शेअर बाजारात पहिल्यांदाच गुंतवणूक करताय? या गोष्टींकडे द्या विशेष लक्ष

शेअर बाजारात (Stock Market) गुंतवणूक करणे एकाच वेळी रोमांचकही असते आणि भीतीदायकही. यातून मिळणारा मोबदला मोहात पाडणारा असतो, तर जोखीमही (Risk) भयावह ठरू शकते.

शेअर बाजारात पहिल्यांदाच गुंतवणूक करताय? या गोष्टींकडे द्या विशेष लक्ष
शेअर बाजारात (Stock Market) गुंतवणूक करणे एकाच वेळी रोमांचकही असते आणि भीतीदायकही.
अक्षय चोरगे

|

Mar 15, 2022 | 1:34 PM

मुंबई : शेअर बाजारात (Stock Market) गुंतवणूक करणे एकाच वेळी रोमांचकही असते आणि भीतीदायकही. यातून मिळणारा मोबदला मोहात पाडणारा असतो, तर जोखीमही (Risk) भयावह ठरू शकते. शेअर बाजारात प्रथमच गुंतवणूक (Investment) करणाऱ्यांनी कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे याबद्दल सांगताहेत एंजेल वन लिमिटेडचे इक्विटी स्ट्रॅटजिस्ट ज्योती रॉय यांनी गुंतवणूकदारांना काही सल्ले दिले आहेत. रॉय यांच्या मते शेअर बाजारातील गुंतवणुकांकडून अतिअपेक्षा न ठेवणे, शेअर बाजारातील गुंतवणुकांबाबत समतोल आणि नियोजित दृष्टिकोन ठेवल्यास, त्या बहुतेकदा चांगला मोबदला मिळवून देत असल्या, तरी शेअर बाजार म्हणजे जादूची कांडी किंवा जिनी नाही हे समजून घेणेही अत्यावश्यक आहे. गुंतवणुकीच्या संपूर्ण प्रवासात अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे हे नव्याने गुंतवणूक करणाऱ्याने लक्षात घेतलेच पाहिजे.

प्रारंभिक गुंतवणूक निश्चित करणे, शेअर बाजारात नव्याने गुंतवणूक करणाऱ्यांसाठी प्रारंभिक गुंतवणुकीचे वेगवेगळे मार्ग आहेत. एक म्हणजे एक मोठी रक्कम वेगवेगळ्या समभागांमध्ये गुंतवली जाऊ शकते, किंवा एखाद्या पद्धतशीर गुंतवणूक योजनेचा अवलंब केला जाऊ शकते. एक निश्चित रक्कम इक्विटी समभाग किंवा म्युच्युअल फंड्स यांसारख्या सिक्युरिटीजमध्ये घातली जाऊ शकते. नव्याने गुंतवणूक करणाऱ्यांपुढील पहिली पायरी म्हणजे या दोन पद्धतींपैकी कोणत्याही पद्धतीद्वारे शेअर बाजारात किती पैसा गुंतवायचा आहे हे निश्चित करणे होय.

  1. गुंतवणूक उद्दिष्ट निश्चित करणे: हा सल्ला खूपच मुलभूत स्वरूपाचा वाटत असला, तरी नव्याने गुंतवणूक सुरू करणाऱ्याने, शेअर बाजारात प्रवेश करणारे मोठे पाऊल टाकण्यापूर्वी, अचूक लक्ष्य निश्चित केलेच पाहिजे. व्यक्तीचे गुंतवणूक लक्ष्य जोखमीला दिले जाणारे प्राधान्य आणि आयुष्यातील उद्दिष्टे यांवर अवलंबून असते. ते लक्ष्य परदेश प्रवास किंवा स्वप्नातील घर हे असू शकते. भव्य उद्दिष्ट असणे महत्त्वाचे नाही, तर गुंतवणूक प्रवास सुरू करण्यापूर्वी ते निश्चित करणे महत्त्वाचे आहे.
  2. शेअर बाजारातील गुंतवणुकीचे वेगवेगळे मार्ग समजून घेणे: शेअर बाजारातील गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्याचे अनेक मार्ग आहेत. उदाहरणार्थ, डेट आणि इक्विटी सिक्युरिटीजचा समावेश असलेला वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ तयार केला जाऊ शकतो. नव्याने गुंतवणूक करणारे इंडेक्स फंडांचाही विचार करू शकतात. इंडेक्स फंड्स म्हणजे सेन्सेक्स व निफ्टीसारख्या निर्देशांकांची प्रतिकृती असतात आणि अनेक वित्तीय संस्थांद्वारे ते ऑपरेट केले जातात. तुम्ही रोबो-सल्लागारांचाही लाभ घेऊ शकता. अनेक फिनटेक कंपन्यांनी अलीकडेच रोबो सल्लागार आणले आहेत. हे रोबो-सल्लागार म्हणजे एआय-पॉवर्ड यंत्रणा असतात. त्या भूतकाळातील नमुने तसेच वेगवेगळ्या शेअर्सची कामगिरी विचारात घेऊन गुंतवणूकदारांना अपेक्षित कामगिरीची सूचना देतात. या सल्ल्यामागे गंभीररित्या केलेले संशोधन व संख्यात्मक विश्लेषण असल्याने तो खूपच खात्रीशीर असतो.
  3. पोर्टफोलिओमध्ये वैविध्याचा समावेश: पुन्हा एकदा हा मुद्दाही तुलनेने सरळ भासू शकतो; पण नव्याने गुंतवणूक करणारे अनेकदा याचा विचार करण्यास विसरतात. शेअर बाजारातील तेजीच्या भावनेमुळे इक्विटी, निर्देशांक व डेरिएटिव्ह्ज वर चढत जातात. नव्याने गुंतवणूक करणाऱ्यांना याची भुरळ पडते आणि ते नियोजित पोर्टफोलिओच्या तुलनेत अधिक पैसा या वर जाणाऱ्या घटकांमध्ये घालू शकतात. मात्र, पहिल्या पायरीवर निश्चित केलेल्या प्रारंभिक वितरणाला चिकटून राहणे कधीही उत्तम ठरते. याशिवाय, सगळी अंडी एकाच टोपलीत उबवायला ठेवल्यास काही वेळा अधिक मोबदला मिळणे शक्य आहे पण त्याहून अधिक शक्यता तोटा होण्याची असते. त्यामुळे विविधीकरणाचे लाभ घेण्यासाठी पोर्टफोलिओ समतोल ठेवणे निर्णायक ठरते. याचा अर्थ पैसा, डिबेंचर्स, रोखे (फिक्स्ड मार्केट सिक्युरिटीज), इक्विटीज (मोठ्या, छोट्या व मध्यम भांडवलाच्या कंपन्या) आणि इंडेक्स फंड्स अशा वेगवेगळ्या पर्यायांमध्ये ठेवणे. प्रत्येक पर्यायातील गुंतवणुकीचे प्रमाण हे व्यक्तीच्या जोखीम प्राधान्यावर अवलंबून असते.
  4. गुंतवणूक प्रवासाच्या सुरुवातीला मोठी जोखीम टाळणे: नव्याने गुंतवणुकीला सुरुवात करणाऱ्यांनी फ्युचर्स आणि ऑप्शन्ससारख्या अतिजोखमीच्या सिक्युरिटीज टाळाव्यात. या डेरिएटिव सिक्युरिटीजमध्ये मोठा तोटा होऊ शकतो, कारण त्यामध्ये घसरण झाल्यास कोणतेही संरक्षण नसते. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार सगळी रक्कम गमावून बसू शकतो. वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये हे घडत नाही.
  5. पोर्टफोलिओचा माग ठेवणे, परीक्षण करणे व देखरेख ठेवणे : गुंतवणुकीचे नियोजन ज्या निश्चित काळासाठी केलेले असते, त्या काळात, सिक्युरिटीजच्या किंमतीचा तसेच कंपन्या काय करत आहेत याचा, नव्याने गुंतवणूक करणाऱ्याने कायम माग ठेवला पाहिजे, परीक्षण केले पाहिजे आणि त्यावर देखरेख ठेवली पाहिजे. उदाहरणार्थ, गुंतवणूकदाराने गुंतवणुकीसाठी मारुती सुझुकीची निवड केली असेल, तर समभागाच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्याशिवाय त्याने औद्योगिक व कंपनीशी निगडित बातम्यांसारख्या अनेकविध मुद्दयांवरही लक्ष ठेवले पाहिजे. यामुळे बाजाराबाबत माहिती मिळवण्यात आणि किंमतीतील हालचालींची कारणे जाणून घेण्यात मदत होईल.

इतर बातम्या

शेअर बाजारात 900 अंकांची वाढ, गुंतवणूकदारांच्या जिवात जीव! पण रुपयांचं मूल्य आणखी घसरल्यानं चिंता

Share Market : शेअर्स बाजारात तेजीचा चौकार, सेन्सेक्स 86 अंकांनी वधारला; फार्माची बाजी

बाजारात चैतन्य परतले; मुंबई निर्देशांकांने घेतली 1552 अंकांची उसळी तर निफ्टीमध्ये 411 अंकांची तेजी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें