पोस्टाच्या ‘या’ योजनेमध्ये पैसा गुंतवा, बचतीचा सुवर्णमध्य साधा

असे म्हणतात की बचत केलेला पैसा (Save money) हाच माणसाच्या संकट काळातील खरा सोबती असतो. अनेक जण आपल्या भविष्यासाठी (future) बचत करतात. मात्र अनेकांना पैसा कुठे गुंतवावा हे माहित नसते. त्यामुळे त्यांना म्हणावा तसा परतावा (Refund) मिळत नाही.

पोस्टाच्या 'या' योजनेमध्ये पैसा गुंतवा, बचतीचा सुवर्णमध्य साधा
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Mar 01, 2022 | 5:40 AM

मुंबई : असे म्हणतात की बचत केलेला पैसा (Save money) हाच माणसाच्या संकट काळातील खरा सोबती असतो. अनेक जण आपल्या भविष्यासाठी (future) बचत करतात. मात्र अनेकांना पैसा कुठे गुंतवावा हे माहित नसते. त्यामुळे त्यांना म्हणावा तसा परतावा (Refund) मिळत नाही. तर अनेक जण जास्त परताव्याच्या अपेक्षेने जोखीम असलेल्या क्षेत्रात जसे शेअर मार्केट म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवतात. शेअर मार्केट, म्युच्युअल फंडमधून तुम्हाला चांगला परतावा तर मिळतो मात्र तोटा झाल्यास तुमचे प्रचंड नुकसान होते. मात्र तुम्हाला जर गुंतवणुकीचा सुवर्णमध्य सापडला तर सुवर्णमध्ये म्हणजे पैशांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा देखील मिळेल आणि तुमचे पैसे बुडण्याची देखील भीती नसेल. आपल्याला असाच सुवर्णमध्य उपलब्ध करून देण्याचे काम पोस्टाच्या विविध योजना करतात. या योजनामध्ये पैसा गुंतवल्यास पैसा बुडण्याची भीती नसते, तसेच परतावा देखील चांगला मिळतो आज आपण अशाच एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत.

पोस्टाची आरडी योजना

तुम्ही जर पैसे गुंतवायचा विचार करत असाल तर पोस्टाच्या सेविंग्स स्कीम्समध्ये पैगे गुंतवू शकता. या योजनेत तुम्हाला चांगला परतावा मिळतो. सोबतच तुमची गुंतवणूक देखील सुरक्षीत राहाते. तुम्ही जर बँकेच्या एखाद्या योजनेत पैसे गुंतवले आणि संबंधित बँकेचे दिवाळे निघाले तर तुम्हाला केवळ पाच लाखांपर्यंतचीच रक्कम वापस मिळते. मात्र पोस्टाच्या योजनेचे तसे नसते. तुम्हाला तुमची संपूर्ण रक्कम ते देखील परताव्यासह मिळते. पोस्टाच्या अनेक सेविंग्स स्किम आहेत त्यातील आरडी अर्थात पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट अकाउंटबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.

गुंतवणुकीची मर्यादा

पोस्टाच्या या योजनेमध्ये तुमच्या गुंतवणुकीवर वार्षिक आधारावर 5.8 टक्के व्याज देण्यात येते. पोस्टाच्या पॉलिसीनुसार या व्याजदरात बदल होत असतो. मात्र सध्या 5.8 टक्के दराने व्याज देण्यात येत आहे. तुम्ही आरडीमध्ये किती पैसे गुंतवू शकता याला काही मर्यादा नाही. तुम्ही तुमच्या सोईनुसार दर महिन्याला शंभर रुपयांपासून ते पुढे कितीही पैसे गुंतवू शकता. अशाप्रकारचे खाते कोणताही भारतीय नागरिक ओपन करू शकतो. तीन जण मिळून जॉइंट खाते देखील ओपन करता येते.

संबंधित बातम्या

मुलांची पॉलिसी असल्यास पालकांना मिळणार आयपीओमध्ये सवलत, जाणून घ्या ‘एलआयसी’च्या आयपीओबाबत महत्त्वाची माहिती

बँकेतील कामे आजच पूर्ण करा, मार्च महिन्यात बँकांना तेरा दिवस सुटी

सावधान ! घरावर टॉवर लावण्याचा विचारत करत आहात? तर ‘ही’ माहिती जाणून घ्या, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें