
शेअर मार्केटमध्ये जेव्हा मोठी पडझड होते किंवा बाजारात अस्थिरता वाढते. शेअर बाजारात घसरण झाली की अनेक गुंतवणूकदार घाबरून SIP थांबवतात. पण अशावेळीच continuety महत्व अधिक असतं. शेअर मार्केट पडत असतानाही SIP सुरू ठेवणं दीर्घकालीन फायद्यासाठी उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना हे काही महत्त्वाचे मुद्दे आधी नक्की जाणून घ्या…
तेव्हा म्युच्युअल फंडात SIP द्वारे गुंतवणूक करणाऱ्या अनेकांच्या मनात एकच प्रश्न येतो. तो म्हणजे SIP बंद करून टाकावी का?
1. बाजारातील पडझडीला घाबरून लगेच SIP बंद करणे किंवा पैसे काढून घेणे हा अनेकदा आत्मघातकी निर्णय ठरू शकतो, विशेषतः जर तुम्ही Long Term साठी गुंतवणूक करत असाल. लक्षात ठेवा, शेअर मार्केट हे नेहमीच वर-खाली होत असतं. अशावेळी शांत राहून विचारपूर्वक निर्णय घेणं महत्त्वाचं आहे.
2. जर तुम्हाला बाजारातील परिस्थितीमुळे खूपच चिंता वाटत असेल आणि काही काळ SIP मध्ये पैसे भरणे शक्य नसेल किंवा धोकादायक वाटत असेल, तर म्युच्युअल फंड बंद करण्याऐवजी तुम्ही ‘Pause’ या सुविधेचा विचार करू शकता. या सुविधेमुळे तुम्ही तुमची चालू SIP काही काळासाठी थांबवू शकता. या काळात तुमच्या बँक खात्यातून SIP चे हप्ते कापले जाणार नाहीत आणि तुम्ही निवडलेला ‘Pause’ कालावधी संपला की, तुमची SIP आपोआप पुन्हा सुरू होते. पण लक्षात ठेवा, ‘Pause’ सुविधा ही दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी फारशी फायद्याची नाही, कारण यामुळे तुमच्या गुंतवणुकीतील सातत्य तुटते आणि चक्रवाढ व्याजाचा पूर्ण फायदा मिळत नाही.
नवीन SIP सुरू करत असाल किंवा जुनी चालू ठेवत असाल, तर योग्य फंड निवडणं खूप महत्त्वाचं आहे. तुमची जोखीम घेण्याची क्षमता, गुंतवणुकीचा उद्देश आणि कालावधी यानुसार फंड निवडा. गरज वाटल्यास आर्थिक सल्लागाराची मदत घ्या. तुमची सगळी गुंतवणूक एकाच प्रकारच्या फंडमध्ये किंवा एकाच सेक्टरमध्ये करू नका. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणा. त्यात काही प्रमाणात Debt Funds आणि Large Cap Funds नक्की ठेवा. कारण बाजारात जेव्हा Mid-Cap आणि Small-Cap शेअर्समध्ये मोठी विक्री होते, तेव्हा त्याचा थेट परिणाम या फंडांवर दिसून येतो आणि नुकसान जास्त होऊ शकतं. जर तुम्ही किमान ७ ते १० वर्षांसाठी गुंतवणूक करत असाल, तर बाजारातील तात्पुरत्या चढ-उतारांना घाबरून जाण्याची गरज नाही.
शेवटी, SIP बद्दल कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमचा गुंतवणुकीचा मूळ उद्देश काय आहे, हे स्पष्ट असणं गरजेचं आहे. तुम्ही किती कालावधीसाठी गुंतवणूक करत आहात? जर तुम्ही अल्प किंवा मध्यम मुदतीसाठी गुंतवणूक केली असेल आणि आता पैसे काढण्याची वेळ आली असेल पण सध्या बाजारात नुकसान दिसत असेल, तर शक्य असल्यास अजून काही महिने थांबण्याचा विचार करा. अनेकदा मोठ्या घटनांनंतर बाजारात सुधारणा होण्याची शक्यता असते. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करत असाल, तर सध्याच्या पडझडीकडे एक संधी म्हणून बघा. कमी झालेल्या NAV मुळे तुम्हाला जास्त युनिट्स मिळतील, ज्याचा फायदा भविष्यात होईल.
SIP म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. याद्वारे गुंतवणूकदार दर महिन्याला किंवा ठराविक अंतराने एक निश्चित रक्कम म्युच्युअल फंडाच्या एखाद्या योजनेत गुंतवू शकतो. SIP मुळे गुंतवणुकीला शिस्त लागते आणि बाजारातील चढ-उतारांचा धोका कमी होतो. तुम्ही अगदी ५०० रुपये प्रति महिना इतक्या कमी रकमेपासूनही SIP सुरू करू शकता. नियमित आणि दीर्घकाळ SIP केल्यास एक मोठा फंड तयार होऊ शकतो