मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने मुंबईत उभारले देशातील सर्वात मोठे कन्व्हेन्शन सेंटर, 5G नेटवर्क बरोबरच खूप साऱ्या मिळतील सुविधा !

| Updated on: Mar 05, 2022 | 8:48 PM

रिलायन्स इंडस्ट्रीजने मुंबईचे जियो वर्ल्ड सेंटरमध्ये देशातील सर्वात मोठे कन्वेंशन सेंटर उभारण्याचे शुक्रवारी जाहीर केले. कंपनी नुसार मुंबईतील बांद्रा कुर्ला परिसर मध्ये हे कन्वेंशन सेंटर उभारण्यात येईल. या सेंटर मध्ये 1.61 लाख वर्ग फुटा पेक्षा जास्त क्षेत्र फळात तीन भव्य हॉल आणि 1.07 लाख वर्ग फुटाचे दोन कन्वेंशन हॉल असतील.

मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने मुंबईत उभारले देशातील सर्वात मोठे कन्व्हेन्शन सेंटर, 5G नेटवर्क बरोबरच खूप साऱ्या मिळतील सुविधा !
जिओची मोठी घोषणा
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : तेला पासून ते दूरसंचार (Telecom) क्षेत्रामध्ये सक्रिय असलेले रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Industries) मुंबई येथे जियो (Jio) वर्ल्ड सेंटरमध्ये देशातील सर्वात मोठे कन्वेंशन सेंटर उभारण्याचे शुक्रवारी जाहीर केले. कंपनी नुसार मुंबईतील बांद्रा कुर्ला परिसर मध्ये हे कन्वेंशन सेंटर उभारण्यात येईल. या सेंटर मध्ये 1.61 लाख वर्ग फुटा पेक्षा जास्त क्षेत्र फळात तीन भव्य हॉल आणि 1.07 लाख वर्ग फुटाचे दोन कन्वेंशन हॉल असतील. रिलायन्स इंडस्ट्रीज ने एका निवेदनामध्ये असे म्हटले आहे की,हे कन्व्हेन्शन सेंटर भविष्यात 5g नेटवर्क सोबतच लेस हायब्रीड आणि डिजिटल अनुभव देईल. RIL चे सी ई ओ आणि रिलायन्स फॉउंडेशनचे संस्थापक नीता अंबानी यांनी म्हंटले की ,जियो वर्ल्ड सेंटर भारत देशासाठी एक गौरवशाली सेंटर ठरणार आहे. या सेंटरमुळे गौरवशाली भारत व नवीन विकसित भारत बनवण्यासाठी आपल्या सर्वांना मदत होणार आहे.नव्या भारताची संकल्पना बद्दल असलेली सर्वांची अपेक्षा या सेंटरद्वारे पूर्ण होईल अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली.

नीता अंबानी यांनी पुढे म्हटले की,सर्वात मोठी संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रीमियम, रिटेलिंग आणि डायनिंग सुविधा मध्ये अग्रेसर असलेले जिओ वर्ल्ड सेंटर मुळे मुंबईला नवी ओळखी मिळेल. हे सेंटर भविष्यात असे केंद्र बनेल ज्यामुळे भारताच्या विकासाचा नवीन अध्याय भविष्यात लिहिला जाईल.

रिलायन्स वेगवेगळा सेक्टरमध्ये करत आहे प्रगती

आपणास सांगू इच्छितो की, गुरुवारी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सब्सिडियरी रिलायंस स्टॅस्टेटजिक वेंचर्स लिमिटेड (RSBVL) आणि सनमीना कॉर्पोरेशन (Sanmina Corporation) ने भारतात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चर साठी ज्वाइंट वेंचर निर्माण करण्याची घोषणा देखील केली. RSBVL च्या या ज्वाइंट वेंचर मध्ये 50.1 टक्के भागीदारी आणि सनमीनाची 49.9 टक्के भागीदारी असेल. हे वेंचर्स कम्युनिकेशन नेटवर्किंग, रक्षा आणि एयरोस्पेस सारख्या विविध क्षेत्रांमध्ये उच्च व्यवसाय व संरचना हार्डवेयर क्षेत्रामध्ये कार्य करेल.

त्यांनी केलेल्या वक्तव्य नुसार, आरएसबीवीएल मुख्य स्वरूपात उपस्थित भारतीय व्यवसाय क्षेत्रांमधील नवीन शेअर गुंतवणूक करेल आणि या गुंतवणुकीमध्ये 1670 कोटी रुपयांचे मालकी हक्क स्वीकारेल. ही देवाणघेवाण सप्टेंबर 2022 पर्यंत पूर्ण होण्याची आशा देखील व्यक्त केली केली आहे. या घोषणेनंतर रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. या सगळ्या घटना दरम्यान शेअर 0.32 टक्क्याने वाढून 2406 रुपयांपर्यंत पोहोचला.

रिलायन्स ने शून्य उत्सर्जन वाले इंधनला वैश्विक स्तरावर निर्माण करण्याचे सांगितले तसेच हे कार्य उत्पादन निर्मिती पेक्षा अर्ध्या किंमतीत तयार करू असे देखील म्हंटले आहे.रिलायन्स ने एका निवेदनात सांगितले की,कंपनी सध्या पेट्रोलियम कोकला संश्लेषण गॅस मध्ये परावर्तित करणारे 30,000 कोटी रुपयांचे सयंत्रला ब्ल्यू हायड्रोजन उत्पादनासाठी पुन्हा नव्याने तयार करेल.

आता आणखी एक भारतीय स्टार्टअप कंपनी आयपीओ आणणार; 2023 च्या सुरुवातीला ‘मीशोचा’ आयपीओ मार्केटमध्ये!

सावधान! एक एसएमएस करू शकतो तुमचे बँक खाते रिकामे; तुम्हीही होऊ शकता फिशिंगचे शिकार

पैसे गुंतवण्यासाठी सुरक्षित पर्याय हवा आहे? मग पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवा पैसे, सुरक्षेसह मिळवा अधिक परतावा