एलआयसीच्या ‘या’ नव्या योजनेत गुंतवणूक करा आणि आजारपणाच्या काळजीतून निश्चिंत व्हा

| Updated on: Jul 20, 2021 | 12:19 PM

LIC | सामान्य आरोग्य विमा योजनेत संबंधित पॉलिसीधारकाला रुग्णालयात झालेल्या खर्चाची रक्कम दिली जाते. मात्र, एलआयसीच्या आरोग्‍य रक्षक योजनेत फिक्स्ड हेल्थ इन्शुरन्सचा समावेश आहे.

एलआयसीच्या या नव्या योजनेत गुंतवणूक करा आणि आजारपणाच्या काळजीतून निश्चिंत व्हा
मुलीच्या नावे दररोज केवळ 125 रुपये करा जमा, लग्नाच्या वेळी एकरकमी मिळतील 27 लाख रुपये
Follow us on

नवी दिल्ली: एलआयसीकडून नुकतीच ‘आरोग्‍य रक्षक’ ही नवी आरोग्य विमा योजना लाँच करण्यात आली आहे. ही नॉन लिंक्ड, नॉन पार्टिसिपेटिंग, रेग्युलर प्रीमिअम पॉलिसी आहे. गुंतवणुकदाराला आजारपणाच्या काळात पैसे उपलब्ध व्हावेत, या या योजनेचा उद्देश आहे. जेणेकरून पॉलिसीधारक किंवा त्याच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही.

सामान्य आरोग्य विमा योजनेत संबंधित पॉलिसीधारकाला रुग्णालयात झालेल्या खर्चाची रक्कम दिली जाते. मात्र, एलआयसीच्या आरोग्‍य रक्षक योजनेत फिक्स्ड हेल्थ इन्शुरन्सचा समावेश आहे. यामध्ये संबंधित पॉलिसीधारकाला एकत्रित रक्कम अदा केली जाईल. ही योजना फक्त एका व्यक्तीला किंवा फॅमिली फ्लोटर स्वरुपात घेता येते. याचा अर्थ तुम्ही ही योजना तुमच्यासाठी, पत्नीसाठी, आई-वडिलांसाठी घेऊ शकता.

18 ते 65 वर्षापर्यंतच्या व्यक्ती यामध्ये गुंतवणूक करू शकतात. लहान मुलांसाठी 91 दिवस ते 20 वर्ष अशा कालमर्यादेत ही योजना आहे.
आरोग्‍य रक्षक योजनेत रुग्णवाहिका आणि हेल्थ चेकअपचे पैसेही दिले जातात. तसेच न्यू टर्म इन्शुरन्स रायडर आणि एलआयसी एक्सिडेंटल रायडरचा लाभही घेता येऊ शकतो.

LIC बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, नावात बदल होणार?

भारतीय जीवन विमा निगम अर्थात एलआयसीच्या खासगीकरणाच्या प्रक्रियेला आता चांगलाच वेग आला आहे. या प्रक्रियेतील कायदेशीर अडचणी संपून लवकरच प्रारंभिक खुल्या भागविक्रीला (IPO) सुरुवात होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून त्यासाठी नुकतीच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डेव्हलपमेंट ऑफिसर्स कायद्यात सुधारणा करण्यात आली. त्यामुळे आता एलआयसीच्या नावातील कॉर्पोरेशन हा शब्द हटवून त्याजागी बोर्ड असा शब्द वापरला जाईल. तसेच एलआयसीच्या प्रमुखाला आता चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून संबोधले जाईल.

संबंधित बातम्या:

एखाद्याच्या मृत्यूनंतर बँक अकाऊंटचे काय होते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

भारतात उघडणार गोल्ड एक्सचेंज, सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांवर काय परिणाम होणार? जाणून घ्या सर्व बाबी

अल्प बचत योजनांमध्ये गुंतवणूक करुन व्हा कोट्यधीश, जोखीमही कमी