रशिया -युक्रेन युद्ध वाहन उद्योगाच्या मुळावर, देशात सेमीकंडक्टरचा तुटवडा; फेब्रुवारीमध्ये वाहन विक्रीत घट

फेब्रुवारी महिन्यात ऑटो सेक्टरला (auto sector) मोठा फटका बसला आहे. सेमीकंडक्टरच्या (Semiconductor) शॉर्टेजमुळे देशांतर्गंत प्रवासी वाहनाच्या विक्रीत तब्बल आठ टक्क्यांची घट झाली. ऑटोमोबाईल डिलर असोसीएशनच्या (FADA) मते गेल्या फेब्रुवारी महिन्यात देशभरात एकूण 258337 इतक्या प्रवासी वाहनांची विक्री झाली. प्रवाशी वाहनाच्या विक्रीमध्ये फेब्रुवारी महिन्यात वार्षिक आधारावर 9.21 टक्क्यांची घट झाली आहे.

रशिया -युक्रेन युद्ध वाहन उद्योगाच्या मुळावर, देशात सेमीकंडक्टरचा तुटवडा; फेब्रुवारीमध्ये वाहन विक्रीत घट
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 1:22 PM

फेब्रुवारी महिन्यात ऑटो सेक्टरला (auto sector) मोठा फटका बसला आहे. सेमीकंडक्टरच्या (Semiconductor) शॉर्टेजमुळे देशांतर्गंत प्रवासी वाहनाच्या विक्रीत तब्बल आठ टक्क्यांची घट झाली. ऑटोमोबाईल डिलर असोसीएशनच्या (FADA) मते गेल्या फेब्रुवारी महिन्यात देशभरात एकूण 258337 इतक्या प्रवासी वाहनांची विक्री झाली. प्रवाशी वाहनाच्या विक्रीमध्ये फेब्रुवारी महिन्यात वार्षिक आधारावर 9.21 टक्क्यांची घट झाली आहे. फेब्रुवारी 2020 च्या तुलनेत फेब्रुवारी 2022 मध्ये वाहन विक्रीत तब्बल 20.65 टक्क्यांची घट झाली आहे. परंतु जरी असे असले तरी देखील फेब्रुवारी महिन्यात प्रवासी रिक्षांच्या विक्रीमध्ये मात्र तेजी दिसून आली. गेल्या महिन्यात रिक्षाच्या विक्रीमध्ये वार्षिक आधारावर 16.64 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे दुचाकींच्या विक्रीत 10.67 टक्क्यांची आणि टॅक्टरच्या विक्रीमध्ये 18.87 टक्यांची घट नोंदवण्यात आली.

देशात सेमीकंडक्टरचा तुटवडा

देशात आधीच सेमीकंडक्टरचा तुटवडा आहे आणि आता त्यात भरीस भर म्हणून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले आहे. या युद्धाचा मोठा फटका हा सेमीकंडक्टरच्या पुरवठ्यावर होताना दिसत आहे. युद्ध आणखी काही दिवस चालू राहिल्यास परिस्थिती गंभीर बनेल. सेमीकंडक्टर चीप वेळेत उपलब्ध होत नसल्याने वाहन निर्मितीमध्ये घट झाली आहे. वाहनांची निर्मिती कमी असल्याने त्याचा विक्रीवर परिणाम झाला. तसेच वाढत असलेले कच्च्या तेलाचे भाव पाहाता येणाऱ्या काळात पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे देखील ग्राहक सध्या वाहन खरेदी करणे टाळत असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

रशिया-युक्रेन वादामुळे समेकंडक्टरचे संकट वाढणार

याबाबत बोलताना फाडाचे अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी म्हटले आहे की, जोपर्यंत रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू राहिल तोपर्यंत ऑटो सेक्टरवरील संकटे कायम राहणार आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे रशिया हा वाहनांसाठी लागणाऱ्या सेमीकंडक्टर चीपचा मोठा उत्पादक देश आहे. आपल्याला सेमीकंडक्टरचा मोठ्याप्रमाणात पुरवठा हा रिशायामधून होतो. मात्र सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत रशियाकडून सेमीकंडक्टरचा पुरवठा होणे शक्य नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात वाहन निर्मितीला मोठा फटका बसू शकतो.

संबंधित बातम्या

Russia Ukraine War : सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा वाढ, सोने गेल्या 14 महिन्यातील सर्वोच्च स्तरावर

Ukraine crisis : शेअर बाजार कोसळला, कच्च्या तेलाचे दर गेल्या 8 महिन्यातील सर्वोच्च स्तरावर, सोनंही महागलं

Russia Ukraine War : कच्च्या तेलाच्या किमतीत तेजी-मंदीचा खेळ, आज पुन्हा दर घसरले; जाणून घ्या इंधनाचे नवे दर

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.