AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेची शिष्टाई आली कामी; UAE ने उत्पादन वाढीच्या संकेतांनी खनिज तेलाच्या किंमती घसरल्या

अमेरिकेची शिष्टाई कामी आली आहे. अमेरिकेतील युएईच्या राजदुतांनी त्यांचा देश खनिज तेल उत्पादन वाढवण्याच्या आणि पुरवठ्याच्या तयारीत असल्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे क्रुड ऑईलच्या किंमतीत मोठी घसरण झाली.

अमेरिकेची शिष्टाई आली कामी; UAE ने उत्पादन वाढीच्या संकेतांनी खनिज तेलाच्या किंमती घसरल्या
खनिज तेलाच्या किंमती घसरल्या
| Edited By: | Updated on: Mar 10, 2022 | 10:05 AM
Share

खनिज तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घसरण दिसून आली. मीडिया रिपोर्टनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किंमतींवर (International Market Crude Oil prices) आगडोंब उसळला असताना युएईने तेल उत्पादन (UAE Oil Production) वाढविण्यावर भर दिला आहे. तसेच पुरवठा ही जलद करण्याची तयारी चालवली आहे. अमेरिकेच्या शिष्टाईमुळे हा पेचप्रसंग सुटण्याची शक्यता आहे. या शक्यतेमुळेच तेलाच्या किंमतीत मोठी घसरण दिसून आली. काल तेलाच्या किंमतीत 18 टक्क्यांनी घसरण झाली. ब्रेंट क्रुड (Brent Crude Price) 113 डॉलर प्रति बॅरलवर आल्या आहेत. परवापर्यंत आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेट क्रुड 139.13 डॉलर प्रति बॅलर होते. 14 वर्षांपूर्वी कच्च्या तेलाच्या किंमतींची ही सर्वोच्च पातळी होती. ती परवा कच्चा तेलाने गाठली होती. रशिया-युक्रेन संघर्षामुळे तेलाच्या किंमतीत एका आठवड्यात 30 टक्के वाढ दिसून आली. त्यामुळे सर्वच अर्थव्यवस्था धास्तावल्या होत्या.

या कारणांमुळे किंमती घसरणार फायनान्शेइल टाईम्सने याविषयीचे वृत्त दिले आहे. अमेरिकेतील युएईच्या राजदुतांच्या दुजो-याने त्यांनी वृत्त दिले आहे. त्यानुसार, युएई खनिज तेल उत्पादन वाढविण्याच्या प्रयत्नात आहे. तर दुसरीकडे रॉयटर्स या वृत्तसंस्थेने बाजारातील घडामोडींआधारे, युएई लगेचच 8 लाख बॅरल ते उत्पादन वाढवणार असल्याचे वृत्त दिले आहे. त्यामुळे रशियावरील निर्बंधामुळे तेलाचा निर्माण झालेला तुटवडा भरुन निघू शकेल. तर चर्चा यशस्वी झाल्यास भविष्यात ईराणकडूनही कच्च्या तेलाचा पुरवठा होऊ शकतो. त्यामुळे किंमती आटोक्यात आणण्यात मोठी मदत होऊ शकते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील मागणीनुसार पुरवठा होऊ शकतो. तेलाच्या किंमती वाढलेल्या राहिल्या तर तेल खरेदीदार देश पुढे येणार नाही, त्याची ही चिंता तेल उत्पादक देशांना सतावत आहे. त्यामुळे ओपेक ही तेल उत्पादक देशांची संघटना उत्पादन वाढीवर भर देणार आहे

आता काय आहे स्थिती वृत्त लिहीपर्यंत, मे महिन्यातील करारनुसार, ब्रेंट क्रुड जवळपास 12 टक्के घसरण दिसून आली आणि खनिज तेल 113 डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरले. तर काल 15 डॉलर प्रति बॅरल किंमती घसरल्या होत्या. ब्रेंट क्रुड गेल्या सत्रात जवळपास 128 डॉलर प्रति बॅरलवर बंद झाले होते. घसरणीच्या सत्रानंतर ब्रेंट 105 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. तर डब्ल्यूटीआई क्रूड 11 टक्क्यांनी घसरुन 110 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. गेल्या आठवड्यात क्रूड ऑईलमध्ये 28 टक्क्यांची तेजी बघायला मिळाली होती.

संबंधित बातम्या : 

जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर, आपल्या शहराचे दरपत्रक घ्या जाणून! 

शेअर बाजारातील अपडेटः या दोन शेअरवर ठेवा लक्ष, चांगल्या कमाईची मिळेल संधी

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.