AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market : 5 दिवसांच्या तेजीनंतर पुन्हा ब्रेक, 700 अंकाची घसरण! 2.7 लाख कोटींचा चुराडा

Sensex Nifty Updates Today : मंगळवारी शेअर बाजार सातशे अंकानी कोसळला आहे. त्यामुळे अडीच लाख कोटीपेक्षा जास्त रुपयांचा चुराडा झाला आहे. जागतिक घडामोडींचे परिणाम मुंबई शेअर मार्केटवर दिसून येत आहेत.

Share Market : 5 दिवसांच्या तेजीनंतर पुन्हा ब्रेक, 700 अंकाची घसरण! 2.7 लाख कोटींचा चुराडा
शेअर बाजारात पुन्हा धास्ती!Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Mar 15, 2022 | 4:34 PM
Share

मुंबई : मागच्या आठवड्यात सेन्सेक्स (SENSEX) सावरताना दिसला होता. निफ्टीमध्येही वाढ दिसून आली होती. या आठवड्याच्या पहिल्या दिवशीही बाजार सकारात्मक असल्यानं गुंतवणूकदरांच्या जीवात जीव आला होता. मात्र मंगळवारी शेअर बाजार (Share Market) सातशे अंकानी कोसळला आहे. त्यामुळे अडीच लाख कोटीपेक्षा जास्त रुपयांचा चुराडा झाला आहे. जागतिक घडामोडींचे परिणाम मुंबई शेअर मार्केटवर दिसून येत आहेत. मंगळवारी 709 अंकांची घसरण झाली, तर निफ्टी 208 अंकांनी पडला आहे. 16 हजार 663 अंकावर शेअर बाजार आज बंद झाला. दिवसभराच्या चढउतारात एक हजारपेक्षाही जास्त अंकाची पडझड पाहायला मिळाली. एटीएफसी बँकसह रिलायन्सच्या (Reliance) शेअर्समध्येही घट झाली आहे. तर फ्युचर ग्रूप आणि रिलायन्स यांच्यातील 24 हजार 713 कोटी रुपयांच्या करारावरही अद्यात स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी खबरदारी बाळगत पैसे गुंतवणताना आस्ते कदम केल्याचं चित्र मंगळवारी पाहायला मिळालंय. फक्त सात शेअर आज तेजीत होते. तर टॉप थर्टीमधील तब्बल 23 शेअरमध्ये घट नोंदवण्यात आली आहे.

पुन्हा ब्रेक… पुन्हा धास्ती..

  1. महिंद्रा एंड महिंद्रा, मारुती आणि नेस्ले इंडियाच्या शेअरमध्ये मंगळवारी तेजी पाहायला मिळाली
  2. टाटा स्टील, कोटक महिंद्र बँक, टेक महिंद्राचे शेअर तीन टक्के घटले.
  3. रिलाईन्सचा शेअर 2.28 टक्क्यांनी घटलाय.
  4. एचडीएफसीचा शेअर 1.66 टक्क्यांनी पडलाय.
  5. मंगळवारच्या पडझडीमध्ये बीएसई लिस्टेड कंपन्यांची मार्केट कॅप आता 251.55 लाख कोटी रुपये इतकी घसरली आहे.
  6. गुंतवणूकदारांचे मंगळवारी 2.7 लाख कोटी रुपये बुडालेत.

पेटीएमला गळती!

गेल्या दोन दिवसांत पेटीएमचा शेअर 25 टक्क्यांपर्यंत खाली घसरलाय. मंगळवारी पेटीएमच्या शेअरमध्ये 12.71 टक्के इतकी घट झाली आहे. यामुळे पेटीएममध्ये पैसे गुंतवलेल्यांना मोठा धक्का बहसलाय. पेटीएमचा शेअर सध्या 589 रुपये इतका खाली आला आहे.

अमेरिका आणि युरोपच्या फ्युचर बाजारातही घट पाहायला मिळाली आहे. याचा परिणाम भारतीय बाजारावरही होतोय. फेब्रुवारीत किरकोळ महागाई 6.07 टक्क्यांवर पोहोचली आहे. सलग दुसऱ्या महिन्यात महागाईचा दर 6 टक्क्यांच्या पार असल्यानं आरबीआयसमोरील आव्हानंही आता वाढलेली आहेत. गुंतवणूकदारही वाढत्या महागाईमुळे धास्तावल्याचं जाणकारांचं म्हणणंय.

संबंधित बातम्या :

शेअर बाजारात पहिल्यांदाच गुंतवणूक करताय? या गोष्टींकडे द्या विशेष लक्ष

किरकोळ महागाईनं गेल्या 8 महिन्यांच्या रेकॉर्ड तोडला! वाढत्या किंमतींनी सर्वसामान्यांचा खिसा फाडला

अवघ्या 30 मिनिटांत मिळणार 20 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज, BharatPe ची नवीन योजना

DPIIT कडून LIC मध्ये 20 टक्के एफडीआय अधिसूचित, पण आयपीओला सध्या मुहूर्त नाही?

पाहा तुमच्या कामाची बातमी :

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.