युद्धामुळे जगाचा बाजार कोमात, पण हा शेअर एकदम जोमात! जाणून घ्या, जगातल्या सर्वात महागड्या शेअरबद्दल

| Updated on: Mar 15, 2022 | 5:15 PM

World most expensive stock share : जगातील सर्वात महागडा ठरलेल्या या शेअरमध्ये 10 टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षीतुलनेत ही उल्लेखनीय वाढ वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांत नोंदवण्यात आली आहे

युद्धामुळे जगाचा बाजार कोमात, पण हा शेअर एकदम जोमात! जाणून घ्या, जगातल्या सर्वात महागड्या शेअरबद्दल
जगातला सगळ्यात महागडा शेअर
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

ब्युरो : शेअर मार्केट (Share Market) हा पैसे कमावण्याच्या (Earn more money) एक उत्तम आणि पर्यायी मार्ग म्हणून पाहिला जातो. शेअर बाजारात काय घडतंय, कोणता शेअर तेजीत आहे, कुणाचा शेअर घटला आहे, या गोष्टींनाही त्यामुळे महत्त्व येतं. या सगळ्याबाबत चर्चाही तितक्यात जोरात रंगतात. दरम्यान, जगातला सगळ्यात महागडा शेअर (Most expensive share) कोणता आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? जगातल्या सगळ्यात महागड्या शेअरची किंमत लाखात नव्हे तर कोटींमध्ये आहे. एक, दोन नाही, तर तब्बल साडे तीन कोटी पेक्षाही जास्त किंमतीचा एक शेअर असलेल्या जगातल्या महागड्या शेअर बद्दल सध्या चर्चा रंगली आहे. सर्वाधिक किंमतीच्या या एका शेअरचं मूल्य तब्बल 3 कोटी 82 लाख 65 हजार इतकं आहे. आता ज्यांनी कुणी हा शेअर घेतलेला असेल, ते किती मालामाल झाले असतील, याची निव्वळ कल्पना केलेली बरी. चला तर जाणून घेऊयात नेमका हा शेअर कोणत्या कंपनी आहे? जगातल्या कोणत्या शेअर बाजारात त्याची इतकी जबरदस्त किंमत आली आहे? या सोबत इतरही काही रंजक गोष्टींबाबत…

  1. कुणाचाय शेअर? बर्कशायर हॅथवे नावाची एक कंपनी आहे. या कंपनीचा एक शेअर जगातला सगळ्यात महागडा शेअर ठरलाय.
  2. कुणाची कंपनी? बर्कशायर हॅथवे ही वॉरेन बफे यांची कंपनी आहे.
  3. कोण आहे वॉरेन बफे? वॉरेन बफे हे एक जागणार गुंतवणूकदार असून ते जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत मोडतात. जगातली श्रीमंत लोकांच्या यादीत वॉरेन यांचा पाचवा नंबर लागतो.
  4. जग कोमात, हा शेअर जोमात! एकीकडे कोरोना महामारी, दुसरीकडे युक्रेन-रशिया युद्ध, वाढती महागाई अशात जगभरातील शेअर बाजार कोसळलाय. तर दुसरीकडे बर्कशायर हॅथवे मात्र जोमात असल्याचं दिसून आलंय.

दणदणीत वाढ!

रॉयटर्सनं दिलेल्या माहितीनुसार, जगातील सर्वात महागडा ठरलेल्या या शेअरमध्ये 10 टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षीतुलनेत ही उल्लेखनीय वाढ वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांत नोंदवण्यात आली आहे. अमेरिकेतील शेअर बाजारात एकीकडे 12 टक्के पडझड झाली असली, तरी बर्कशायर क्लास ए शेअरची किंमती दणदणीत वाढली आहे. नेब्रास्काच्या ओमाहामध्ये या कंपनींचं मुख्यालय आहे.

बर्कशायरचा बहुतांश व्यवसाय आणि काम हे अमेरिकेतच आहे. या कंपनीत 3 लाख 72 हजार कर्मचारी आहेत. यातील 77 टक्के कर्मचारी हे अमेरिकेतीलच आहेत. आता ही कंपनीनं इतरही देशात विस्तार करण्याच्या विचारात आहेत. या कंपनीचे मालक बफे यांनी 1965 साली या टेक्सटाईल कंपनीची कमान सांभाळली होती. याचा शेअर सुरुवातील 20 डॉलर पेक्षाही कमी होती. 2021 साली या कंपनीकडे 146.7 अब्ज डॉलर इतकी रोकड होती.

संबंधित बातम्या :

शेअर बाजारात पहिल्यांदाच गुंतवणूक करताय? या गोष्टींकडे द्या विशेष लक्ष

Share Market : 5 दिवसांच्या तेजीनंतर पुन्हा ब्रेक, 700 अंकाची घसरण! 2.7 लाख कोटींचा चुराडा

डेल्टाक्रॉनमुळं कोरोनाच्या नव्या लाटेचं संकट? अमेरिकेसह युरोपमध्ये रुग्ण वाढले, वेरिएंट किती धोकादायक?