची आहे कमाई ? जाणून घ्या बाजारातील संकेत

बुधवारी 80 हून अधिक कंपन्यांच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांची नजर असणार आहे. त्याचा थेट परिणाम बाजारावर दिसून येईल. त्यामुळे या कंपन्या नेमकं कसं परफॉर्म करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Stock Market Today: शेअर बाजारात करायची आहे कमाई ? जाणून घ्या बाजारातील संकेत
| Edited By: | Updated on: Jul 27, 2022 | 12:02 PM

मंगळवारचा दिवस शेअर बाजारासाठी (Share market) संमिश्र ठरला. काही स्टॉक्समध्ये घसरण झाल्याचे दिसून आले तर काही निवडक स्टॉक्समधून गुंतवणूकदारांची (Investors) कमाईही झाली. त्यामुळे बुधवारीही शेअर बाजारात स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन पहायला मिळेल, असे जाणकारांचे मत आहे. बुधवारी 80 हून अधिक कंपन्यांच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांची नजर असणार आहे. तसेच मंगळवारीही चर्चेत असलेल्या अनेक स्टॉक्सचा (Stocks) बुधवारी शेअर बाजारावर परिणाम दिसून येईल. जर तुम्हाला आज चांगले ट्रेडिंग करायचे असेल तर शेअर बाजारातील संकेत आणि काही स्टॉक्सवर नजर ठेवा. त्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो.

या कंपन्यांच्या शेअर्सवर राहणार नजर

शेअर बाजारात आज (बुधवारी) 80 हून अधिक कंपन्यांच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांची नजर असणार आहे. त्याचा थेट परिणाम बाजारावर दिसून येईल. त्यामुळे या कंपन्या नेमकं कसं परफॉर्म करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मारुती आणि टाटा मोटर्सचे निकाल लागणार आहेत. यामुळे फक्त याच कंपन्यांच्या स्टॉक्सवर नव्हे तर संपूर्ण सेक्टरवर परिणाम होऊ शकतो. या कंपन्यांमध्ये आरती ड्र्ग्स, एपीएल अपोलो ट्यूब्स, बजाज फायनॅन्स, बायोकॉन, ब्ल्यूडार्ट, कोलगेट पामोलिव्ह इंडिया, धामपूर शुगर, आयआयएफएल, मारुती, एसकेएफ इंडिया, टाटा मोटर्स , युबीएल यांचा समावेश आहे.

हे शेअर्स राहतील चर्चेत

  1. साऊथ इंडियन बँकेने त्यांचे तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. जून 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत बँकेने 1115035 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत बँकेला 10 कोटी रुपयांचा नफा झाला होता.
  2. युनायटेड स्पिरिट्स कंपनीच्या पहिल्या तिमाहीतील नफ्यात पाचपट वाढ होऊन तो 261.1 कोटी रुपयांवर पोहोचला.
  3. टाटा मोटर्सने कार लोन संदर्भात इंडियन बँकेशी करार केला आहे.
  4. एल ॲंड टी कंपनीच्या जून महिन्यातील तिमाहीच्या नफ्याक 44.9 टक्के वाढ झाली आहे. कंपनीला 1,702 कोटी रुपये नफा झाला.
  5. टाटा पॉवर कंपनीचा जून महिन्यात संपलेल्या तिमाहीचा नफा 9 टक्क्यांनी वाढून 888.54 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनी 14 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
  6. ॲक्सिस बँक व सिटी बँकेदरम्यान झालेल्या कराराला सीसीआयची (CCI) मंजूरी मिळाली आहे.