जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर, आपल्या शहराचे दरपत्रक घ्या जाणून! 

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये आगडोंब उसळला असताना आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल डिझेलचे दर चार महिन्यांपासून स्थिर आहेत. त्यामुळे देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल प्रतिलिटर १०० रुपयांपेक्षा कमी आहेत. तुमच्या शहरातील भाव जाणून घ्यायचे आहेत तर एसएमएसवर माहिती घेऊ शकता

जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर, आपल्या शहराचे दरपत्रक घ्या जाणून! 
आजचे पेट्रोल-डिझेलचे दर
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 9:24 AM

Petrol-Diesel Prices Today: रशिया-युक्रेनच्या युद्धानंतर (Russia-Ukraine War) तुटवड्यामुळे खनिज तेलाच्या किंमतीमध्ये आगडोंब (Crude Oil Price) उसळला आहे. आज पाच राज्यांच्या निवडणुकांचा कल देशाने वृत्तवाहिन्यांवरुन जाणून घेतला, आता थोड्याच वेळात निकाल जाहीर होतील. या निकालानंतर इंधन दरवाढीचा बॉम्ब फुटणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. आज तरी सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol-Disel Prices) कोणतीही वाढ केलेली नाही. इंधन दरात कुठलाही बदल केला नाही. गेल्या 4 महिन्यांपासून देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर आहेत.

4 नोव्हेंबर 2021 रोजीपासून वाहन इंधनाच्या किंमतीत बदल झालेला नाही. केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 5 रुपयांनी तर डिझेलवर प्रतिलिटर १० रुपयांनी उत्पादन शुल्क कमी केले, तेव्हापासून अनेक शहरांमध्ये पेट्रोल १०० रुपये लिटरच्या अवाक्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल भडकले आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले आहे. मात्र देशातंर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. त्यांच्या दरावर काहीएक परिणाम झाला नाही. आतापर्यंत निवडणुकांमुळे केंद्र सरकारने इंधन दरवाढ रोखली होती. आज निकाल लागल्यानंतर संध्याकाळी पेट्रोलबॉम्ब फुटणार की उद्या त्याला सामोरे जावे लागणार हे स्पष्ट होईल.

देशाच्या राजधानीत आज पेट्रोल 95.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. उत्पादन शुल्क कपातीपूर्वी वाहन इंधनाचे दर देशभरातील सर्वोच्च पातळीवर पोहोचले होते. बहुतेक शहरांमध्ये पेट्रोलने 100 रुपयांचा आकडा पार केला होता. दुसरीकडे अनेक शहरांमध्ये डिझेलने प्रतिलिटर 100 रुपयेही ओलांडले होते. याशिवाय उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोल 95.13 रुपये आणि डिझेल 86.80 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडले आहे. वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रुड (WTI Crude) फ्युचर्स, युएस ऑईल बेंचमार्क च्या किंमतींत रविवारी कमाल वाढ नोंदवण्यात आली. खनिज तेल 130.50 डॉलर प्रति बॅरल झाले. जुलै 2008 मध्ये खनिज तेल या किंमतीवर होते. आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेट क्रुड 139.13 डॉलर प्रति बॅलर होते. जुलै 2008 मध्ये या किंमती होत्या. त्यानंतर 13 वर्षे या किंमतींनी एवढा उच्चस्तर गाठला नव्हता. सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपया गडगडला आणि तो उच्चांकी 77.01 प्रति डॉलरवर पोहचला.

देशातील 4 महानगरांसह प्रमुख शहरांमध्ये आजचे भाव

– दिल्ली पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर

– मुंबई पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर

– चेन्नई पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर

– कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लिटर

– गांधीनगर पेट्रोल 95.35 रुपये आणि डिझेल 89.33 रुपये प्रति लिटर

– लखनऊ पेट्रोल 95.13 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर…

संबंधित बातम्या : 

Share Market : Exit Pollचा बूस्टर, तेजीचे सलग 2 दिवस; सेन्सेक्स 1223 अंकांनी वधारला

मोठी बातमी! LIC IPO ला सेबीची हिरवी झेंडी; 31 कोटींपेक्षा अधिक इक्विटी शेअर्स सरकार विकणार

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.