रतन टाटा यांच्या या कंपनीची कमाल, शेवटच्या सत्रात छापले इतके कोटी

Ratan Tata | रतन टाटा यांच्या या कंपनीने वर्षाच्या अखेरीस गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करुन दिली. बाजाराच्या अखेरच्या सत्रात अवघ्या काही मिनिटात कंपनीने इतिहास रचला. एकाच फटक्यात कंपनीने 11,500 कोटी रुपयांची कमाई केली. या फायद्यामुळे गुंतवणूकदारांची नवीन वर्षाची पार्टी रंगणार आहे.

रतन टाटा यांच्या या कंपनीची कमाल, शेवटच्या सत्रात छापले इतके कोटी
Follow us
| Updated on: Dec 29, 2023 | 3:50 PM

नवी दिल्ली | 29 डिसेंबर 2023 : रतन टाटा यांची फेव्हरेट कंपनीने गुंतवणूकदारांना एका फटक्यात मालामाल केले. कंपनीने गुंतवणूकदारांना लॉटरी लावली. वर्षाच्या अखेरच्या सत्रात कंपनीने गुंतवणूकदारांना छप्परफाड कमाई करुन दिली. अवघ्या काही मिनिटात या कंपनीचे बाजारातील मूल्य 11,500 कोटी रुपयांनी वाढले. पूर्ण वर्षाचा विचार करता या शेअरमध्ये जवळपास 100 टक्के वृद्धी दिसून आली. म्हणजे कंपनीने गुंतवणूकदारांना दुप्पट कमाई करुन दिली. टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये तेजीचे सत्र दिसून आले. गुंतवणूकदारांना जोरदार फायदा झाला.

विक्रमी स्तरावर पोहचला टाटा मोटर्सचा शेअर

टाटा समूहाची कंपनी टाटा मोटर्सने ही कमाल केली आहे. शेवटच्या व्यापारी सत्रात कंपनीचा शेअर विक्रमी स्तरावर पोहचला. आकड्यानुसार, कंपनीचा शेअर 6.41 टक्क्यांनी वधारला. हा शेअर तेजीसह 802.60 रुपयांच्या उच्चांकावर पोहचला. दुपारी 1 वाजून 45 मिनिटांवर हा शेअर जवळपास 4 टक्क्यांच्या तेजीसह 783.75 रुपयांवर व्यापार करत होता. एक दिवसापूर्वी कंपनीचा शेअर 754.20 रुपयांवर बंद झाला. कंपनीच्या शेअरने आज पहिल्यांदा 800 रुपयांचा टप्पा ओलांडला.

हे सुद्धा वाचा

मूल्यात 11,500 रुपयांचा फायदा

टाटा मोटर्सच्या मूल्याचा विचार करता, कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार वाढ दिसून आली. व्यापारी सत्रात कंपनीचा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहचला. कंपनीचे मार्केट कॅप 2,62,056.34 कोटी रुपयांवर पोहचले. तर एक दिवसापूर्वी कंपनीचे बाजारातील भांडवल 2,50,561.47 कोटी रुपये होते. काही मिनिटांच्या व्यापारी सत्रात कंपनीच्या भांडवलात 11494.87 कोटी रुपयांची वाढ दिसून आली. सध्या कंपनीचे मूल्य 2,60,428.14 कोटी रुपये आहे.

कंपनीने केली दुप्पट कमाई

टाटा मोटर्सचे शेअर या वर्षात दुप्पट झाले. टाटा मोटर्सने गुंतवणूकदारांना डबल कमाई करुन दिली. गेल्या वर्षाच्या अखेरीस जेव्हा शेअर बाजार बंद होता. तेव्हा कंपनीचा शेअर 388.10 रुपयांवर पोहचला होता. त्यानंतर या शेअरमध्ये वाढ दिसून आली. कंपनीचा शेअर 802.60 रुपयांच्या पुढे गेला. कंपनीच्या शेअरमध्ये 107 टक्क्यांची वाढ दिसून आली. 28 डिसेंबर रोजी रतन टाटा यांचा वाढदिवस होता. टाटा मोटर्सने जणू टाटा यांना वाढदिवसाच्या एक दिवसानंतर ही अनोखी भेट दिली आहे.  गुंतवणूकदारांना त्याचा फायदा झाला आहे.

Non Stop LIVE Update
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी.
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.