LIC मध्ये तुमचेही पैसे असतील तर आधी करा ‘हे’ काम, सरळ हातात येईल रक्कम

| Updated on: Aug 25, 2021 | 1:46 PM

पॉलिसी उघडल्यानंतर दोन-चार प्रीमियम भरताच खातेधारक पॉलिसी तशीच सोडून देतात. हे फक्त एलआयसीमध्येच नाही तर देशात अशा अनेक खासगी क्षेत्रातील कंपन्यामध्ये असंख्य खात्यांमध्ये पैसे असेच पडून आहेत.

LIC मध्ये तुमचेही पैसे असतील तर आधी करा हे काम, सरळ हातात येईल रक्कम
मुलीच्या नावे दररोज केवळ 125 रुपये करा जमा, लग्नाच्या वेळी एकरकमी मिळतील 27 लाख रुपये
Follow us on

मुंबई : LIC मध्ये खातं असणाऱ्यांसाठी ही महत्तावाची बातमी आहे. भारतीय जीवन विमा महामंडळाच्या (LIC) खात्यात कोट्यवधी रुपये पडून आहेत, ज्याचा दावा कोणीही करत नसल्याचं समोर आलं आहे. पॉलिसीधारकांनी विसरलेल्या पॉलिसीचे हे पैसे पडून आहेत. पॉलिसी उघडल्यानंतर दोन-चार प्रीमियम भरताच खातेधारक पॉलिसी तशीच सोडून देतात. हे फक्त एलआयसीमध्येच नाही तर देशात अशा अनेक खासगी क्षेत्रातील कंपन्यामध्ये असंख्य खात्यांमध्ये पैसे असेच पडून आहेत. (lic Account how unclaimed amount online how can policyholder can claim it)

खातेधारकांनी एलआयसीच्या खात्यात असलेली रक्कम डेथ क्लेम, मॅच्युरिटी क्लेम, सर्व्हायव्हल बेनिफिट्स, प्रीमियम परतावा किंवा नुकसान भरपाई क्लेमच्या रूपात जमा केलेली असते. पण अनेक खातेधारकांना याचा विसर पडला आहे. लक्षात असूद्या हे पैसे परत मिळण्यासाठी काही कालावधी ठरवलेला असतो. तो निघून गेला की या रक्कमेवर तुम्हाला हक्क सांगता येणार नाही. त्यामुळे जर तुमचेही पैसे एलआयसीमध्ये जमा असतील तर ते वेळीच काढून घ्या. यासाठी एलआयसीने सोपा मार्ग ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. ही पद्धत ऑनलाइन आहे ज्यामध्ये एका क्लिकवर संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.

कसे काढाल पैसै? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

एलआयसी खात्यामधून पैसे काढण्यासाठी आधी LIC च्या अधिकृत वेबसाईटवर जात. यानंतर https://licindia.in/Botom-Links/Ulala-Policy-Dues वर क्लिक करा. इथं क्लिक केल्यास एलआयसीचं एक पान उघडेल. यामध्ये पॉलिसीधारकांना खात्याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर ‘Unclaimed and Outstanding amounts to Policyholders’ असं लिहिलेलं असतं.

तुमच्या खात्याविषयी माहिती मिळवण्यासाठी पॉलिसी क्रमांक, जन्मतारीख आणि पॅन कार्ड द्यावं लागणार आहे. विचारलेली माहिती रकानांमध्ये भरलेल्यानंतर सबमिट बटण क्लिक करा. यानंतर, तुम्हाला ठेवीबद्दल संपूर्ण माहिती मिळेल.

– सगळ्यात आधी LIC च्या होम पेजवर जा

– होम पेजवर डाब्या बाजूला ‘सर्च’ टॅब असेल त्यामध्ये ‘लावारिस राशि’ टाईप करा

– त्यानंतर  https://customer.onlinelic.in/LICEPS/Login/UserLogin.jsp वर क्लिक करा.

– यानंतर दिलेली संपूर्ण माहिती भरा

(lic Account how unclaimed amount online how can policyholder can claim it)

संबंधित बातम्या – 

नोकरदारांसाठी PNB ची धमाकेदार ऑफर, ‘हे’ खातं उघडल्यास पैसे नसतानाही मिळतील 3 लाख रुपये

SBI Alert : आज UPI Payment नाही करू शकणार SBI यूजर्स, बँकेची महत्त्वाची माहिती

Petrol Diesel Price : ऐन महागाईत पेट्रोल-डिझेल स्वस्त की महागलं? वाचा आजचे ताजे दर

(lic Account how unclaimed amount online how can policyholder can claim it)