LIC ची ही योजनाच लय भारी, 150 रुपयांच्या बचतीने लाखो रुपयांची बेगमी…

पोस्ट ऑफीस आणि बँकेच्या एफडी पेक्षाही मुलांच्या भविष्यासाठी एलआयसीची ही योजना एकदम भारी आहे. या सरकारी योजनेमुळे तुमच्या मुलांचे भविष्य एकदम सुरक्षित होऊ शकते.

LIC ची ही योजनाच लय भारी, 150 रुपयांच्या बचतीने लाखो रुपयांची बेगमी...
| Updated on: Sep 28, 2025 | 9:09 PM

जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्याची चिंता लागली आहे का ? मुलांसाठी सुरक्षित, भरोसेमंद आणि फायदेमंद गुंतवणूकीचा पर्याय शोधत असाल तर आता पोस्ट ऑफीस वा एफडीत पैसा घालण्याची काही गरज नाही. LIC चा “न्यू चिल्ड्रन मनी बॅक प्लान” तुमच्यासाठी चांगला स्मार्ट पर्याय आहे. या योजनेत रोज केवळ 150 रुपयांच्या बचतीने मुलांसाठी 19 लाख रुपयांचा फंड बनवू शकता. हा पैसा मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी वा कोणत्याही मोठ्या खर्चासाठी वापरु शकता.

काय आहे LIC न्यू चिल्ड्रन मनी बॅक प्लान?

ही योजना खास करुन लहान मुलांच्या भविष्याचा विचार करुन ही योजना तयार केली आहे. या प्लानमध्ये आई-वडील आपल्या 0 ते 12 वर्षांच्या मुलांच्या नावाने गुंतवणूक सुरु करु शकतो. हा एक नॉन – लिंक्ड, पार्टीसिपेटिंग इंश्योरन्स प्लान आहे. ज्यात जोखीम कव्हरेजसह गुंतवणूकीवर रिटर्न आणि बोनस देखील मिळतो. या योजनेची खास बाब म्हणजे यात मनी बॅकची सुविधा आहे.म्हणजे मुलांचे वय जसे वाढत असते तर काही ठराविक वयापर्यंत तुम्हाला गुंतवणूकीची रक्कम मिळत रहाते.

कसा होणार 19 लाखांचा फंड ?

जर तुम्ही रोज 150 रुपये वाचवता, तर महिन्याला 4,500 रुपये जमा होतील, वर्षाला ही रक्कम 54,000 रुपयांच्या आसपास होते. जर तुम्ही सतत 25 वर्षे गुंतवणूक केली तर ही रक्कम सुमारे 14 लाख रुपये होते. या शिवाय LIC या प्लानवर बोनस आणि रिटर्न देखील देते.ज्यामुळे पॉलीसीची मॅच्युरिटीवर एकूण फंड वाढून सुमारे 19 लाख रुपये होऊ शकते.ही रक्कम मुलांच्या उच्च शिक्षणावर आणि परदेशी शिक्षणावर मोठ्या प्रमाणावर खर्च करता येऊ शकते.

कसा आणि केव्हा मिळतो पैसा ?

या प्लानची सर्वात खास बाब म्हणजे याची मनी बॅक सिस्टीम. जेव्हा मुलगा किंवा मुलगी 18, 20, 22 आणि 25 वर्षांची होईल.तेव्हा त्यातील सम एश्योर्ड ( म्हणजे विमा रक्कम ) चा एक हिस्सा मिळणे सुरु होते. 18, 20 आणि 22 वर्षाच्या वयात तुम्हाला विमा रकमेचा 20-20% पैसा परत मिळतो. तर 25 वर्षांत उरलेल्या 40% सह बोनस देखील दिला जातो.या प्रकारे मुलाची प्रत्येक गरजेच्या वेळी वेळोवेळी तुम्हाला आर्थिक मदत मिळत जाते.

हप्ता भरणे सुद्धा सोपे

या योजनेची आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे या हप्ता भरण्यासाठी फ्लेक्सिबिलिटी मिळते. तुम्ही हवे तर मासिक, त्रैमासिक, सहामाही किवा वार्षिक अशा प्रकारे तुमच्या सोयीने हप्ते भरु शकता. त्यामुळे तुमच्या बजेटप्रमाणे हप्ता भरता येतो.

विम्याचा देखील संपूर्ण लाभ

या प्लानमध्ये किमान एक लाख रुपयांचा विमा रक्कम मिळते. परंतू कमाल रकमेची कोणतीह मर्यादा नाही. जर पॉलिसी दरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाला तर नॉमिनीला किमान 105% पर्यंत पैशांसोबत जमा बोनस देखील मिळतो. ही योजना केवळ चांगली गुंतवणूक योजनाच नव्हे तर सुरक्षित विमा योजना म्हणून ओळखली जाते.