Petrol Diesel Price : महागाईचा भडका, पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ, देशातील सर्वात महाग पेट्रोल-डिझेल कुठे?

खाद्यपदार्थांच्या वस्तूंपासून इंधन, स्वयंपाकाचा गॅस याच्या किंमती सातत्याने वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

Petrol Diesel Price : महागाईचा भडका, पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ, देशातील सर्वात महाग पेट्रोल-डिझेल कुठे?
पेट्रोल-डिझेल दर
Follow us
| Updated on: Jul 17, 2021 | 8:08 AM

मुंबई : सर्वसामान्यांसाठी वाढती महागाई हे सर्वात मोठे आव्हान ठरत आहे. खाद्यपदार्थांच्या वस्तूंपासून इंधन, स्वयंपाकाचा गॅस याच्या किंमती सातत्याने वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. आज (शनिवार 17 जुलै) तेल कंपन्यांकडून पुन्हा एकदा पेट्रोलच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. तर डिझेलचे दर मात्र स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढ होत आहे.

आज देशातील चार मेट्रो शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात 30 पैसे प्रतिलिटरने वाढ झाली आहे. तर राजधानी दिल्लीत आज प्रतिलिटर पेट्रोलची किंमत वाढून 101.84 रुपये झाली आहे. तसेचे डिझेलची किंमत मात्र अद्याप प्रतिलिटर 97.45 रुपये आहे.

देशातील सर्वात महाग पेट्रोल-डिझेल कुठे?

देशभरातील सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल राजस्थानमधील गंगानगर आणि मध्य प्रदेशातील अनुपपूर या ठिकाणी आढळत आहे. गंगानगरमध्ये आज पेट्रोल 113.21 रुपये आणि डिझेल 103.15 रुपये दराने उपलब्ध आहे. तर अनूपपूरमध्ये आज पेट्रोलची किंमत 112.78 रुपये तर डिझेलची किंमत 101.15 रुपये प्रतिलिटर आहे.

जुलै महिन्यात नव्यांदा पेट्रोलच्या दरात वाढ

दरम्यान यामुळे जुलै महिन्यात सलग नऊ वेळा पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. तर डिझेलच्या किंमती या 5 वेळा वाढल्या आहेत. तर एकदा त्यात घट करण्यात आली आहे. यापूर्वी जून महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तब्बल 16 दिवस वाढवण्यात आल्या होत्या. तर मे महिन्यातही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 16 दिवस वाढवण्यात आल्या. किरकोळ इंधन दरामधील ही दरवाढ 4 मे 2021 पासून सुरू झाली आहे. यापूर्वी 5 राज्यांमधील निवडणुकांच्या दरम्यान सलग 18 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झाला नव्हता.

शहर  पेट्रोल (रुपये/लिटर)  डिझेल (रुपये/लिटर)
नवी दिल्‍ली  101.84 89.87
मुंबई 107.83 97.45
कोलकाता 102.08 93.02
चेन्‍नई 102.49 94.39
नोएडा  99.02 90.34
बंगळूरु 105.25 95.26
हैदराबाद 105.83 97.96
पाटणा 104.25 95.51
जयपूर 108.71 99.02
लखनऊ 98.92 90.26
गुरुग्राम 99.46 90.47
चंडीगढ़ 97.93 89.50

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता.

(Petrol Diesel Price Fuel Rate Today 17 July 2021)

संबंधित बातम्या : 

10 ऑगस्टला देशभरात बत्ती गुल होण्याची शक्यता; सरकारचा एक निर्णय ठरू शकतो कारणीभूत

Tata 1MG franchise : केवळ 10 हजारात टाटा ग्रुपचे पार्टनर व्हा, महिन्याला मोठी कमाई

Aadhar card | आधार कार्डशी संबंधित तक्रार करण्याची नेमकी प्रक्रिया काय?

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.