PPF योजने संदर्भात या 5 बाबी तुम्हाला माहिती आहेत का ? गुंतवणूकीआधी वाचा
पीपीएफ म्हणजे पब्लिक प्रोव्हीडन्ट फंड ही एक सरकारी बचत योजना आहे. ही योजना दीर्घकाळ सुरक्षित गुंतवणूक करणाऱ्यासाठी चांगला पर्याय आहे. यात ५०० रुपयांपासून ते १.५ लाख रुपये वार्षिक जमा केले जाऊ शकतात. ही योजना १५ वर्षांपर्यंत लॉक-इन रहाते.

सध्या पीपीएफ म्हणजे पब्लिक प्रोव्हीडंड फंड या योजनेवर ७.१ टक्के व्याज मिळत आहे. ही योजना ईईई (EEE) कॅटेगरीत मोडते. म्हणजे गुंतवणूक, व्याज आणि मॅच्युरिटी तिन्ही जागी टॅक्सची बचत होते. परंतू पीपीएफमध्ये काही अशा बाबी आहेत ज्यांना सर्वसामान्य गुंतवणूकदार दुलर्क्ष करत असतात. जर तुम्ही देखील पीपीएफमध्ये गुंतवणूक करत असाल किंवा करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. चला तर पीपीएफ संदर्भातील ५ महत्वाच्या बाबी जाणून घेऊयात. ..
या पीपीएफच्या या ५ बाबी माहिती आहेत का ?
1. एकाहून अधिक खाती उघडता येत नाहीत
पीपीएफमध्ये तुम्ही केवळ एकच अकाऊंट उघडू शकता. जर चुकून दोन अकाऊंट उघडली तर दुसरे अकाऊंट वैध मानले जात नाही. दोन्ही अकाऊंटना मर्ज केल्या विना त्यावर व्याज देखील मिळत नाही.
2. व्याज दर बदलत राहते
पीपीएफचे व्याज दर वेळोवेळी बदलत असते. एप्रिल-जून २०१९ मध्ये हे व्याज ८ टक्के होते, नंतर ७.९ टक्के आणि जानेवारी – मार्च २०२० मध्ये या ७.१ टक्के केले होते. सध्या हा व्याज दर ७.१ टक्क्यांवर स्थिर आहे, परंतू भविष्यात ते कमी किंवा जास्त होऊ शकते.
3. गुंतवणूक रकमेची कमाल मर्यादा
वार्षिक गुंतवणूकीची मर्यादा केवळ १.५ लाख रुपये आहे. जर तुमचे उत्पन्न जास्त असेल आणि तुम्हाला यात अधिक गुंतवणूक करायची असेल तर अन्य गुंतवणूक योजनांकडे लक्ष द्यावे लागेल
4. जॉईंट अकाऊंटचा पर्याय नाही
पीपीएफमध्ये जॉईंट अकाऊंट काढता येत नाही. तरीही तुम्ही अनेक नॉमिनी निश्चित करु शकता आणि त्यांच्या वाटे वेग-वेगळे करु शकता. अकाऊंट धारकाचा मृत्यू झाल्यानंतर नॉमिनीला रक्कम काढण्याचा अधिकार असतो.
5.दीर्घकालीन लॉक-इन पीरियड
पीपीएफ योजनेत गुंतवणूकीचा कालावाधी लॉक-इन पीरियड १५ वर्षांचा आहे. मध्येच गरज लागली तर पाच वर्षांनंतर काही विशिष्ट परिस्थितीतच आंशिक रक्कम काढता येते. परंतू संपूर्ण रक्कम लागलीच काढता येत नाही.
