Russia Ukraine War : कच्च्या तेलाच्या किमतीत तेजी-मंदीचा खेळ, आज पुन्हा दर घसरले; जाणून घ्या इंधनाचे नवे दर

युक्रेन रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतराराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीमध्ये तीव्र चढ -उतार पहायला मिळत आहे. गुरुवारी कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली होती. मात्र शुक्रवारी पुन्हा एकदा कच्च्या तेलाचे दर घसरले आहेत.

Russia Ukraine War : कच्च्या तेलाच्या किमतीत तेजी-मंदीचा खेळ, आज पुन्हा दर घसरले; जाणून घ्या इंधनाचे नवे दर
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 10:46 AM

मुंबई : युक्रेन रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतराराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीमध्ये तीव्र चढ -उतार पहायला मिळत आहे. गुरुवारी कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली होती. मात्र शुक्रवारी पुन्हा एकदा कच्च्या तेलाचे दर घसरले आहेत. शुक्रवारी घसरणीसह कच्च्या तेलाचे दर 111.5 डॉलर प्रती बॅरलवर पोहोचले आहेत. गुरुवारी कच्च्या तेलाचे दर गेल्या आठ महिन्यातील सर्वोच्च किमतीवर म्हणजे 117 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले होते. मात्र गुरुवारी त्यामध्ये घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या तेजी मंदीचा खेळ सुरू असतानाच भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर (Fuel Prices) जाहीर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आजही पेट्रोल, डिझेलचे (Petrol and Diesel) दर स्थिर आहेत. गेल्या चार महिन्यांपासून पेट्रोल डिझेलचे दर स्थिर असून, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

प्रमुख शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

शुक्रवारी मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लिटर 109. 98 रुपये तर डिझेल 84. 24 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 101.40 आणि 91.43 रुपये लिटर आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 95.41 रुपये एवढे असून, डिझेलसाठी 86.67 रुपये मोजावे लागत आहेत. सध्या तरी देशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पेट्रोल, डिझेलची दरवाढ होऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. ही दरवाढ अशीच राहिली तर येणाऱ्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्याप्रमाणात वाढू शकतात.

देशात चार महिन्यांपासून इंधनाचे दर स्थिर

देशात गेल्या चार महिन्यांपासून इंधनाचे दर स्थिर आहेत. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केल्याने चार नोव्हेंबर 2021 ला पेट्रोल पाच रुपयांनी तर डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाले होते. मात्र त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर गगणाला भिडले आहेत, मात्र भारतात इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आल्याने त्याचा मोठा फटका हा पेट्रोलियम कंपन्यांना बसत आहे. मात्र येत्या दहा मार्चला पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आहेत, त्यानंतर दरवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

रशिया – युक्रेन युद्धाचा भारताला फटका, विदेशी मुद्रा भंडारातून दोन अब्ज डॉलरचा अतिरिक्त खर्च!

युद्धादरम्यान ग्राहकांना दिलासा; देशी खाद्यतेलाच्या किमतीमध्ये घसरण, पाम तेलाच्या दरात तेजी कायम

तुम्ही पत्नीला संपत्तीमध्ये नॉमिनी केलंय? नसेल तर आजच करा; भविष्यातील संकटे टाळा

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.