Low Stress Jobs: एकदम 5 कूल जॉब! तणाव नाही, पगार पण जास्त, बॉस तर कायम प्रसन्न

Low Stress Jobs: सरकारी असो वा खासगी नोकरी, ताण-तणाव हल्ली अधिक वाढला आहे. तक्रार करूनही काही उपयोग होत नसल्याने अनेक जण दुसऱ्या नोकऱ्यांकडे वळत आहेत. तुम्ही ताण-तणाव कमी असलेल्या जॉबच्या शोधात असला तर मग हे नवीन करिअर चांगला पर्याय ठरू शकतो.

Low Stress Jobs: एकदम 5 कूल जॉब! तणाव नाही, पगार पण जास्त, बॉस तर कायम प्रसन्न
कमी तणावाचे जॉब
| Updated on: Dec 14, 2025 | 12:28 PM

Cool Jobs: सध्या बड्या शहरात आणि कॉर्पोरेट जगात Quiet Quitting ट्रेंड व्हायरल होत आहे. यामध्ये कर्मचारी तेच काम करतात जी त्यांची जबाबदारी आहे. त्यापेक्षा अधिकची जबाबदारी घेण्यास ते नकार देतात. तर काही कंपन्या कमी माणसात अधिक काम करण्यास सांगतात. त्याविरोधात ही मोहिम राबवण्यात येत आहे. आता नवीन पिढी मानसिक शांततेला अधिक महत्त्व देत आहेत. ऑफिस पॉलिटिक्सपेक्षा कुटुंबाला आणि मित्रांना वेळ देणे आणि योग्य कामं करणं हे त्यांचं लक्ष्य आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून कॉर्पोरेट जगतात
Quiet Jobs ही मोहिम अधिक ट्रेंड करत आहे. काही नोकऱ्यांमध्ये थेट ग्राहकांशी, लोकांशी संबंध कमी येतो. येथे अनावश्यक बैठका, हा मेल कर, त्याला उत्तर दे असे प्रकार नसतात. तिथे सार्वजनिक सुट्या मिळतात. पगारही चांगला मिळतो. सोशल बाँडिंगही चांगलं राहतं. विशेष म्हणजे या नोकऱ्यांमध्ये तुम्हाला बॉसलाही काही त्रास देण्याची गरज पडत नाही. कोणते आहेत हे पाच कूल जॉब?

1. ग्रंथपाल, ग्रंथालय सहाय्यक/Librarian

येथील वातावरण शांत असते. पुस्तकं हे तुमचं विश्व असेल तर मग हा जॉब तुमच्यासाठीच आहे. येथे पुस्तकाचे व्यवस्थापन करणे आणि पुस्तकांना योग्य ठिकाणी लावणे, ग्रंथालयातील पुस्तकांची यादी करणे. त्यांची निगा राखणे. शांतता ठेवणे ही कामं महत्त्वाची आहेत.

2. डेटा एंट्री स्पेशलिस्ट

हा एक नवीन जॉब सध्या ट्रेडिंगमध्ये आहे. येथे कमी ताण असतो. हे काम तुम्हालाच गतीने पूर्ण करावे लगाते. यामध्ये दुरस्थ पद्धतीने काम करता येते. म्हणजे तुम्हाला कार्यालयात, कचेरीत जाण्याची गरज नसते.

3. लेखापाल

लेखापाल हे कमी ताण-तणावाचे काम असले तरी येथे हिशोब मात्र पक्का ठेवावा लगातो. तुम्हाला हिशोबात अथवा एंट्रीत कमी करून चालत नाही. बिलांची देवाण-घेवाणीची बारकाईने छाननी करावी लागते. संबंधित कंपनी, कार्यालयाचे गणित बिघडू न देण्याचे काम काटेकोरपणे करावे लागते.

4. तांत्रिक लेखनिक (Technical Writer)

हे काम बुद्धिसाठी खुराक म्हणावे लागले. यामध्ये क्लिष्ट माहिती साध्या आणि सरळ शब्दात मांडावी लागते. यामध्ये थेट कुणाचा संबंध येत नाही. तुम्हाला तांत्रिक माहिती सरळ आणि साध्या शब्दात मांडावी लागते. हे पण एकट्यानेच पूर्ण करावे लागते.

5. सरकारी आर्काइव्हिस्ट/रेकॉर्ड्स मॅनेजर

तुम्हाला इतिहासाची आवड असेल. सनावळ्या, ऐतिहासिक ठेव्यात तुमचा जीव रमत असेल तर मग ही संधी सोडूच नका. शिलालेख आणि इतर ऐतिहासिक दस्तावेज क्रमबद्ध लावणे. त्यांचे जतन करणे. ते ऑनलाईन जतन करणे अशी कामं या लोकांना करावी लागतात.