AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पैसे गुंतवण्यासाठी सुरक्षित पर्याय हवा आहे? मग पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवा पैसे, सुरक्षेसह मिळवा अधिक परतावा

जर तुम्ही भविष्यात गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफीसच्या (Post Office) सेविंग्स स्किम्स (Saving Schemes) एक उत्तम पर्याय ठरू शकतो. पोस्टाच्या सेविंग्स स्किममध्ये पैसे गुंतवण्याचे मुख्य दोन फायदे आहेत. एक म्हणजे तुम्हाला चांगला परतावा मिळतो आणि दुसरा म्हणजे तुमचे पौसे सुरक्षित राहातात.

पैसे गुंतवण्यासाठी सुरक्षित पर्याय हवा आहे? मग पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा पैसे, सुरक्षेसह मिळवा अधिक परतावा
| Edited By: | Updated on: Mar 05, 2022 | 10:15 AM
Share

जर तुम्ही भविष्यात गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफीसच्या (Post Office) सेविंग्स स्किम्स (Saving Schemes) एक उत्तम पर्याय ठरू शकतो. पोस्टाच्या सेविंग्स स्किममध्ये पैसे गुंतवण्याचे मुख्य दोन फायदे आहेत. एक म्हणजे तुम्हाला चांगला परतावा मिळतो आणि दुसरा म्हणजे तुमचे पौसे सुरक्षित राहातात. पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवण्यामध्ये कुठल्याही प्रकारची रिस्क नसते. समजा तुम्ही बँकेच्या एखाद्या स्किममध्ये पैसे गुंतवले आणि संबंधित बँकेचे दिवाळे (Bank Default) निघाले अथवा तिच्यावर भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या ‘आरबीआय’कडून कारवाई करण्यात आली तर नियमानुसार तुम्हाला फक्त पाच लाखांपर्यंतचीच रक्कम वापस भेटू शकते. मात्र पोस्टाच्या योजनेचे तसे नसते इथे तुम्हाला तुमचे सर्व पैसे ते देखील ठरलेल्या व्याजासह परत मिळतात. इंडिया पोस्ट बँक तुम्हाला विविध योजनांच्या माध्यमातून पैसे गुंतवणुकीची संधी उपलब्ध करू देते. ज्यामध्ये पोस्टाच्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट खाते किंवा फिक्स डिपॉझिट खाते यांचा समावेश आहे. आज आपण पोस्टाच्या फिक्स डिपॉझिट खात्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

व्याज दर

तुम्ही जर पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेंतर्गत एक वर्षासाठी गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला गुंतवणुकीवर 5.5 टक्के व्याज दर दिला जातो. नव्या व्याज दरानुसार तुम्ही पोस्टाच्या एफडीमध्ये तीन किंवा चार वर्षांसाठी गुंतवणूक केली तरी देखील तुम्हाला 5.5 टक्केच व्याज मिळते. मात्र त्यापेक्षा अधिक म्हणजे पाच वर्ष किंवा त्यावरून अधिक वर्षांसठी तुम्ही जर एफडीमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला तुमच्या रकमेवर 6.7 टक्के व्याजदर देण्यात येतो. एक एप्रिल 2020 पासून हे नवे व्याज दर लागू करण्यात आलेले आहेत.

गुंतवणुकीची मर्यादा

पोस्ट ऑफीसच्या या योजनेमध्ये गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. तुम्ही हजार रुपयांपासून पुढे कितीही रुपयांपर्यंतची गुंतवणूक पोस्ट ऑफीसच्या या योजनेमध्ये करू शकता. जर तुम्ही या योजनेत पाच वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला नियमानुसार टॅक्समधून देखील सूट मिळते.

खाते कोणाला उघडता येते?

पोस्ट ऑफीसच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणताही भारतीय नागरिक पात्र आहे. या योजनेत खाते ओपन करण्यासाठी केवळ एकच अट आहे, ती म्हणजे तो भारतीय नागरिक असावा. तुम्ही जॉईंट खाते देखील ओपन करू शकता. तसेच एखाद्या अल्पवयीन मुलाचे खाते त्याच्या पालकांच्या संमतीने ओपन केले जाऊ शकते.

संबंधित बातम्या

Gold Investment : सोन्यामध्ये गुंतवणूक कशी कराल? जाणून घ्या गुंतवणुकीचे विविध प्रकार

स्किमिंग म्हणजे काय; तुम्हालाही बसू शकतो या माध्यमातून मोठा आर्थिक फटका, फसवणूक टाळण्यासाठी काय कराल?

गव्हाच्या भावात वाढ, जाणून घ्या गहू दरवाढीचे रशिया कनेक्शन

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.