AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zero Investment Business Ideas: पैसे न गुंतवता करा हे व्यवसाय, हुशार असाल तर खोऱ्यानं कमाई कराल

Zero Investment Business Ideas: या डिजिटल युगात जगच खेडं झालं आहे. आता प्रत्येक काम ऑफिसमध्ये बसूनच करावं असं नाही. काही व्यवसाय तर तुम्ही घरी बसूनही करु शकता आणि त्यातून चांगली कमाई करू शकता. विशेष म्हणजे यासाठी मोठी गुंतवणूक नाही. तर हवं तुमचं कौशल्य आणि चातुर्याची चुणूक.

Zero Investment Business Ideas: पैसे न गुंतवता करा हे व्यवसाय, हुशार असाल तर खोऱ्यानं कमाई कराल
जोरदार व्यवसायImage Credit source: गुगल
| Updated on: Dec 11, 2025 | 4:38 PM
Share

Zero Investment Business Ideas: आजच्या डिजिटल युगात व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप मोठा खर्च करण्याची गरज नाही. काही ऑनलाईन काम अगदी शुन्य रुपयांची गुंतवणूक करून, तुमच्याकडे असलेल्या साधनांमधून करता येऊ शकतात. त्यासाठी अर्थातच तुमचं कौशल्य, वेळ, कष्ट आणि सातत्याची अत्यंत गरज आहे. झिरो इन्व्हेस्टमेंट आयडियाज द्वारे तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करु शकतात. त्यासाठी काही ऑनलाईन गोष्टी लागतील.

ब्लॉगिंग

ब्लॉगिंग हा सर्वात सोपा आणि कमी खर्चाचा व्यवसाय आहे. WordPress वा Blogger सारख्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही मोफत ब्लॉग सुरु करू शकता. एक चांगला विषय निवडून तुम्ही त्यात एकदम चपखल लेख लिहा. बातमी तयार करा. तंत्रज्ञान, खाद्यपदार्थ, पर्यटन, अर्थभान अशा विषयावर तुम्ही काम करु शकता आणि पैसे कमावू शकता.

ऑनलाइन ट्यूटरिंग

जर तुमचा एखादा विषयाचा सखोल अभ्यास असेल. एखादा विषय तुम्हाला शिकवायला आणि त्यात रमायला आवडत असेल तर मग तुम्ही ऑनलाईन शिकवणी घेऊ शकता. Zoom वा Google Meet वर क्लास सुरु करणं एकदम सोपं आहे. गणित, विज्ञान, भाषा विषयात पारंगत असाल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी कमाईचे साधन ठरू शकतो.

यूट्यूब कंटेंट क्रिएशन

YouTube चे मार्केट एकदम वाढले आहे. 1000 सब्सक्रायबर आणि 4000 वॉच ऑवर पूर्ण केल्यावर जाहिरातींचा ओघ सुरू होतो आणि त्या माध्यमातून कमाई सुरु होते. याशिवाय स्पॉन्सरशिप, ब्रँड प्रमोशनमधून जोरदार कमाई होते.

सोशल मीडिया कन्सल्टिंग

अनेक व्यावसायिकांकडे वेळ नसतो. मग त्यांना त्यांच्या युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्रामवर कंटेंट टाकण्याासाठी एका खास माणसाची निकड असते. जी व्यक्ती या प्लॅटफॉर्मचे अल्गोरिदम आणि कंटेंट स्ट्रॅटर्जी समजून त्यांना फायदा मिळवू देते. त्यांची गरज असते. या लोकांना चांगला पैसा मिळतो.

फ्रीलान्स रायटिंग

जर तुमच्या लिहिण्याचे कसब असेल तर फ्रीलांस रायटिंग हा एकदम खास पर्याय ठरू शकतो. Upwork आणि Fiverr सारख्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही काम करू शकता. ब्लॉग, वेबसाईट कॉपी वा SEO कंटेंट लिहून तुम्हाला चांगली कमाई करता येऊ शकते.

विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट..
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट...
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'.
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर.
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद.
ठाकरेंमुळे उन्हाळ्यातही वातावरण तापत नाही, तर थंडीत.. गायकवाडांचा टोला
ठाकरेंमुळे उन्हाळ्यातही वातावरण तापत नाही, तर थंडीत.. गायकवाडांचा टोला.
राज ठाकरे यांना गुन्हा मान्य आहे का? कोर्टाच्या सवालावर थेट उत्तर
राज ठाकरे यांना गुन्हा मान्य आहे का? कोर्टाच्या सवालावर थेट उत्तर.
विधानसभेत बळीराजाच्या दुर्दशेवरून भास्कर जाधव यांनी सरकारला घेरलं
विधानसभेत बळीराजाच्या दुर्दशेवरून भास्कर जाधव यांनी सरकारला घेरलं.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं....
अदानी, राहुल गांधी पहिल्यांदाच एकसाथ? पवारांच्या निवासस्थानी काय घडलं?
अदानी, राहुल गांधी पहिल्यांदाच एकसाथ? पवारांच्या निवासस्थानी काय घडलं?.
कसली कॉलर टाईट अन् कसलं महापौरपद... भाजप नेत्यांवर समोय्यांची नाराजी?
कसली कॉलर टाईट अन् कसलं महापौरपद... भाजप नेत्यांवर समोय्यांची नाराजी?.