LPG Gas Cylinder Price: गॅस सिलिंडर 105 रुपयांनी महागला, येथे जाणून घ्या नवीन दर!

| Updated on: Mar 01, 2022 | 9:28 AM

सरकारी तेल कंपन्यांनी (OMCs) मार्च महिन्यासाठी LPG गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder Price Today)  किमती जाहीर केल्या आहेत. मार्चपासून अनुदानाशिवाय 14 किलोच्या सिलेंडरच्या किमतीत वाढ झालेली नाही. राजधानी दिल्लीतील किंमती कोणत्याही बदलाशिवाय 899.5 रुपयांवर स्थिर आहेत. तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे.

LPG Gas Cylinder Price: गॅस सिलिंडर 105 रुपयांनी महागला, येथे जाणून घ्या नवीन दर!
गॅसवरील सबसीडी कशी मिळवाल?
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी (OMCs) मार्च महिन्यासाठी LPG गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder Price Today)  किमती जाहीर केल्या आहेत. मार्चपासून अनुदानाशिवाय 14 किलोच्या सिलेंडरच्या किमतीत वाढ झालेली नाही. राजधानी दिल्लीतील किंमती कोणत्याही बदलाशिवाय 899.5 रुपयांवर स्थिर आहेत. तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. देशातील सर्वात मोठी कंपनी इंडियन ऑइल (IOC) ने 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 105 रुपयांनी वाढ केली आहे. किमतीत वाढ झाल्यानंतर नवी दिल्लीत 19 किलो गॅस सिलिंडरचा नवा दर 2,012 रुपये झाला आहे. नवीन किमती 1 मार्च 2022 पासून लागू झाल्या आहेत.

  1. तुम्ही कार किंवा बाईक वापरत असाल तर हे क्रेडिट कार्ड तुमच्यासाठी फायदेशीर ठरते. को-ब्रँड फ्यूल स्टेशनवर पेट्रोल भरून तुम्हाला अनेक फायदे मिळतील. आपल्या देशातील बहुतेक फ्यूल क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉइंट्स आहेत. प्रत्येक वेळी तुम्ही इंधन भरल्यावर तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट मिळतात. नंतर त्याची पूर्तता केली जाऊ शकते. या अंतर्गत ठराविक रिवॉर्ड पॉइंट्सवर ठराविक प्रमाणात इंधन मोफत दिले जाते.
  2. Paisa Bazar.com चे सहयोगी संचालक सचिन वासुदेव म्हणाले की, सिटी इंडियन ऑइल कार्डवर 150 रुपये किमतीचे पेट्रोल टाकल्यास 4 पाॅईंट मिळतात. ही खरेदी इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरून करावी लागणार आहे. त्यानुसार 10 हजार रुपयांचे पेट्रोल खरेदी केल्यास एकूण 267 रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील. ते 267 रुपयांचे झाले आणि त्याचे पेट्रोल विकत घेतले जाऊ शकते.
  3. दिल्लीत 19 किलो व्यावसायिक गॅसची किंमत 105 रुपयांनी वाढून 2,012 रुपये झाली आहे. यापूर्वी याची किंमत 1,907 रुपये होती. कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 108 रुपयांनी वाढून 2,095 रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी त्याची किंमत 1,987 रुपये होती.
  4. मुंबईत व्यावसायिक गॅसची किंमत यापूर्वी किंमत 1857 रुपये होती. येथे 106 रुपयांची वाढ झाली आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 2145.5 रुपयांवर गेली आहे. येथे 65 रुपयांची कपात करण्यात आली आहे. यापूर्वी किंमत 2080.5 रुपये होती.
  5. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 100 डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. मंगळवारी ब्रेंट क्रूडच्या किमती 3.12 टक्क्यांनी वाढून $100.99 प्रति बॅरलवर पोहोचल्या. तर WTI क्रूडची किंमत 0.67 टक्क्यांनी वाढून $96.36 प्रति बॅरल झाली.
  6. एलपीजी सिलेंडरची किंमत तपासण्यासाठी तुम्हाला सरकारी तेल कंपनी IOC च्या वेबसाइटवर जावे लागेल. येथे कंपन्या दर महिन्याला नवीन दर जारी करतात. (https://iocl.com/Products/IndaneGas.aspx) या लिंकवर तुम्ही तुमच्या शहरातील गॅस सिलिंडरची किंमत तपासू शकता.

संबंधित बातम्या : 

एलआयसीच्या आयपीओत सूट पाहिजे… आजच ‘या’ गोष्टींची पूर्तता करा…

पोस्टाच्या ‘या’ योजनेमध्ये पैसा गुंतवा, बचतीचा सुवर्णमध्य साधा