AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाजारात चैतन्य परतले; मुंबई निर्देशांकांने घेतली 1552 अंकांची उसळी तर निफ्टीमध्ये 411 अंकांची तेजी

उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा, उत्तराखंड आणि पंजाबमधील निवडणुकीचे निकाल हाती येत आहे, सत्ताधा-यांची मजल दरमजल सुरु असल्याच्या चर्चांनी बाजारात उधाण आले आहे. बाजारात पुन्हा एकदा चैतन्य निर्माण झाले असून मुंबई निर्देशांकांने घेतली 1552 अंकांची उसळी तर निफ्टीमध्ये 411 अंकांची तेजी नोंदवली आहे.

बाजारात चैतन्य परतले; मुंबई निर्देशांकांने घेतली 1552 अंकांची उसळी तर निफ्टीमध्ये 411 अंकांची तेजी
शेअर बाजाराचे ताजे अपडेट्स..Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Mar 10, 2022 | 11:09 AM
Share

आज पाच राज्यांचे निकालांचे पडघम वाजू लागले आहेत. सत्ताधा-यांच्या बाजूने कल जाताच बाजारात तेजीची लहर पसरली. बाजाराने सुरुवातीच्या सत्रातच उसळी मारली. बीएसई सेन्सेक्स (BSE SENSEX) आणि निफ्टी 50 (NIFTY 50) ने व्यापा-याच्या 2 टक्के जास्त आघाडी घेतली. आंतरराष्ट्रीय बाजारातील कालच्या काही घडामोडींमुळे बाजाराला मदत मिळाली होती. तर आज देशातील पाच राज्यातील निवडणुकींचे निकाल धडकायला लागताच बाजाराने कूस बदलली. बीएसई सेन्सेक्सने 1100 अंकांची भरारी घेतली, बीएसई सध्या 55,800 अंकाच्या पातळीवर आहे. तर एनएसई निफ्टी 50 ने 500 अंकांची उडी घेतली आहे. हा निर्देशांकाने सध्या 16757 पातळीच्या मोर्चोवर जम बसविला आहे. सर्वात मोठी बातमी म्हणजे आज निर्देशांकाने नकारात्मक नाही तर सकारात्मक सुरुवात केली आणि अनेक कंपन्यांच्या शेअरची हिरव्या संकेतवर (Share Market on Green Signals) घौडदौड सुरु आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांना आज मोठे हायसे वाटले असणार. गुंतवणुकदारांचे आणि जनतेचे देशातील निकालांकडे लक्ष लागले आहे. कारण दिल्लीच्या सत्तेचा राजमार्ग उत्तरेतील राज्यांमधून जातो. भविष्यातील देशाच्या घडामोडींचे अंदाज या निकालातून बांधता येणार आहे.

या शेअरमध्ये तेजीचे सत्र

अॅक्सीस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, बजाज फिशरीव्ह, एशियन पेटंस्, हिंदुस्थान युनिलिव्हर, बजाज फायनान्स यांनी आज निर्देशांकात कमालीची आघाडी घेतली आहे. हे शेअर घौडदौड करत आहेत. तर निफ्टी मेटलसह इतर विभागातही आनंदाची लहर दिसून येत आहे. या विभागातील अनेक शेअर सकारात्मक दिशेने घौडदौड करत आहे. बँक निफ्टीत ही कमालीची तेजी दिसून आली. बँक निफ्टीत 3.6 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर निफ्टी ऑटो 3.15 टक्क्यांनी वधरला, निफ्टी एफएमसीजीत 2 टक्क्यांची वाढ झाली. तर निफ्टी आयटी इंडेक्समध्ये अर्ध्या टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे.

रुपया वधारला

आज भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत 28 पैशांनी वधरला. आज डॉलरच्या तुलनेत रुपया 76.28 रुपये इतका होता. काल डॉलरची किंमत 76.56 रुपये होती. कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्याने, युएई आणि ईराण तेलाचे उत्पादन वाढवणार असल्यांच्या बातम्यांनी रुपयाला थोडी बळकटी मिळाली आहे. आयसीआयसीआय डिरेक्टच्या मतानुसार, आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे रुपया आज मजबूत स्थिती राहील. तर दुसरीकडे डॉलर ही गेल्या काही दिवसांपेक्षा मजबूत स्थिती राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. निवडणुकातील निकालांचे परिणाम येत्या काही दिवसात शेअर बाजारावरही दिसून येतील.

हेही वाचा:

शेअर बाजारातील अपडेटः या दोन शेअरवर ठेवा लक्ष, चांगल्या कमाईची मिळेल संधी

अमेरिकेची शिष्टाई आली कामी; UAE ने उत्पादन वाढीच्या संकेतांनी खनिज तेलाच्या किंमती घसरल्या

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.