गव्हाच्या भावात वाढ, जाणून घ्या गहू दरवाढीचे रशिया कनेक्शन

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध (Russia-Ukraine war) सुरू आहे. या युद्धाचा मोठा प्रभाव हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर पडला आहे. कच्च्या तेलासह (Crude oil) सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. सोन्याच्या भावाने तर गेल्या 14 महिन्यातील उच्चांक गाठला आहे. वाढत असलेल्या महागाईत आता आणखी एका गोष्टीची भर पडली आहे, ती म्हणजे गव्हाची (Wheat). गेल्या 15 दिवसांमध्ये गव्हाचे दर क्विंटलमागे 85 ते 90 रुपयांनी वाढले आहेत.

गव्हाच्या भावात वाढ, जाणून घ्या गहू दरवाढीचे रशिया कनेक्शन
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 2:16 PM

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध (Russia-Ukraine war) सुरू आहे. या युद्धाचा मोठा प्रभाव हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर पडला आहे. कच्च्या तेलासह (Crude oil) सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. सोन्याच्या भावाने तर गेल्या 14 महिन्यातील उच्चांक गाठला आहे. वाढत असलेल्या महागाईत आता आणखी एका गोष्टीची भर पडली आहे, ती म्हणजे गव्हाची (Wheat). गेल्या 15 दिवसांमध्ये गव्हाचे दर क्विंटलमागे 85 ते 90 रुपयांनी वाढले आहेत. सध्या गव्हाच्या काढणीचा हंगाम आहे. सर्वसाधारणपणे जेव्हा बाजारात नवे पीक येते तेव्हा दर स्वस्त होतात. मात्र आता गव्हाचे भाव वाढले आहेत. येणाऱ्या काळात गव्हाचे भाव आणखी वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे सध्या तरी शेतकरी नवा गहू बाजारात आणताना दिसून येत नाहीयेत. सध्या मार्केटमध्ये गव्हाच्या पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्याने गव्हाचे दर वधारले आहेत.

रशिया जगातील सर्वात मोठा गहू उत्पादक देश

रशिया हा जगातील सर्वात मोठा गहू उत्पादक देश आहे. तर युक्रेनचा गहू निर्यातीमध्ये तिसरा क्रमांक लागतो. गेल्या वर्षी एकट्या रशियाने 3.5 कोटी टन गव्हाची निर्यात केली होती. तर त्या पाठोपाठ 2.4 कोटी टन गहू निर्यात ही युक्रेनने केली होती. मात्र सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. युद्ध सुरू असल्यामुळे जे देश गव्हासाठी रशिया किंवा युक्रेनवर अवलंबून आहेत अशा देशांना तेथून गव्हाचा पुरवठा होणे शक्य नाही. अशावेळी हे देश आता गव्हाच्या आयातीसाठी दुसऱ्या देशांचा शोध घेत आहेत. ही भारतासाठी मोठी संधी ठरणार आहे. कारण भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा गहू उत्पादक देश आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर गव्हाची निर्यात वाढून गव्हाचे दर आणखी वाढू शकतात अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

भारताला गहू निर्यातीची संधी

भारत हा जगातील गहू उत्पादक देशांपैकी एक प्रमुख देश आहे. सध्याच्या स्थितीमध्ये भारताकडे पर्याप्त प्रमाणात गव्हाचा साठा देखील उपलब्ध आहे. प्राप्त आकडेवारीनुसार एक फेब्रुवारीपर्यंत भारताकडे गव्हाचा 2.82 कोटी टन साठा शिल्लक आहे. याशिवाय शेतकऱ्यांकडे देखील मागच्या वर्षीचा गहू शिल्लक आहे. यंदा भारतात 10.5 कोटी टन गव्हाचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. म्हणजेच काय तर देशाची गरज पूर्ण होऊन देखील यंदा गव्हाचा मोठा साठा शिल्लक राहणार आहे. रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर यंदा भारतातून गव्हाची निर्यात वाढू शकतो. दरवर्षी 50 लाख टनाच्या आसपास भारतातून गहू निर्यात केले जातात. मात्र यंदा त्यामध्ये वाढ होऊन निर्यात 70 लाखांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

रशिया -युक्रेन युद्ध वाहन उद्योगाच्या मुळावर, देशात सेमीकंडक्टरचा तुटवडा; फेब्रुवारीमध्ये वाहन विक्रीत घट

Russia Ukraine War : सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा वाढ, सोने गेल्या 14 महिन्यातील सर्वोच्च स्तरावर

Ukraine crisis : शेअर बाजार कोसळला, कच्च्या तेलाचे दर गेल्या 8 महिन्यातील सर्वोच्च स्तरावर, सोनंही महागलं

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.